नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


श्री क्षेत्रे अष्टविनायक

Go down

श्री क्षेत्रे अष्टविनायक Empty श्री क्षेत्रे अष्टविनायक

लिखाण  Admin Sat May 19, 2012 10:18 pm

श्री क्षेत्रे अष्टविनायक 8265_Mahasan_L

भारतीय परंपरेमध्ये सर्वात आधी पुजा केली जाते ती गणपतीची. गणपतीला अथर्ववेदकाळापासून मान्यता मिळाली आहे. पूर्वी गणपतीची पुजा ग्रामदैवतांबरोबर केली जायची. त्यांची स्थापनाही गावाच्या वेशीवर केली जात असे. गावाचे साथीचे रोग, परकीय आक्रमण यापासून रक्षण करणे ही यामागची भावना. असेच काही गणपती महाराष्ट्रात अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत.या गणपतीच्या ठिकाणांचा उल्लेख मुद्दगल पुराणात गणपती क्षेत्र म्हणून केला आहे. या अष्टविनायक स्थानांचा उल्लेख स्थानिक लोककथांमधून आढळतो.

यामुळे अष्टविनायकांचे दर्शन घेण्याची इच्छा प्रत्येकाला होते. आणि म्हणून अष्टविनायकांच्या या यात्रेला खूप महत्त्व आहे. अष्टविनायकांची यात्रा करताना या गणपतीचे दर्शन घ्यायचा क्रमदेखील ठरलो आहे. या शास्त्राप्रमाणे सर्वप्रथम दर्शन घ्यायचे ते मोरगाव्या मोरेश्वराचे. त्यानंतर सिद्धटेक, पाली, येऊर, महड, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन पुन्हा मोरगावला जायचे की अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होते.

पुण्यापासून २० कि.मी. ते ११० कि.मी. अंतरावर ही सगळी गणपती स्थाने आहेत. पुणे हे यात्रेसाठीचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

मोरगाव

भुस्वानंद भुवन किंवा स्वानंदपूरी असा ज्याचा उल्लेख पूराणामध्ये केला आहे. असे मोरगाव हे यात्रेचे पहिले ठिकाण. पुण्याहून ६४ कि.मी. अंतरावर बारामती तालुक्यामध्ये करानदीच्या काठावर मोरगाव वसले आहे. गावाच्या मध्य भागी मोरेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम बहमनी काळात झाल्याचे एतिहासिक पूरावे उपलब्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे असलेला भला मोठा नंदि. गणपतीच्या देवळांमध्ये एर्‍ही नंदी कुठेच नसतो. या गणपतीबद्दल असे सांगतात की, गणपतीची ही मुर्ती ब्रह्मदेवाने स्थापन केली आहे. माती, लोह आणि रत्नांचा चुरा यापासून ती बनविली होती. पुढे या मुर्तीचे परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी पांडवानी तिला तांब्याचा पत्रा बसविला. दगडी तटबंदिच्या आत मंदिर आहे. सर्वप्रथम नंदीचे दर्शन होते. नंदीपासून २० फुटावर गणपतीचा गाभारा आहे. श्रींची मुर्ती डावी सोंड असलेली बैठी आहे. यामुर्तीच्या डोंळ्यामध्ये आणि नाभीमध्ये हिरे आहेत. मस्तकावर नाग फणा आहे आणि दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहेत. असे म्हणतात हे ठिकाण शहाजीराजे भोसले यांनी मोरया गोसावी यांना इनाम दिले होते. मोरगावचा गणपतीच्या साडेतीन पिठांमध्ये समावेश आहे. विजयादशमी, सोमवती अमावस्या, भाद्रपद आणि माघ चतुर्थीला भक्तांची रिघ लागते.

सिद्धटेकचा सिद्धीविनायक

मधु केटभ या दैत्यांचा संहार करण्यात यश मिळावे म्हणून शंकराने विष्णूला श्री गणेशाय नमNeutral हा षडाक्षरी मंत्र दिला. विष्णूच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या गणपतीने असूर संहारासाठी विष्णूला काही विशेष सिद्धी दिल्या अशी अख्यायिका आहे. हे सारे तेथे घडले ते ठिकाण म्हणजे सिद्धटेक. सिद्धटेक हे गाव पुणे-सोलापूर हायवेवर आहे. गावामध्ये एका छोट्या टेकाडावर सिद्धीविनायकाचे उत्तराभिमुख मंदिर आहे. अष्टविनायकाच्या आठही मुर्तीमध्ये फक्त याच मुर्तीची सोंड उजवीकडे वळली आहे.

पालीचा बल्लाळेश्वर

निसर्ग सौंदर्य लाभलेले पाली हे कोकणातले एक छोटेशे गाव. पालीचा गणपती त्याच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या गणपतीचे नाव आहे बल्लाळेश्वर. या नावाची कथा सांगितली जाते ती अशी पाली गावामध्ये कल्याण शेठ नावाचा एक वाणी होता. त्याच्या मुलाचे नाव होते बल्लाळ. हा मुलगा रात्रंदिवस गणपतीची आराधना करण्यात घालवत असे. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही राहत असल्यामुळे या सगळ्यांच्या तब्येती खालावल्या. हे सगळे बघून त्या मुलांच्या आई-वडिलांनी कल्याण शेठकडे तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेठजीने बल्लाळ खूप चोप दिला आणि झाडाला बांधून ठेवले. त्याला प्रत्यक्ष गणपतीने येऊन सोडविले. बल्लाळाने गणपतीला प्रार्थना केली त्यांनी ठिकाणी निरंतन वास ठेवावा. गणपतीने त्याला तसा आर्शीवाद दिला अशी कथा आहे. या ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. हा गणपती बल्लाळेश्वर या नावाने अष्टविनायकांमध्ये गणला जातो. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. आणि सुर्योदयाचा पहिला किरण श्रींच्या मुर्तीवर पडेल अशी मंदिराची रचना करण्यात आली आहे. मुर्ती तीन फुट उंचीची आहे. डोळ्यात व नाभीत हिरे जडवले आहेत. माघ आणि भाद्रपद चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो.

थेऊर चिंतामणी

गणपतीचे चिंतामणी असेही एक नाव आहे क्षिप्त, मुढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोधक अशा मनाच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करतो तो चिंतामणी. चिंतामणीच्या भजनाने मन:शांतीचा लाभ होतो असे मुद्दगल पुराणात असे सांगितले आहे. थेऊरचा गणपती आहे तो चिंतामणी. थेऊर हे गाव मुळा-मुठा नदीच्या काठावर २२ कि.मी. अंतरावर वसले आहे. चिंतामणीचे हे मंदिर मोरया गोसावींचा मुलगा चिंतामणी गोसावी यांनी बांधले. या ठिकाणाचा महिमा सांगताना असे सांगितले जाते की, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सिद्धी प्राप्तीसाठी येथे गणपतीची अनुष्ठान केले. मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख पण मुर्ती पूर्वाभिमुख आहे. मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर चिंचवड देवस्थानच्या अखत्यारित येतात. थोरले माधवराव पेशव्यांचे वास्तव्य अखेरच्या दिवसांमध्ये याच ठिकाणी होते. त्यांचा मुत्यूही येथेच झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रमा माधव स्मृतीदिन मंदिरात साजरा केला जातो.

महडचा वरदविनायक

रायगड जिल्ह्यातील महड हे छोटेशे गाव. गावामध्ये वरदविनायकाचे लहानसे मंदिर आहे. अष्टविनायकापैकी हा पाचवा गणपती. गणपतीची दगडी मुर्ती सिंहासनावर विराजमान आहे. या सिंहासनावर दोन गजराज कोरले आहे तसेच देवळाच्या चारही बाजूंनी हत्तीच्या आकृत्ती कोरल्या आहेत. गणपतीची मुर्ती मंदिरामागे असलेल्या तळ्यामध्ये १६९० साली सापडली. या गणपतीची एक कथा या भागामध्ये प्रचलित आहे ती म्हणजे पूर्वी महड पुष्पकवन म्हणून प्रसिद्ध होते. गृत्समद ऋषींनी या वनात तपश्चर्या करुन गणपतीला प्रसन्न केले आणि गणपतीने कायम आपले अधिष्ठान येथे ठेवावे म्हणून वर मागितले. तसा वर गणपतीने या ऋषींना दिला. म्हणून या गणपतीचे नाव वरदविनायक रुढ झाले. गृत्समद ऋषी हे गाणपत्य संप्रदायाचे आद्यप्रवर्तक समजले जातात.

लेण्याद्रीचा गिरीजात्मक

लेण्याद्री ! नावाप्रमाणेच डोंगरातल्या लेण्यामध्ये वसलेले हे मंदिर. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे. गिरीजात्मकाचे हे मंदिर लेण्यांमधले एक मोठे दालन आहे. आणि ते एका मोठ्या शिळेमधून कोरलेले आहे. गणपतीची मुर्ती पाठमोरी बसलेली आहे. या मंदिरात पाठमोर्‍या मुर्तीची पुजा केली जाते. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या गणपतीबद्दल असे सांगितले जाते की पार्वतीने पुत्र प्राप्तीसाठी इथल्या गुहेमध्ये बसून घोर तपश्चर्या केली. त्यानंतर तिला गणपतीची प्राप्ती झाली. म्हणून या गणपतीला गिरीजात्मक म्हणतात.

ओझरचा विघ्नेश्वर

जुन्नर तालुक्यातील ओझर हे गाव. इथला गणपती विघ्नेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. विघ्नेश्वराच्या मंदिराला सर्व बाजूंनी उंच दगडी तटबंदि आहे. या तटबंदिला पूर्वेकडे एक महाद्वार आहे. दोन उंच दीपमाळा या दारवाजापाशी येताज दृष्टीस पडतात. मंदिराला दोन्ही बाजूनी ऐसपैस ओवर्‍या आहेत. या आणि गर्भगृहाच्याखाली एक तळघर आहे. तळघरामध्ये नित्याची उपकरणी, पुजेचे साहित्य ठेवले जाते. विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची प्रसन्न मुर्ती गाभार्‍यात शिरताच लक्ष वेधून घेते. मुर्ती शेंदूर चर्चीत आहे. या मुर्तीच्या कपाळावर आणि डोळ्यांमध्ये माणके जडविली आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरात मोठा दीपोत्सव साजरा केला जातो.

रांजणगावचा महागणपती

पुणे जिल्ह्यामध्ये शिरुर तालुक्यामध्ये रांजणगाव आहे. इथला महागणपती अष्टविनायकांच्या यात्रेला आठवा गणपती. असे सांगतात की, त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी साक्षात शंकरांनी गणपतीला वर मागितला त्यासाठी त्यांनी गणपतीची स्थापन करुन येथे पुजा केली होती. आल अस्तित्वात असलेल्या मंदिराचा गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. आणि मुख्य सभामंडप इंदूरचे सरदार किबै यांनी बांधला. भव्य कपाळ असलेली मांडी घातलेली प्रसन्न मुर्ती या मंदिरात आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत. या मंदिरामध्ये भाद्रपद महिन्याचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

अष्टविनायकांची ही स्थाने सहज जाण्यासारखी असल्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. हे सारखे लक्षात घेऊनच पुण्याहून या सगळ्या ठिकाणी जायला बसेची उत्तम व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त खाजगी पर्यटन कंपन्या अष्टविनायकांच्या सहली आखतात. यामध्ये जेवणखावण व राहण्याचीही सोय केलेली असते. रेल्वे, विमान आणि बसेस या सर्व दृष्टिने पुणे हे सोयीचे ठिकाण आहे. ही यात्रा साधरणत: दोन दिवसात पूर्ण करता येते
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही