नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

ग्रंथ गीता

Go down

ग्रंथ गीता      Empty ग्रंथ गीता

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:07 am

ग्रंथ गीता      6546_MahaS

श्रीज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात गीतेची थोरवी सांगतांना ज्ञानेश्वर महाराजांना गीतेबद्दल किती सांगू आणि काय काय सांगू असे झाले आहे. ज्ञानोबा सांगतात, एवं वेदाचें मूळसूत्र सर्वाधिकारैकपवित्र श्रीकृष्णें गीताशास्त्र प्रकट केलें सर्वाधिकाराने संपन्न, पवित्र आणि वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ असे हे गीताशास्त्र भगवान श्रीकृष्णाने प्रकट केले. येथ गीता मूळ वेदां ऐसें पां केवी आले बोधा गीता हे वेदाचे मूळ असे कसे समजले? त्याबद्दलची प्रसिद्ध उपपत्ती ज्ञानोबा पुढे सांगतात. तरी जयाचां निश्वासीं जन्म झालें वेदराशी तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं बोलिला स्वमुखें म्हणौनि वेदां मूळभूत गीता म्हणों हें होय उचित ज्याच्या नि:श्वासात वेदराशी जन्मल्या, तो सत्यसंकल्प भगवान स्वत:च आपल्या मुखाने हे गीताशास्त्र बोलला म्हणूनच गीता ही वेदांना मूलभूत आहे, असे जे म्हटले ते खरेच आहे.

याबद्दल आणखीही एक उपपत्ती आहे. जसा वृक्ष हा बीजामध्ये सूक्ष्मरूपाने असतो तसेच कांडत्रयात्मक वेद हे गीतेत आहेत. तरी काडत्रयात्मकु शब्दराशि अशेखु गीतेमाजीं असे रुंखु बीजीं जैसा म्हणून वेदांचे बीज गीता आहे. एवढेच नव्हे तर ते सहजपणे दिसत आहे. म्हणौनि वेदांचे बीज श्रीगीता होय हें मज गमे आणि सहज दिसतही आहे अलंकार आणि रत्नांनी जसे सर्व शरीर शोभून दिसते तसेच वेदांची ही तिन्ही कांडे गीतेत ठळकपणे, सहजपणे दिसून येतात. असे सांगूनच माऊली थांबत नाहीत, तर त्यापुढील २१ ओव्यांमधून गीतेच्या १८ अध्यायात वेद कुठे आणि कसा आला आहे त्याचे निरुपण केले आहे. त्यानंतर माऊली सांगतात, वेदाने स्त्रीसह बहुजन समेजाला आपल्या ज्ञानाच्या लाभापासून वंचित केले. दूर ठेवले. त्यामुळे तो कृपण ठरला. आपल्या या दोषाचे परिमार्जन करण्यासाठी, सर्वांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी वेद गीतारूपाने श्रमू लागला, राबू लागला.

तरी मज पाहतां तें मागील उणें फेडावया गीतापणें वेदु वेठला भलतेणें सेव्य होआवया आपल्या मागच्या दोषाला भिऊन वेद गीतेच्या पोटात शिरला, कुशीत शिरला. गीता ही सर्वांनाच मोक्षदायिनी असल्यामुळे वेद आता मात्र उत्तम कीर्ती पावला आहे. म्हणून वेदाचे नीट सेवन करण्याजोगे रूप म्हणजे गीता असे ज्ञानोबा सांगतात. यालागीं मागिली कुटी भ्याला वेदु गीतेचां पोटीं रिगाला आतां गोमटी कीर्ति पातला आपण मराठीतून हा ग्रंथ निर्मिला, त्याबद्दल अतिशय नम्रपणे ज्ञानोबा परी गीता ईश्वरू भोला ले व्यासोक्तिकुसुममाला तरी माझिया दूर्वादला ना न म्हणे कीं गीता हा भोळा ईश्वर आहे. तो व्यासवचनांची फुलमाळा धारण करीत असला तरी माझ्या दूर्वांकुरालाही 'नाही' निश्चितच म्हणणार नाही, असा विश्वास प्रकट करतात.

तत्पूर्वी अकराव्या अध्यायाच्या प्रारंभी गीतेची थोरवी बापु ग्रंथु गीता जो वेदीं प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्णु वक्ता जिये ग्रंथीं तेथिंचें गौरव कैसें वानावें जे शंभूचिये मती नागवे तें आतां नमस्कारिजे जीवें भावें हेचिं भलें गीता हा ग्रंथ किती श्रेष्ठ! वेदांची मुख्य देवता भगवान श्रीकृष्ण हा ज्या ग्रंथात वक्ता आहे, त्याच्या थोरवीचे भगवान शंभुमहादेवाच्या बुद्धीलाही आकलन होत नाही, ती कशी वर्णावी? तेव्हा अशा या श्रेष्ठ गीता ग्रंथाला मन:पूर्वक नमस्कार करावा हेच योग्य, अशा शब्दांत ज्ञानोबा सांगतात. आपणही सर्वांना मोक्षदायिनी अशा ह्या श्रेष्ठ गीता ग्रंथाला मन:पूर्वक नमस्कार करूया.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही