नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 0 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 0 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


विमुक्ती - दीपा महानवर

Go down

विमुक्ती - दीपा महानवर Empty विमुक्ती - दीपा महानवर

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:05 pm

माणसाला नॉस्टल्जिया आवडतो आणि वयाची चाळिशी वा पन्नाशी गाठली की नवनव्या भविष्यकालीन योजना आखण्यापेक्षा भूतकाळातच गुंतून पडण्यात अनेकांचा जीव रमून जातो. लहानपणीच्या, तरुणपणीच्या त्या आठवणी मनावर खोल असा परिणाम करून जाणा-या असतात. त्याची स्मृतीही मनावर पक्की असते आणि जसजसं वय वाढत जातं, तसं आपण जे अनुभवलं वा जे आयुष्य आपल्या वाटय़ाला आलं वा जे आपल्याला भोगायला लागलं वा आपण आपल्या हातांनी आपलं आयुष्य कसं घडवलं, ते दुस-याला सांगण्याची इच्छाही प्रबळ होत जाते. अर्थात, सर्वांच्या जवळच दुस-याला काही सांगण्यासारखं असतं, असं नाही! खरं तर ज्यांच्या जवळ बरंच काही सांगण्यासारखं असते, त्यापैकी फारच थोडे लोक ते सांगण्याचा विचार मनात आणतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अगदी आवर्जून सांगावं, असे लोक म्हणजे ज्यांनी आयुष्यात ठोस असं काही केलं आहे, असे लोकही अगदी थोडेच असतात.

दीपा महानवर हे समाजातील अशा अगदीच मोजक्या लोकांपैकी एक आहेत. मुळात दीपा महनवर हे नावच विलक्षण आहे. त्यातून खरं तर ते स्त्री आहेत, असाच समज त्यांची ओळखपाळख नसलेल्या अनेकांचा होण्याचा संभव अधिक आहे. पण सातारा जिह्यात वाई तालुक्याच्या अग्नेय टोकाला असलेल्या लगडवाडीत जन्माला आलेल्या महनवरांच्या आयुष्यात अशा अनेक चित्तरकथा घडलेल्या आहेत. त्या त्यांना आपल्याला सांगाव्याशा वाटल्या, हे आपलं भाग्यच! लगडवाडीत जायला साधी एसटीही नाही. महनवारांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'आनेवाडी, पाचवड, भुईंज, जोशीविहीर, शिरगाव यापैकी कुठेही उतरलं तरी लगडवाडीला यायला साताठ मैल चालावं तेव्हा लगडवाडी घावायची. रेल्वेनं पळशी अथवा वाठार स्टेशनवर उतरलं, तरी तितकंच चालावं लागायचं.'

अशा गावात मग शाळा असणं तर दूरच राहिलं. छोटी-मोठी शेती आणि ती कसताना लागणारी अन्य छोटी मोठी कामं करायची. 'शेतात शिराय दिवसा भ्या वाटावं अशी पुरुषभर उंचीची बाजरी. कुटंबुटं तालातुंबात भात. नुसत्या पावसावल्या भुईमुगाची बिघ्या-आरदबिघ्याची शेतं. चोरटय़ांना भुईमूग दिसू नये या भाबडय़ा समजुतीनं बांधाकडेला कारळय़ाची तासं.' अशा गावात वाढलेला हा दीपा महानवर शिक्षणासाठी जीव टाकतो. नुसता जीवच टाकत नाही, तर त्यासाठी घरादाराचा, गावाचा उन्हाळा करून तालुक्याच्या गावाकडे आणि पुढे शहराकडे धाव घेतो. तिथं त्याला आसरा देते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेची शाळा. शाळेचं वसतीगृह. वसतीगृहातल्या गमतीजमती आणि अडचणीही. अर्थात, गमतीजमती मोजक्या. अडचणी अनंत. सारं कसं अगदी ठरल्याप्रमाणं. पण त्यावर हा लहानगा दीपा मात करत राहतो. शिकत राहतो. शिकता शिकता थेट ग्रॅज्युएट, डबल पदवीधर होतो. आपल्याच संस्थेतील कॉलेजात प्राध्यापक होतो. संस्थेच्या राजकारणात पिचून जाऊ बघतो. बदल्यामागून बदल्या. पण त्याची जिद्द कायम असते. त्याला कर्मवीरांनी भारून टाकलेलं असतं. त्यामुळे तो कशाची म्हणता कशाची हार मानायला तयार नसतो. अखेर यश त्याच्या मागून धावू लागतं. त्यानंच प्रयत्नांची शिकस्त करून लगडवाडीला आणलेल्या एसटीप्रमाणे...

हा सारा प्रवास जितका कठीण होता, तितकाच तो लिहिताना महानवर यांनी सोपा करून दाखवलेला आहे. आपल्या वाटय़ाला आलेल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहणं ही अत्यंत कठीण बाब आहे. पण महानवर यांनी ते काम अगदी सहजगत्या करून दाखवलं आहे. एकामागून एक अशा अनुभवांच्या लडी ते उलगडत जातात आणि आपण त्यात गुंतून पडत राहतो. या सा-या बिकट वाटेवरच्या प्रवासात महानवर यांना त्यांच्या पत्नीनं दिलेली साथ ही अर्थातच अत्यंत मोलाची आहे. अशी पत्नी लाभणं, हा खरं तर आजच्या काळातला एक दुर्मिळ म्हणता येईल, असाच योग.

हे सारे अनुभव मुळातूनच वाचण्याजोगे आहेत. ते सांगत बसण्यात अर्थ नाही. प्राध्यापक झाल्यावर महानवर प्राध्यापक संघटनेचं काम सुरू करतात. आज शिक्षणाची विविध अंगांनी चर्चा सुरू असताना, तर या संघटनेत काम करताना महानवर यांना आलेले अनुभव हे या क्षेत्रातील भल्याभल्यांच्या डोळय़ात अंजन घालणारेच आहेत. महानवर यांच्या या आत्मकथनाचं नाव आहे, विमुक्ती. कोणत्याही नागरिकानं हे आत्मकथन मुळातूनच वाचायला हवं. तरच तो ख-या अर्थानं सुजाण नागरिक असं स्वत:ला म्हणवून घेऊ शकेल.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही