नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


लोक कले मधला 'नाच्या`

Go down

लोक कले मधला 'नाच्या` Empty लोक कले मधला 'नाच्या`

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:09 pm

लोक कले मधला 'नाच्या` 7309_Mahasan_L

'खेळ तो येणेची खेळावा ,
नट तो येणेची नटावा,


अशा स्वरूपाचे एक संतवचन आहे. अर्धनारी नटेश्वराची संकल्पना भारतीय संस्कृतीत रूढ असून 'सत्यम,शिवम, सुंदरम्` चा प्रत्यय या अर्धनारीनटेश्वरामध्ये येतो असे म्हणतात. भरतमुनींच्या नाटयशास्त्रात आहार्य, आंगिक, वाचिक असे अभिनय प्रकार विषद केलेले आहेत आणि अभिनयासोबत नृत्य आणि नृत हा विचार मांडला गेला आहे. नृत्य करणा-या स्त्रीला 'नर्तिका` तर नृत्य करणा-या पुरूषाला 'नर्तक` असे म्हटले जाते. लोकधाटी परंपरेत नर्तिका आणि नर्तक हे शिष्ट शब्द अनुक्रमे 'नाची आणि 'नाच्या` म्हणून संबोधले जातात. नाच्याची परंपरा ढोलकी फडाच्या तमाशात आहे. तशीच ती खडीगंमत आणि आदिवासी ठाकर समाजाच्या तमाशात आढळून येते.

लोककला प्रकारांमध्ये स्त्री अथवा पुरूष यांचे नर्तन मंदिर परिसरातील भक्तीनाटयांमध्ये, अंगणीय आणि प्रांगणीय कलाप्रकारांमध्ये आढळून येते. पण या कलाकारांना नाची किंवा नाच्या म्हणून संबोधले जात नाही. मंदिर परिसरात नृत्य करणा-या स्त्री कलावंत या प्रामुख्याने देवदासी परंपरेतल्या असतात. ज्यांत भाविणी, मुरळया, जोगतिणी, जान्या आदींचा अंतर्भाव असतो. या स्त्रिया जरी नृत्य करीत असल्या तरी त्याना नाची म्हणून संबोधले जात नाही. केवळ तमाशातील स्त्रीलाच नाची म्हणून संबोधले जाते. नाची किंवा नाच्या या स्वरूपाचे संबोधन फार आदरयुक्त म्हणून मानले जात नसेल, तरी एकेकाळी आपण तमाशातील नाची अथवा नाच्या आहोत असा उल्लेख गौरवाने केला जाई. एखाद्या नाच्याने स्त्री भूमिका हुबेहुब वठविल्यास त्याला राजदरबारी बक्षिस देखील दिले जात असे. यासंदर्भात दगडूबाबा साळी यांचे उदारण बोलके आहे. शिमग्याच्या वेळी बडोदे संस्थानमध्ये त्यांनी तमाशा सादर करताना गरोदर बाईचे सोंग वठविले व बडोद्याच्या राणी सरकारांनी दगडूबाबांना सोन्याचे कडे बहाल केले. चंद्राबाई आणि पवळाबाई या ढोलकी-फडाच्या तमाशातील पहिल्या नाच्या म्हणून ओळखल्या जातात. चंद्राबाईने पठ्ठे बापूराव तसेच दगडूबाबा साळी यांच्या तमाशात काम केले होते. भाऊ फक्कड, दादू तुळपूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आदी तमाशा कलावंत नाच्ये म्हणून प्रख्यात होते. तमाशात नाच्ये इतके लोकप्रिय असत व ते इतके देखणे असत की तमाशा सुरू होताना 'हिलाळाने` त्यांची दृष्टी काढली जायची.

लोकसंस्कृतीचे उपासक या ग्रंथात डॉ. रा. चि. ढेरे यांनी स्त्री वेशधारी पुरूषाने वठविलेल्या सोंगा बदद्ल विवेचन केलेले आहे ते असे-
''रूप करणे` म्हणजे सोंग आणणे हा वाक्प्राचार यादवकालीन वाङमयात अनेकवार आलेला आहे. सोंग आणि त्यांची संपादणी यांचे उल्लेखही पूर्व काळापासून आढळतात. नाथांच्या गुरूला गुरूबंधू शेख महंमदबाबा श्रीगोदेकर हा निर्गुणोपास-कबिरासारखा मुक्त चिंतक. त्याने सगुणसंकीर्तनाच्या नावावर चालणा-या सर्व प्रकारांवर हल्ला चढविला आहे. देवाचे चरित्र श्रोत्यांपुढे साक्षात उभे करण्याच्या निमित्ताने हरिकथेत जो 'लालम लाल` सादर केला जातो, त्याने विषयदिप अधिकच भडकतो, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. देवचरित्राला नाटयरूप देण्याच्या निमित्ताने, पुरूषाने स्त्रीवेश घेऊन नटण्याचा जो प्रकार त्याच्या काळी रूढ होता, त्यावर त्याने हल्ला चढविला आहे. अशा प्रकारे स्त्रीवेषाने नटणा-याला शेख मंहम्मदाने 'नटया` ('नट` या शब्दाचे तुच्छता दर्शक पुल्लिंगी एकवचनी रूप) असा शब्द वापरला आहे. नटया म्हणजे नाच्या. शेख महंमदाने नटयाचे जे वर्णन केले आहे, ते प्रत्ययकारी आहे-

क्षौर करूनि डोळां काजळ। दिसे स्त्रीहूनि देह ढाळ।
तेथें पाहतां करिती तळमळ। महाव्यसनी उन्मत्त ।।
बाप पुत्र जांवई पिशुन। सासरा भाचा मेहुणा बंधुजन।
नातू चुलता साडू सोयरे सज्जन। पापरूपें पाहाती।।
अवघेचिं पातले चंचल अनुसंधानीं।
मागे सांगितली नातीं गेली मोडूनी।
अवघे काया होत एकमेकांलागुनी। ते ओळखावे श्रोतेजनीं।।
पुरूष स्त्रीरूपे नाटया नटला। पापरूपें सभेनें अभिलाषिला।
तों पापाचा संग्रह प्रबळ जाला। मृगजळ जैसा डोहो।।
नटया देखोनि ईश्वराते ध्यातु। ऐसा विरळ कोणी पुण्यवंतु।
येर भूतें जैसा अवगुणाइतु। टकमकां पाहाती।।


शेख महंमदाने आणखीही एका स्फुटात 'नटया जाणे सोंगें।` अशा शब्दांत नटयाच्या नट कुशलतेचा उल्लेख केला आहे. नाच्या, त्याचे हावभाव आणि त्याच्या हावभावांनी श्रोत्यांवर होणारा शॄंगारिक परिणाम याचे यथातथ्य चित्रण शेख महंमदाने केले आहे. हा नटया अथवा नाच्या प्रामुख्याने राधेचे सोंग घेत असे, असे शहामुनीने केलेल्या उल्लेखावरून उघड आहे. 'सजलिया राधेच्या सोंगास। व्यर्थ विटंबना वुरूशाची।।` अशा प्रकारे त्याने नाच्याच्या राधा-भूमिकेचा उल्लेख 'सिध्दान्तबोधा` मध्ये केला आहे. नटयाच्या राधा-भूमिकेसंबधी रामसुत नामक कवीने आपल्या 'साधुविलास` नामक ग्रंथात विस्तार लिहिले आहे. तो लिहितो-

राधा म्हणजे स्त्रीचा वेश। देवुनिया पुरूषास।
तयाकडूनि नृत्यास ।करउनि वाद्यास वाजविणे।।
ऐस निद्यकर्मालागुन। न पाहती सज्ञान जन।


रामसुताने येथे पुरूषाने स्त्रीरूप घेण्याचा निषेध, त्या निषेधातून काढलेली पळवाट, राधेच्या सेंगाच्या प्रथेचा उगम सांगणारी कल्पित कथा, शिमग्यात झाडणारे तमाशाचे फड, इत्यादी अनेक गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. रामसुत हा गेल्या शतकातील कवी जुने नाव वापरले आहे, हा मुद्दा ध्यानी घ्यायला हवे. याचाच अर्थ असा आहे की, डफगाण्यांच्या कार्यक्रमात, आध्यात्मिक गायनाबरोबरच श्रीकृष्णाची लीला नाटयरूपाने सादर केली जात असे त्या लीलानाटयात पुरूष राधेची भूमिका घेत असे आणि या भूमिकेच्या द्वारा सगुणभक्तीच्या नावाखाली शॄंगाराला पोषक वातावरण निर्माण केले जात असे. याच संदर्भात नाथांची 'वारियानें कुंडल हाले। डोळे मोडित राधा चाले।।` ही चित्तवेधक चित्रमय गौळण आणि विठठ्लनाथाची 'राधे, तुझा रंग पाहूनी। कृष्ण दंग झाला।।` ही रंगभरी गौळण वाचकांनी ध्यानी घ्यावी.

पेशवाईत पूर्णपणे विकास पावलेल्या आणि आज लोकमान्यातेबरोबरच राजमान्यता संपादन केलेल्या शाहिरी रंगभूमीची-तमाशाशी संबंध असलेल्या सर्व प्रकारच्या वाङ्मयाची मुळे यादवकाळाहूनही प्राचीन आहेत, हे यावरू वाचकांच्या ध्यानी येईल. या वाङ्मयाचे गण, गौळणी, डफगाणी व लावण्या परमार्थ सांगितला. संतांची ही शाहिरी कविता समृध्द असून स्वतंत्र अभ्यासाचा विषय होण्याच्या पात्रतेची आहे.``

केवळ तमाशा नव्हे तर नौटंकी (उत्तर प्रदेष), ख्याल (राजस्थान), भावई(गुजराथ) आदी लोककला प्रकारांमध्ये देखील नाच्यांची परंपरा आहे. नाचताना कमरेत बाक आणणारा, केस वाढविणारा आणि डोळे पापण्यांची स्त्रीसुलभ हालचाल करणारा नाच्या भारतातील कोणत्याही प्रयोगात्म लोकशैलीत आपल्या दृष्टीत्पत्तीस येतो. देव-प्रियकर आणि भक्त-प्रेयसी ही मूळ प्रेरणा नाच्याच्या संकल्पनेभोवती असते. शास्त्रीय नृत्यशैलीतील पुरूष नर्तक आणि लोषशैलीतील नाच्या यांची परंपरा स्थूलमानाने एकच असली तरी शास्त्रीय नृत्यशैलीतील पुरूष नर्तकांसारखी मानमान्यता लोककला प्रकारांमधील नाच्याला आजवर प्राप्त झालेली नाही.

नाच्या या संकल्पनेवर मराठीत 'सख्या सजणा` आणि 'नटरंग` हे दोन चित्रपट आलेले आहेत. सख्या सजण्याचे दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी तर नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. नाच्या या व्याक्तिरेखची व्यथा टिपण्याचा प्रयत्न या दोन्ही चित्रपटात झाला आहे. एकूणच नाच्या आणि नाची या दोन्हीही व्यक्तिरेखांना मराठी लोकसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे हे निश्चित.!
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही