नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

मेलडी - भालचंद्र नेमाडे

Go down

मेलडी - भालचंद्र नेमाडे Empty मेलडी - भालचंद्र नेमाडे

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:42 pm

मेलडी - भालचंद्र नेमाडे 7901_MahaS

भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यविश्वातील मोठं विलक्षण असं व्यक्तिमत्त्व आहे. १९६०च्या दशकात त्यांची 'कोसला' ही कादंबरी आली आणि एकच खळबळ उडाली. सार्‍या प्रस्थापित जाणीवा आणि व्यवस्था यांना छेद देणारी ही कादंबरी होती. पण तेवढ्यापुरतेच या कादंबरीचं महत्त्व नव्हतं. या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर हा खरं तर न-नायक. पण त्या काळातील तरुणांच्या वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचं तो जे काही दर्शन घडवतो, ते केवळ त्याच्या एकट्यापुरतेच मर्यादित नव्हतं. ते प्रातिनिधिक तर होतंच शिवाय त्यातून तत्कालीन समाजव्यवस्थेवर त्यानं आपल्या तिरकस आणि एकेरी पद्धतीनं केलेलं भाष्य हे महाराष्ट्राची अनेक पातळीवरील ढोंगबाजी उघड करणारं होतं. त्यात पुणे या विद्येच्या माहेरघराची ज्या पद्धतीनं नेमाडे यांनी खिल्ली उडवली होती, ते अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबणारं होतं. त्यामुळे या कादंबरीच्या बर्‍या-वाईटपणाबद्दल बरेच काळ चर्चा होत राहिली आणि नेमाडे हे नाव गाजत राहिलं

'कोसला'नंतर प्रदीर्घकाळ नेमाड्यांनी कादंबरी या साहित्यप्रकाराला हात लावला नाही पण ते समीक्षेकडे वळले. त्यांच्या मुलाखती आणि छोटेमोठे लेख प्रसिद्ध होत राहिले. या सार्‍यातून ते प्रस्थापित साहित्यविश्वावर कठोर असूड ओढत होते आणि नेमाडे हे नाव बघता बघता मराठी साहित्य तसंच वैचारिक विश्वातील एक मैलाचा दगड बनून गेलं. त्यांची देशी वसाहतवादाची थिअरी ही अनेकांना गुंग करून सोडणारी होती. त्यामुळे अनेक प्रस्थापित समीक्षकांनी त्यांना धारेवरही धरलं. पण नेमाडे डगमगले नाहीत. त्याचं कारण म्हणजे ते आपल्या विचारांशी पक्के होते. पुढे बिढार, झूल अशा त्यांच्या आणखी तीन कादंबर्‍या आल्या आणि नेमाडे यांनी आपल्या कसदार लेखनाचा आणखी एक बाज दाखवून दिला.

पण प्रचलित व्यवस्थेवर कोरडे ओढणारे आणि त्याचवेळी साहित्यविश्वाला काही नवा विचार देऊ पाहणारे नेमाडे हे मनानं कवीही होते. त्यांच्या 'कोसला' या कादंबरीच्या नायकाच्या व्यक्तिरेखेतूनही ते दिसून आलेच होते. वास्तवातल्या ढोंगबाजीचा बुरखा क्षणोक्षणी फाडणारा पांडुरंग सांगवीकर हा दुसर्‍याच क्षणी अत्यंत हळवा कसा होऊन जातो, ते त्या कादंबरीतून अनेकदा बघायला मिळालं होतं. पुढे 'कोसला'नंतर अवघ्या काही वर्षांतच म्हणजे १९७० मध्ये त्यांचा 'मेलडी' हा छोटेखानी कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातूनही त्यांचे हे सारे व्यक्तिमत्त्वच अधिक ठळकपणे भेटून गेले.
या कविता वाचताना अगदी पहिल्यांदा जाणवले ते हे की या कविता भालचंद्र नेमाडे यांच्या असल्या, तरी खर्‍या अर्थानं त्या ‘कोसला’चा नायक पांडुरंग सांगवीकर याच्याही आहेत. हा सांगवीकर ज्या पद्धतीनं कोसलामध्ये बोलत-वागत होता, त्याच जाणीवांची प्रचीती ‘मेलडी’मधूनही येत होती. तोच तिरकसपणा, तीच समाजातील व्यंग शोधून त्यावर प्रहार करण्याची प्रवृत्ती आणि त्याचवेळी तरल संवेदनशीलता आणि मनाचा हळवेपणा. सारं सारं तेच होतं. पण हा हळवेपणा मराठी काव्यजगतातील तथाकथित ‘रोमँटसिझम’पेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्यातील मनाचा सच्चेपण हा थेट भिडणारा होता.

दु:खाचा अंकुश असो सदा मनावर
हालाहल पचवण्याबद्दल माथ्यावर चंद्र असो
चांगली माणसं मोजायला हाताला हजार बोटं असोत
लक्षात राहत नाहीत बिचारी.
या ओळी असोत वा
सहजासहजी अंगावरचे डाग मनावर टिपून घेतले
परकेपणाच्या ठेचा लागल्या तेव्हा खुणा पुसून गोरामोरा घरात शिरलो.
किंवा
रंग पाहिले पोटातले, उब घेतली कुशीतली
हात उमटले गंधर्वांचे छातीआत पाठीमागून
शरीरात कोण? कोणात कोण?
गरवारीच्या आत जश्शी छोटीशी छोकरी
घागरीमध्ये पाण्यावरती चंद्राची सावली

असे शब्द या अवघ्या ३६ पानांच्या काव्यसंग्रहातून सतत भेटत राहतात आणि बघता बघता क्षिती होऊन जाते. त्यामुळेच आज चार दशकांनंतरही या कविता आठवणीतल्या कविता बनून राहतात.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही