नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

प्रवासी पक्षी -कुसुमाग्रज

Go down

प्रवासी पक्षी -कुसुमाग्रज Empty प्रवासी पक्षी -कुसुमाग्रज

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:35 am

गेली सहा दशकं मराठी माणसावर मोहिनी घालणा-या एकाच प्रतिभाशाली साहित्यिकाचे नाव घ्यायला सांगितले. तर वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज या नावाशिवाय पर्याय राहत नाही! 'गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार!' ही त्यांची कविता 1940च्या दशकात स्वातंत्र्य आंदोलनात फासावर लटकणा-या क्रांतिविरांचे हौतात्म्य अजरामर करून गेली. पण क्रांतीची कविता गाणारा हा कवी प्रेमाचं गाणंही तितक्याच मनस्वीपणे गात होता. ‘सरणावरी आज आमची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वालांमधुनी भावी क्रांतीचे नेते...’ असं जुलमी ब्रिटिश सरकारला सुनावणारा हा कवी त्याचवेळी आपल्या प्रियतमेला ‘काढ सखे गळय़ातील तुझे चांदण्याचे हात!’ असंही सांगत होता. ‘आगगाडी आणि जमीन’ यासारख्या कवितांतून भांडवलदारी अर्थव्यवस्थेत होत असलेल्या शोषणाचं चित्रण करणारा हा कवी त्याच वेळी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ही शब्दबद्ध करत होता. कुसुमाग्रजांच्या याच प्रतिभेनं मोहित होऊन वि. स. खांडेकर यांच्यासारख्या त्या काळातल्या ज्येष्ठ साहित्यिकानं पुढाकार घेऊन त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला आणि कुसुमाग्रज हे नाव साहित्यविश्वातलं एक मानाचं पान बनलं.

कुसुमाग्रजांनी जवळपास सहा दशकं कविता लिहिल्या. पण कविता याच एका साहित्य प्रकारापुरतं त्यांनी आपलं लेखन मर्यादित ठेवलं नाही. कथा, कादंबरी, नाटक आणि त्याचबरोबर ललितलेखन अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी मुक्तपणे संचार केला. नटसम्राट आणि ययाती, देवयानीसारखी नाटकं, ऑथेल्लो आणि मॅकबेथ या शेक्सपीअरच्या गाजलेल्या कलाकृतींचे अनुवाद आणि कल्पनेच्या तीरावरसारखी कादंबरी ही त्यांच्या लेखनातील काही मोजकीच उदाहरणं. ‘मराठी माती’, ‘किनारा’, ‘स्वगत’, ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह. या कवितासंग्रहांपैकी छंदोमयी, मुक्तायन आणि पाथेय या तीन संग्रहातील निवडक कवितांचा ‘प्रवासी पक्षी’ या नावानं प्रसिद्ध झालेला संग्रह हा कुसुमाग्रजांच्या अलीकडल्या काळातल्या कविता आपल्यापुढे आणतो.

स्वातंत्र्य मिळून जवळपास चार दशकं उलटल्यानंतरच्या काळातील या कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात हा कवी आंदोलनाच्या, देशप्रेमाच्या आणि तळागाळातल्या माणसावर होणा-या अन्यायाविरोधात पेटून उठणा-या कविता लिहीत होता. त्यातून तत्कालिक सामाजिक परिस्थितीचं दर्शन जसं घडत होतं, त्याचबरोबर कवीची आशावादी वृत्तीही त्यातून प्रगट होत होती. स्वातंत्र्यानंतरच्या चार दशकांनी परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. राजवट बदलली पण सर्वसामान्य माणसाची व्यथा-वेदना मात्र कायमच राहिली. भ्रष्टाचार फोफावला आणि त्यामुळे सामान्य माणसाचे जिणे अधिकच कठीण होऊन गेले. त्याबद्दलची चीड या कवितांमधून पानोपानी दिसून येते. मग वैतागलेला माणूस हा अध्यात्माकडे वळू पाहतो, तर ते क्षेत्रही भ्रष्टाचारानं तितकंच ग्रासलेलं. इथले साधू कुसुमाग्रजांना कसे दिसतात?

यांच्या लंगोटीला, झालर मोत्यांची,
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

कवीचा हा रोखठोक बाणा वाचकांना अर्थातच भिडतो. त्यामुळे माणूस पुन्हा प्रस्थापित राजकीय नेत्यांकडेच वळतो. तर तेथेही जातिभेद आणि गैरव्यवहार यांचा बुजबुजाट झालेला. जातिभेद नष्ट करण्यासाठी जे नेते झगडले, त्यांच्यावर आता एकेका जातीनं मालकी प्रस्थापित केलेली बघून कवी व्यथित होतो. ही ‘अखेर कमाई’ नावाची छोटेखानी कविता मुळातूनच वाचायला हवी.
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे
एका चौथऱयावर बसले आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो माळय़ांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठय़ांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळय़ातील गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फक्त
सरकारी कचे-यातील भिंती!

अगदी मोजक्या शब्दांतून अचूक आशय व्यक्त करणारी ही कवीची शैली, त्याचवेळी सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं नेमकं भान हे या कवितांचं वैशिष्टय़. अर्थात कुसुमाग्रजांच्या लेखनातून ही सारी वैशिष्टय़ं यापूर्वीच सामोरी आली होती. प्रा. शंकर वैद्य यांच्या नेटक्या संपादनातून ‘प्रवासी पक्षी’ हा आपल्याला कुसुमाग्रजांच्या लेखनाचा आणि वैचारिक प्रवासाचा नेमका वानोळा देऊन जातो.

प्रकाश अकोलकर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही