नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


कलगी-तुरा

Go down

कलगी-तुरा    Empty कलगी-तुरा

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:31 am

कलगी-तुरा    6199_MahaS

'कलगी' म्हणजे शक्ती. आणि 'तुरा' म्हणजे शिव. कलगीवाले म्हणजे शक्तीपक्षाचे गुणगान गाणारे शाहीर, तर तुरेवाले म्हणजे शिवपक्षाचे गुणगान गाणारे शाहीर. अध्यात्मिक कूटरचना, डफ, तुणतुणे व मंजिरी या वाद्यांच्या साथीने सादर करणार्‍या गायकांची फार मोठी परंपरा महाराष्ट्रात असून नेमके असेच गायक अन्य राज्यांतही आढळतात. गुजरातमधील चारण, राजस्थानमधील लांगा -मांगणियार, छत्तीसगढमधील पंडवानी गायिका, उत्तर प्रदेशातील भाट या व अशा विविध गायकांच्या संस्थांनी भारतीय लोकसंस्कृती समृद्ध केलेली आहे. कलगी-तुर्‍याच्या अध्यात्मिक शाहिरीत जे कूट प्रश्न प्रतिपक्षाला विचारले जातात, त्यात ब्रह्म आधी की माया आधी ? झाड आधी की फळ आधी ? शक्ती आधी की शिव आधी ? अशा स्वरुपाचे प्रश्न असतात. कलगी आणि तुरा हे शाहिरांचे ब्रीद असते व आपण हे ब्रीद मोठ्या समर्थपणे मिरवत असल्याबद्दल त्यांना अभिमान असतो.

महाराष्ट्रात कलगी-तुर्‍याच्या अध्यात्मिक शाहिरीची परंपरादेखील फार प्राचीन आहे. कलगर व तुरा या दोन्ही संज्ञा परकीय भाषेच्या असल्या तरी या संज्ञा स्वीकारुन जी पदे रचली जातात त्यातील अध्यात्मिक आशय मांडण्याची परंपरा मात्र फार जुनी आहे. कवनांच्या रुपाने ते शास्त्रचर्चा करतात. ही करण्यासाठी त्यांनी आपली निराळी रंगभूमी विकसित केली. त्यालाच फड किंवा आखाडा असे म्हणतात. कूट रचनेच्या किंवा भेदिकांच्या स्वरुपाची ही कवने हावभावांसह म्हटली जातात. काही वेळा त्यांचे गद्यातून व संवादांतून स्पष्टीकरणही केले जाते. कलगी-तुर्‍याचीही एक रंगभूमी महाराष्ट्रात परंपरेने चालत आली आहे. मुळात या रंगभूमीचे स्वरुप आणि प्रयोजन अध्यात्मचर्चा करण्याचे त्याचप्रमाणे पौराणिक कथागीते गाण्याचे असले तरी काळाच्या ओघात त्याला रंजनप्रधान रंगभूमीचे स्वरूप आले आहे. भेदिके गाताना शिवपक्ष कसा श्रेष्ठ आहे हे सांगणे किंवा शक्तीपक्षाचे श्रेष्ठत्व सांगणे ही भूमिका लोप पावून त्याऐवजी चमत्कृतिप्रधान रचना करणे, आध्यात्मिक रुपके न योजिता केवळ आपल्या विद्वत्तेचे, बहुश्रुततेचे व रचनाकौशल्याचे दर्शन घडविणे आणि यातून सामान्यजनांना प्रभावित करुन त्यांचे मनोरंजन करणे असेच या रंगभूमीचे प्रयोजन झाले आहे.

कलगी आणि तुरा याचा अर्थ पागोट्यात लावायचा एक अलंकार होय. हे दोन्ही शब्द फारसी भाषेत आढळतात. कलगीवाल्यांना नागेश व तुरेवाल्यांना हरदास म्हणतात. कलगीवाल्यांचे निशाण भगवे तर तुरेवाल्यांचे निशाण हिरवे किंवा पांढरे असते. कलगी-तुर्‍याचे नामरहस्य उलगडण्याचा प्रयत्न लोकसंस्कृतीचे गाढे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केला आहे. तो असा - केरळ मधले कलियाट्टम (कालीनृत्य) शिवशक्तींना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. त्या नृत्याचे अनेक प्रकार असून, त्यातील एकाचे नाव तिर्रायाट्टम असे आहे, कारण ते नृत्य वीरांच्या तर्‍र्यापुढे केले जाते. (तर्रा - चबुतरा, समाधी) अशा वीरस्मारकांना कानडीत कळ म्हणतात. बाजारहाट, कागदपत्र अशा एकार्थक जोड शब्दांप्रमाणेच तर्रा - कळ असा जोडशब्द बनला व त्याला गे हा कानडी प्रत्यय लागून तर्रा - कळगे हा शब्द बनला. तर्रा कळगेचा हा मूलस्त्रोत कालांतराने पूर्णपणे विस्मृत होऊन ध्वनिसाम्याने त्याचा संबंध कलगी तुर्‍याशी जोडला गेला.

तमाशाच्या फडावर हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकतात. व रात्रभर त्यांचे सवाल-जबाब होतात. कलगीवाल्यांनी सवालाची लावणी म्हणायची व तुरेवाल्यांनी जबाबाची लावणी म्हणून शेवटी कलगीवाल्यांना प्रतिसवाल टाकायचा. या स्पर्धेत जो हरेल त्याचे निशाण व डफ दुसर्‍या पक्षाने हिसकावून घ्यायचा, अशी पद्धत आहे.

सवाल-जबाबाच्या या कवनाला भेदिक म्हणतात. भेद म्हणजे रहस्य. अर्थात प्रकृति-पुरुषांच्या रहस्याविषयी ज्यात प्रश्नोत्तरे असतात, ते भेदिक होय. प्रकृती श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, शक्ती श्रेष्ठ की शिव श्रेष्ठ अशा वादातून ही भेदिकांची कवने निर्माण झालेली असतात. कलगीवाले शक्तीला श्रेष्ठत्व प्रतिपादित करतात.

कलगी आणि तुरेवाल्यांच्या लढती एकेकाळी निकराला पोहोचत. काहीवेळा कलगीवाले आणि तुरेवाले परस्परांना शाप देत. एखादा शाहीर या लढतीत हरला तर तो जो शाहीर जिंकला आहे त्या शाहीराने सांगितलेले काम करीत असे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कलगी तुर्‍याच्या शाहिरीचा सुवर्णकाळ होता. याचे वर्णन करणारे हरीभाऊ साळी शिरोलीकर यांचे एक कवन -

माळ्याचा मळा तसा माझा गोतवळा
आहे सर्वांशी लळा ग पहिल्यापासून
त्यात एक एक तर्‍हा जसा गहू हरभरा
अन् हिरकणी हिरा मोती काढू निसून
गंगू हैबती गुणी मूळ गादीचे धनी
राहती चास कमानी ब्रीद कलगीवाला
जशी रत्नाची खाण नित भडके निशाण
रुपा गोंढ्याचा मान नाही वाया गेला

या कवनातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे कलगी-तुर्‍यांच्या लढती होत असत. आळंदीच्या ज्ञानेश्वरांच्या मंदिरात कलगी पक्षाचे पठ्ठे बापूराव आणि तुरेवाले अर्जुना वाघोलीकर यांचा सामना झाला होता. त्यात दोघांनीही एकमेकांना शाप दिले होते, 'तुला भगेंद्र होईल' असा शाप पठ्ठे बापूरावांनी अर्जुना वाघोलीकर यांना दिला होता. तर 'तुझ्या अंतयात्रेला वर्गणी काढावी लागेल' असा शाप अर्जुना वाघोलीकर यांनी पठ्ठे बापूरावांना दिला होता. या दोन्ही गोष्टी दुर्दैवाने खर्‍या ठरल्या. गुरु दगडूबाबा साठी यांनी नामोहरम केल्याने पठ्ठे बापूरावांनी वर्षभर बांगड्या भरल्या होत्या. अशा पद्धतीने कलगी तुर्‍याचे शाहीर हे एकमेकांवर कुरघोडी करत असत. एकमेकांना प्रश्न विचारीत असत व उत्तरे मागित असत.

शुभमंगल चरणी गण नाचना
नाचला कसा तरी पाहू चला हो

या पठ्ठेबापूरावांच्या गणात त्यांनी भाऊ फक्कड यांना प्रश्न विचारला होता - 'गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला यक्षिणीप्रती' अशा पद्धतीने कलगीतुर्‍यात कूटप्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर प्रतिपक्ष देतो. कलगी-तुर्‍याची अध्यात्मिक शाहीरी हा तमाशाचा पूर्वरंग म्हणावा लागेल.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही