नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


आदिवासींच्या आदिकला

Go down

आदिवासींच्या आदिकला Empty आदिवासींच्या आदिकला

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:30 pm

आदिवासींच्या आदिकला 6898_MahaS

लोकसंस्कृती ही प्रामुख्याने ग्रामसंस्कृती म्हणून ओळखली जाते. ग्रामसंस्कृती ही कृषीप्रधान जीवनसरणीवर आधारित आहे. कृषीप्रधान ग्रामरचनेच्या आधी वनसंस्कृती अस्तित्वात होती. आज वनसंस्कृती आणि ग्रामसंस्कृती या समांतर जीवनधाराअस्तित्वात आहेत. वनसंस्कृतीचे स्वतंत्र स्थान भारतीय जीवनसरणीत आहे. या वनसंस्कृतीत हस्तकला, दृककला, लोककला यांचा स्वाभविक विकास झाला. आदिवासींच्या या आदिकलांचे दर्शन आजही आदिवासींच्या वाड्या-पाड्यावर होते. नांदेड,ठाणे, नंदुरबार,धुळे, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली आदि जिल्हे हे आदिवासी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यातील प्रयोगात्मक लोककलांची ओळख आपण करुन घेवू या.

मादळ नाट्य - ठाणे व नाशिक जिल्ह्यातील कोकणा आदिवासी जमाती मादळ नावाचे नाट्य सादर करतात. मादळ हे एक पखवाजासारखे वाद्य आहे. भवानी देविच्या जत्रेत होळीच्या सणाला देविच्या उपासनेसाठी हे आदिवासी नाट्य सादर केले जाते. आदिवासींनी आदिवासीसाठी सादर केलेले आदिवासी नाटक. ! अवकाशाच्या पार्श्वभूमीवर माणसाची रांग उभी राहते. त्यांच्यापुढे मादळवादक मादळ वाजवतो. त्यानंतर पंचमहाभूतांना आवाहन केले जाते. भवानी मातेची प्रार्थना केली जाते. मादळवादक मादळ वाजवत मानवी भिंतीसमोर नाचत असतो आणि मानवी भिंत झुलत त्याच्या गायनाला साथ देते. प्रार्थनारुपी पूर्वरंग संपल्यानंतर मानवी झुलत्या भिंतीतून दोन अंगसोंगे घेतलेली पात्रे समोर येतात. आदिवासींच्या नेहमीच्या जीवनातील हे पात्रे असतात. एक आदिवासी तर दुसरा वनाधिकारी. आदिवासीने जंगलातील लाकुड तोडले म्हणून त्याला पकडलं जातं. त्या दोघात संवाद होतो. अधिकारी त्या आदिवासीला मारतो. असे रोजच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग सादर करीत आदिवासी नाट्य सादर केले जाते. नाटक सादर करणारे भवानी देविचे उपासक नट असतात. हे नाट्य पहायला आलेला प्रेक्षक भक्त असतो. मादळ हे विधी नाट्य आहे. भवानी देविच्या उपासनेसाठी उपासक हे नाट्य उभे करतात. यातील पूजाविधीचा भाग संपल्यानंतर भक्तांच्या रंजनासाठी हे नाट्य सादर करतात. यावेळी उपासक नट असतो तर भक्त प्रेक्षक ! नाटक संपल्यावर नट परत उपासक होतात. प्रेक्षक परत भक्त होतात आणि भवानी मातेची आरती होऊन नादळ नाट्याचा शेवट होतो.

भोवाडा - भोवाडा हे पथनाट्य ठाणे व नाशिक जिल्ह्यातील कोकणा व ठाकर आदिवासी जमातीत भोवाड्याची सोंगे नाचवत केले जाते. भोवाडा हा सर्व गावांचा असतो. गावातल्या प्रत्येक घरात भोवाड्याचे मुखवटे ठेवले जातात.

अक्षयतृतीयेला या भोवाड्याची सुरुवात होते. भोवाडा तीन दिवस चालतो. गावाच्या मुख्यरस्तावर भोवाड्याची चांदणी अर्थात मंडप उभारल्या जाते. भोवाड्यासाठी कागदाच्या लगद्यापासून तयार कलेले मुखवटे रात्री दहा वाजताच्या दरम्यान एकत्र जमतात. संबळ, सनई, ढोल यांच्या तालावर एकेक मुखवटा वाद्यांच्या तालावर नाचत चांदणी खालून जातो. सुरवातीला गणपतीचा मुखवटा नाचवल्या जातो. त्यानंतर सरस्वतीचे सोंग येते. नंतर रामताटी, रावण, काळाई, खंडोबा, हिरवादेव असे मुखवटे नाचवले जातात. पहिल्या दिवसाच्या खेळाला पहिली थाप, दुसर्‍या दिवसाला दुसरी थाप, तिसर्‍या दिवसाला तीसरी थाप म्हणतात. या तीन दिवसात शंभर ते दिडसे मुखवटे नाचवले जातात. प्रत्येक मुखवट्याच्या वादनाच्या सुरावटी वेगळ्या असतात. या चांदणीवरुन मैलभर अंतरावरच्या माणसाला कळते की कोणता मुखवटा नाचवला जात आहे. तिसर्‍या दिवशी दिवस फुटतांना दोन्ही हातात नंग्या तलवारी घेवून जगदंबेचे सोंग चांदणीखाली नाचत येते. येथे जगदंबेचा नैवद्य म्हणून बकरा बांधून ठेवलेला असतो. सोंग बकर्‍याजवळ येते व हातातल्या तलवारीने बकर्‍याचा वध करुन आपला नैवद्य घेते आणि भोवाडा संपतो.

खम - विदर्भातील कोरकु आदिवासी जमातीत खम आदिवासी नाट्य सादर केले जाते. खम हे विधी नाट्य आहे. हे विधीनाट्य ज्या ठिकाणी सादर करायचे असते. ती जागा आधी स्वच्छ करुन तिथे एक खांब रोवल्या जातो. खम म्हणजेच खांब, या खांबावर चक्राचे प्रतिक म्हण्नू बैलगाडीचे चाक बांधले जाते. या चाकाच्या आर्‍यांना शुभ म्हणून आंब्याच्या डहाळ्या बांधतात. या चाकावर लाल कागद टाकून ते आच्छादले जाते. याला रासमंडळ म्हणतात. हे जे छत्र उभारल्या गेले हाच खम नाट्याचा रंगमंच होतो. या आदिवासी नाट्याला सुरुवात होण्यापूर्वी दिंडीच्या गजरामध्ये कलपाचीचे आगमन होते. स्त्री वेशधारी पुरुष कळस डोक्यावर घेवून येतो आणि कलशाची स्थापना खांबाच्या बुडाशी करुन पुजा केली जाते. नंतरच खम नाट्य सादर केले जाते. खम या विधी नाट्यामध्ये पूर्वरंग, उत्तररंग असे दोन प्रकार पडतात. पूर्वरंगाची सुरवात हट्टी बालगणेशाच्या आगमनाने होते. तो रुसुन बसतो. शंकराच्या स्तवनानंतर नाट्यास सुरवात होते. साधू गणपतीची समजूत काढण्याच्या प्रसंगाने नाट्याची सुरवात होते. उत्तररंगाची सुरवात हास्यकारक प्रसंगाने होते. विडा, भुते, मांत्रिक या त्यांच्या जीवनातील प्रसंगाचे दर्शन नाट्यातनू घडते.

वादन - महाराष्ट्रातील आदिवासी जमातीत वेगवेगळ्या प्रकारचे वादनाची परंपरा आहे. जसे - थाळी वादन, डेरा, डफ, किंगरी अशी वाद्य वाजवली जातात.

थाळी वादन - थाळीवादन म्हणजे बात लावणे म्हणजे गोष्ट सांगणे किंवा लावणे. ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासीमध्ये हा कलाप्रकार परंपरेने रुढ आहे. पितळेच्या थाळीच्या मधोमध काळे मेण लावून त्यावर अंबाडीची उंच काडी रुतून ठेवतात. या काठीवरुन दोन्ही हात फिरवून सूर काढल्या जातो. या सुराचा सारखा उपयोग करुन एखादी गोष्ठ काव्यातून सांगीतली जाते. त्यांच्या शेजारी बसलेला होकार्‍या या गोष्टीला होकार देतो. हाकार्‍याच्या साथीने कथाकार गोष्ट सांगतो.

वारली -आदिवासींचा हा एक प्रकारचा प्रवचनकारच ! लग्न, बारसं, घरभरणी, श्राध्द अशा प्रसंगी वारली आदिवासी थाळीवादकाला घरी बोलवतात. पाड्यावरचे आदिवासी त्यांच्या भोवती जमतात. थाळीवादक थाळीच्या सूराच्या सोबतीने रामायण, महाभारत यातील आदिवासी जीवनाशी सुसुगत अशी कथा वारली भाषेत रात्रभर रंगवून सांगतो.

डेरावादन - लालचिकन मातीचा डेरा, त्याच्या तोंडावर सागाची पाने बांधलेली असतात.त्याच्या मधोमध छिद्र पाडून दोरा ओवून त्याच्या टोकाला लांब मोरपीस बांधलेले असते. हा डेरा टोपलीत सडलेल्या भातावर ठेवलेला असतो. डेर्‍याभोवती तांदूळाच्या पिठाने नक्षिकाम काढलेले असते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वाघाला देव मानतात. वाघदेव अंबेचे वाहन. या अंबेच्या उपासनेसाठी डेरा वाद्य वाजवले जाते. वाद्यापासून त्रास होऊ नये म्हणून पाडयाच्या सिमेजवळ वाघाचे ठाणे असते. वारली नवरात्रात घट बसवतात. अंबेच्या उपासनेला सुरवात होते. पाड्यावर डेरा आणल्या जातो. वयोवृध्द स्त्रिया एकत्र येतात. एक बाई मोरपिस हातात धरते. हाताला पाणी लावून मोरपिसावरुन हात फिरवते. डेर्‍यातून वाघाच्या श्वसनासारखा आवाज बाहेर पडतो. पाड्याभर आवाज घुमतो. या सुरावर अंबेची गीतं स्त्रिया म्हणतात. या सुरामुळे वारली पुरुषांच्या अंगात वाघ देवतांचे वारे येते. तो वाघासारखा हाता पायावर उड्या मारत घुमत डेर्‍याजवळ येतो. डेर्‍याचा अंगारा त्याच्या कपाळी, लावला, पाणी सिंपडले की, त्यांच्या अंगातले वारे जाते. शेवटी भगत अंगात वारे घेवून घुमत डेर्‍याजवळ येतो. अंगार्‍याने त्याच्याही अंगातले वारे जाते. शेवटी टोपलीतला नारळ फोडून सर्वांना प्रसाद वाटला जातो. आणि डेरा भगगताच्या घरी ठेवल्या जातो.

डफवादन - मराठवाड्यातील बंजारा आदिवासीमध्ये होळीच्या वेळी डफ वाजवला जातो. मोठ्या आकाराचा गोलाकार बकरीच्या चामड्याने मढवलेला हा डफ खांद्यावर अडकवून दोन्ही हातात काठ्या घेवून हा डफ वाजवतात. डफवादक नृत्यही करतात.

किंगरीवादन - नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी किंगरी नावाचे सागाच्या लाकडापासून बनवलेले वाद्य वाजवतात. त्याला तारा लावलेल्या असतात. व्हायोलीन सारखा धनुष्याकृती बो, त्याला घोड्याच्या शेपटीचे केस लावलेले असते. हा बो किंगरीच्या तारावर फिरवत त्यातून सूर काढून किंगरी वादक गाणे म्हणतो. त्याला डमरुवाला साथ करतो.

आदिवासी नृत्य - आदिवासी जमातीत नृत्याला फार महत्त्व आहे. आदिवासी स्त्री - पुरुष स्वत:च्या आनंदासाठी श्रम विसरण्यासाठी होळी, दिवाळीच्या सणाला तारपा नृत्य, ढोल नाच, गोफनृत्य, ढेमसा, कोलाम, नृत्य, डोंगर देवाचे नृत्य, भिल्ल नृत्य, घुसांडी नृत्य, गौरी नृत्य अशी विविध प्रकारची नृत्ये करतात.

तारपानृत्य - ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी तारपा नृत्य करतात. तारपा हे सुरावाटीचे वाद्य आहे. लाब दुधी भोपळा त्याच्यापुढे ताडाच्या पानापासून बनविलेला कर्णा. वरच्या बाजूला दोन बांबूच्या नळ्या या नळ्याच्या वरच्या बाजूला छिद्र पाडलेलेअसते. नळ्यामध्ये फुंकर घालून सूर काढले जातात. तारपा वाद्याच्या तालावर वारली, ठाकर स्त्री-पुरुष नृत्य करतात. सुगीच्या मोसमात, दिवाळी आली की, या नृत्याला सुरवात होते. तारपावादक तारपा वाजवतो आणि स्त्री-पुरुष एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून तारपावादका भोवती फेर धरुन नाचतात.

ढोल नाच - ठाणे जिल्ह्यातील कोकणा आदिवासीं जमातीत ढोल नाच केल्या जातो. या नृत्यात मोठा ढोल हेच एकमेव वाद्य असते. दिवसभराचा कामधंदा संपवून झाल्यावर पाड्याच्या मध्यवर्ती कोकणा पुरुष जमतात. ढोल्या ढोल कमरेशी बांधतो. नर्तक धोतराचा काचा मारुन व पायात घुंगरु बांधून ढोलाच्या तालावर नाच करतात.

गोफ नृत्य - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी पुरुष गोफ नृत्य करतात. ठाकर आदिवासींचे ठाकोबा हे ग्रामदैवत त्याच्या उत्सवाला किंवा लग्नात गोफ नृत्य होळी पासून वैशाखापर्यंत खेळले जाते. पंचविस फुट उंचीचा खांब मैदानाच्या मधोमध रोवल्या जातो. त्याच्या वरच्या टोकाला विस ते पंचविस दोर्‍या बांधून खाली सोडल्या जातात. ढोल, ताशा, झांज ही वाद्य नृत्यात वापरतात. हा नाच लेक्षीम खेळाप्रमाणे केल्या जातो. लेक्षीम खेळणारे दोरी हातात घेवून एकमेकांना ओलांडून खांबाभोवती फिरतात. लेक्षीमचे वेगवेगळे हात खेळत खांबाभोवती गोफ विणल्या जातो तसेच उलट दिशेने नृत्य करत तो सोडविल्याही जातो.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातीत इतर आदिवासी जमातीत विविध नृत्यप्रकार पाहावयास मिळतात. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी ढेमसा नृत्य, कोलाम नृत्य करतात तसेच होळी, दिवाळी ग्रामोत्सवात घोरपड नृत्य सादर करतात, तर गेंड आदिवासी घुसाडी नृत्य करतात. धुळे जिल्ह्यातील आदिवासी होळी, दिवाळी आणि लग्नाला पावरी नृत्य करतात. तर भिल्ल आदिवासी याच प्रसंगांना भिल्ल नृत्य करतात. धुळ्यातील साक्री तालुक्यातील आदिवासी संपूर्ण महिनाभर डोंगरदेवाच्या पुजेसाठी डोंगरदेवाचे नृत्य करतात. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी गौरी गणपती पुढे रात्रभर गौरी नृत्य करतात. एकमेकाच्या कमरेभोवती हात टाकून नृत्याला सुरवात करण्यापूर्वी धरती, आकाश, सुर्य, चंद्र या पंचमहाभूतांना नमन करुन ढोलाच्या तालावर पदन्यास करत बैठका मारीत गोलाकार नृत्य सुरु होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बडा माडीया व छोटा माडीया या आदिवासी जमातींनीही आपली आदिम परंपरा जपवून ठेवली आहे. माडीया जमात होळीला माडीया नृत्य सादर करते.

अशा विविध रंगा-ढंगात वावरणारा आदिवासी समाजबांधव, आपली परंपरा, कलासंस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. आदिवासींची ही कला संस्कृती महाराष्ट्र तसेच संपूर्ण विश्वासाठी भूषणावह ठरलेली आहे. नागर संस्कृतीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले तरी आदिवासींच्या वनसंस्कृतीचे गहन गूढ अरण्यातच आहे ! आदिवासींच्या या आदिकला देश- विदेशातील जनतेसाठी नेहमीच प्रेक्षणीय ठरल्या आहेत.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही