नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Go down

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज Empty श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:36 am

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 6148_MahaS

श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील अलीकडील काळातील सत्पुरुष. त्यांचा शिष्य परिवारही मोठा आहे. राम भक्ती हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू असल्याचं जाणवतं. त्याचप्रमाणं उपदेशपर रचनाही समाजाला अध्यात्मप्रवण नि भक्तिप्रवण करणारी आहे. दास किंवा दिनदास ही त्यांची नाममुद्रा असून ती त्यांच्या लेखनात पदोपदी आढळते.

आपला उद्धार करुन घेण्यासाठी व आयुष्य सार्थकी लावण्यासाठी साधकानं काय करावं? त्यासाठी अन्य साधनं शोधण्याची गरज नाही. त्याचा उपाय तुमच्या जवळच आहे व तो आहे तुमचं मन. हे मन सतत भरकटत असतं. षड्विकारांनी ते ग्रस्त होत असतं. त्यामुळं आपण सन्मार्ग सोडून वाहावत जातो. यासाठी या मनाला वळण नको का लावायला? म्हणून महाराज म्हणतात की, तुम्ही या मनाला तुमच्यावर सत्ता गाजवू देऊ नका, तर तुम्हीच त्याच्यावर नियंत्रण ठेवून आपली सत्ता गाजवा व मोक्षाचे अधिकारी व्हा.

मनाचिया मागे जाऊं नका तुम्ही। येतो आतां आम्ही कृपा करा।।१।।
शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी। संसारजाचणीं पडूं नका।।२।।
रामपाठ तुम्हां सांगितला आज। आणिकाचे काज नाही आतां।।३।।
नित्य पाठ करीं माणगंगातीरीं। होसी अधिकारी मोक्षाचा तूं।।४।।
ब्रह्मचैतन्य नाम सद्गुरुचे कृपें दीनदास जपे राम सदा।।५।।

पण मनावर व विकारांवर नियंत्रण ठेवूनही कर्मकांड करीत बसायचं का? व्रतवैकल्यं करीत बसायचं का? यज्ञयाग करीत बसायचं का? तीर्थयात्रा करायच्या का? सामान्य माणसाला आपली कर्म पूर्ण करीत व आपल्यावरील जबाबदार्‍या पार पाडीत सोपी भक्ती करायची आहे व ती कशी करावी, हे गोंदवलेकर महाराज कसं सांगतात ते पाहा -

श्रीराम म्हणा मुखीं राम म्हणा मुखीं। तेणे सर्वसुखी होशील तूं।।१।।
रामनाम सार वेदांचा आधार। सांगितला सार संतजनी।।२।।
याहुनी साधन कलीयुगीं नाही। जो जपे पाही सर्वकाळ।।३।।
धन्य तो जगीं होय रामदास। संसारी उदास असोनीया।।४।।
दीनदास सांगे तुम्ही हेंचि करा। तुमचिया घरा राम येई।।५।।

अशा प्रकारे रामदास म्हणजे देवाचा दास, भक्ती व नामस्मरण करून कसा धन्य होतो ते वरील रचनेत महाराजांनी किती प्रभावीपणे प्रतिपादिलं आहे! मृत्यू हा तर अटळ आहे. त्याच्यापासून कुणी कुणाला वाचवूच शकत नाही. या जन्ममृत्यूच्या यातायातीतून सुटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रामाला -परमेश्वराला शरण जाणं. यासाठी महाराज स्वत:च देवाची करुणा भाकतात, विनवणी करतात. त्यानं आपला अधिक अंत पाहू नये, असं ते म्हणतात. या म्हणण्यामागं तुम्ही-आम्ही असाच देचावा धावा करावा, त्याची करुणा भाकावी, हा त्यांचा संकेत व संदेश आहे.

काय माझा रामा पाहातोसि अंत? काय मी पतित करुं आतां ?।।१।।
हिरा टाकूनिया गारा देसि हाती। तेथे माझी मति काय चाले।।२।।
सांडोनिया नाम दाखविसी काम। काढिं माझा भ्रम रामराया।।३।।
दीनदास तुज येतो काकुळती। शुद्ध करीं मति रामराया।।४।।

श्री गोंदवलेकर महाराजांचा राम म्हणजे समर्थांप्रमाणं आत्मारामच आहे. तो निर्गुण, निराकार असून सर्वव्यापी आहे. त्याची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. चारही वर्णांना आहे, हेही ते आवर्जून सांगतात. त्यामुळं कोणताही सामाजिक घटक भक्ती करण्यापासून वंचित राहू शकत नाही, हाही फार महत्त्वाचा समतावादी विचार महाराजांनी प्रतिपादिला आहे. त्यामुळं आपण यमाचे पाहुणे होणार नाही !

जनी वनी माझा आहे रघुनाथ। भक्ताचे अनर्थ वारीतसे।।१।।
वारिलें सांकडे अहिल्या सतीचे शापमोचनाचें दु:ख वारी।।२।।
काशीपुरी जेणे वाहिली विमानी रामनामध्वनी गर्जे वाचा।।३।।
चहूं वर्णालागी नामाचा अधिकार। भवसिंधु पार तरावया।।४।।
दीनदास म्हणे कलियुगीं रहाणें। यमाचे पाहुणे होऊ नका।।५।।

अशा प्रकारच्या आत्मकल्याणाचा मार्ग आपणच प्रथम सांगत नसून तो मार्ग पूर्वीच्या ज्ञानदेव, एकनाथ, रामदास आदी संतांनी सांगितला आहे. यासाठी त्यांच्याविषयीचा आदरभावही महाराजांनी पुढील रचनेत प्रतिपादिला आहे -

यथार्थ ते ज्ञान झाले माझे मनी। सांगोनिया वाणी तुका गेला ।।१।।
गेले ते संत नाथ, ज्ञानेश्वर। सांगितले सार तुम्हालागी।।२।।
रामदास सांगे उपदेशाची मात। दासबोध ग्रंथ रचियेला।।३।।
संताचिया खुणा संतचि जाणती। येर ते नेणती आत्मतत्त्व।।४।।
जाणत्या नेणत्या होय समाधान। करावें चिंतन दास म्हणे।।५।।
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही