नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


अळूच्या पानातला मासा

Go down

अळूच्या पानातला मासा Empty अळूच्या पानातला मासा

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:33 pm

अळूच्या पानातला मासा 6775_Mahasan_L

अस्सल खवय्या खाण्यासाठी दूरवर जातो तसा नवनवीन पदार्थ देखील स्वत: बनवून पाहत असतो. मांसाहारी खाणार्‍यांसाठी तर विविध पदार्थ तयार करणे आणि ते खाणे ही एक मोठी पर्वणीच असते. गावाकडे गेल्यानंतर उपलब्ध साधनसामुग्री लक्षात घेवून पदार्थ बनवणे ही एक कला असते. विशेषत: नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळे पदार्थ करणे आणि त्याचा आस्वाद घेतांना जो आनंद मिळतो, तो आनंद इतरांना शेअर करण्याच्या दृष्टीने अळूच्या पानातला मासा हा पदार्थ कसा बनवतात हे सांगत आहे.


साहित्य : कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, २ अळूची पाने, १ कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, १ मोठा चमचा खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, ६ पाकळ्या लसून, १ लिंबाचा रस, मीठ.

कृती : खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.

हा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते. विशेषत: लहान मुलांना हा वेगळा पदार्थ आवडतो. एखाद्या रविवारी वेळ भरपूर असल्यास हा प्रयोग करुन बघण्यास हरकत नाही. आमची मात्र आठवण ठेवा.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही