नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


आरत्या आणि नामगजर

Go down

आरत्या आणि नामगजर Empty आरत्या आणि नामगजर

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:41 pm

आरत्या आणि नामगजर 8672_MahaS

खंडोबा, वीरोबा, रेणूका, अंबा, भवानी आणि तत्सम लोक दैवत सांप्रदायातील देवता आणि श्री विठठ्ल, रामकृष्ण यांच्या भक्तिसंप्रदायातील संकीर्तन यासाठी नामगजर आणि आरत्यांचा स्वतंत्र उपासना प्रकार उपयोगात आणला जातो. देवतेनुसार नामगजराचे आणि आरत्यांचे काही संकेतही ठरलेले असतात. अलिकडच्या काळात आरत्या आणि नामगजराला एखाद्या इव्हेंटचे स्वरूप् प्राप्त झाले असून गणपती, नवरात्रात आरत्यांच्या मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये चक्क स्पर्धा आयोजित केल्या जातात. आरत्या आणि नामगजरांना आलेले प्रयोगात्मक सादरीकरणाचे रूप हा काळाचा महिमाच म्हणवा लागेल. मुंबई सारख्या शहरातील या महानगराच्या धमण्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या डब्यांनमधूनही भजनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. नामगजर आणि आरत्यांच्या इतिहासावर असा दृष्टिक्षेप टाकता येईल.

राम, कृष्ण आणि विठठ्ल या देवत्यांच्या आरत्या आणि नामगजरात 'पुंडलिक वरदा हरि विठठ्ल, श्री ज्ञानदेव तुकाराम` हा गजर प्रामुख्याने होतो. 'राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी` हा नाम जप केला जातो. त्याची विशिष्ट लय असते. खंडोबाच्या नामगजरात 'सदानंदाचा येळकोट, भैरवनाथांच चांगभले` असा नामगजर केला जातो. भागवत संप्रदायातील नाम गजर आणि लोकदैवत संप्रदायातील नामगर्जना यांच्या प्रकृती, पिंडात फरक आहे. 'पुंडलिक वर दे हरि विठठ्ल` हा नामगजर वाटतो कारण त्यात भगवद् गीतातील आर्तता आहे. पंढरीचा राजा जरी 'राणा` रूपाने ओळखला जात असला आणि त्याचे भक्त जरी 'विठूरायाचे डिंगर` म्हणून ओळखले जाता असले तरी पंढरीचा हा राणा 'भक्तवत्सल` 'भक्तकलपदुप` आहे. त्यामुळे त्याच्या भेटीची आर्तता आणि भेटीनंतरची 'कृतकृत्यता` नामगजराने व्यक्त होते.

नामगजरात भक्तिरसपूर्णता असते. या उलट नामगर्जनेत रणगर्जनेचा आवेष असतो. विजयाचा उन्माद असतो. मणिमल्ल दैत्यांचा वध करणारा मल्हारी काय किंवा असुर मर्दिनी अंबा काय, या असूर मर्दानाचा हर्षोल्हास खंडोबाचे उपासक वाघ्ये व अंबेचे उपासक गोंधळी यांच्या नामगर्जनेतून, उदोकारातून व्यक्त होतो. नामगजर भक्तिरसपूर्ण तर नामगर्जना वीररसपूर्ण असते.

देवदेविकांची किंवा संत महंतांची आरती करताना त्यांच्या जयजयकार करणे, उदोकार करणे हा त्यामागचा मुख्य उदघोष असतो. आरतीच्या माध्यमातून संकीर्तनभक्तीच्या आविष्कार घडतो. ही भक्ती नेहमी निष्काम भक्तीची असेल असे नाही. तर अनेकदा तो सकाम भक्तीचाच आविष्कार असतो. आर्त भावाने देवतेची केलेली आर्जवे, प्रार्थना आणि अशी प्रार्थना करताना केले जाणारे गुणसंकीर्तन आणि ललीगायन हे आरतीचे मुख्यत: स्वरूप असते. लोकपरंपरेत प्रचलित असलेल्या मौखिक आरत्यांची रचनापध्दती आणि गायनसरणी यांचा अभ्यास करून अनेक संतांनी आरत्या रचल्या. रामदासस्वामींनी रचलेली गणपतीची 'सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची` आणि नरहरींनी रचलेली 'दुर्गे दुर्घट भारी, तुजवीण संसारी` ही दुर्गेची आरती ही याच परंपरेतील उदाहरणे सांगता येतील.

लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या 'मौखिक वाङ्मयाची परंपरा` या ग्रंथात म्हटले आहे. आरती म्हणायची परंपरा प्राचीन काळापासून रूढ आहे. देवतापूजनात त्याचे विशेष महत्व असते. आरती म्हटल्याशिवाय आणि आरती ओवाळण्याच्या स्वरूपातील जयकार केल्याशिवाय देवतापूजनाची किंवा कुलाचाराची सांगता होत नाही. देवतापूजन निरनिराळया निमित्तांनी आणि वेगवेगळया काळांत होते. त्यानुसार आरतीच्या काकड-आरती, धूप-आरती, शेजारती असे निरनिराळे प्रकार आढळतात. याशिवाय कुलाचार चालविणार्‍या निरनिराळया जाती जमातींनी निरनिराळया स्वरूपातील आरत्या म्हणण्याच्या पध्दती विकसित केल्या आहेत.

झांज, टाळ, मृदुंग अशा वाद्यांच्या साथीने सामूहिक स्वरूपात आरती गायिली जात असली तरी आता केवळ एक औपचारिक विधी म्हणून आरती केली जाते आणि म्हटली जाते.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही