नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


व्हाय नॉट आय? - वृन्दा भार्गवे

Go down

व्हाय नॉट आय? - वृन्दा भार्गवे Empty व्हाय नॉट आय? - वृन्दा भार्गवे

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:40 am

व्हाय नॉट आय? - वृन्दा भार्गवे 5992_MahaS

वास्तव हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं, हेच खरं! फक्त त्या वास्तवातलं नाट्य त्या वास्तवातला संघर्ष हा आपल्याला दिसायला लागतो. आपल्या सभोवताली इतक्या विलक्षण आणि चित्तचक्षुचमत्कारी घटना घडत असतात की त्यामुळे आपण पदोपदी थक्क होऊन जात असतो. पण आपण आपल्याच विश्वात गुरफटलेलो असतो. केवळ स्वत:पुरताच क्षूद्र विचार करत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्याच बाहेर डोकावून पाहायला फुरसतही नसते.

‘मी, माझ्यासाठी...’ असं म्हणत आपण दुसर्‍याकडे जरा डोळे उघडून बघायलाही तयार नसतो. पण सृजनशील कलावंताचं मोठेपण हेच की तो स्वत:पलीकडे जाऊन विचार करतो. त्यातही पुन्हा तो लेखक संवेदनशील असला, तर त्याला त्या आपल्या पलीकडल्या जगात घडणार्‍या घटनांमधील सृजनाची बीजं ही थेट येऊन भिडतात आणि तत्काळ तो त्या अनुभवांना तुमच्यापुढे साकार करून मोकळा हेतो. अर्थात, हे अपवादानेच घडते. सगळ्याच कलावंतांना ते जमतेच असं नाही. लाखांत एखादंच चित्र मोनालिसाचं ठरतं, लाखात एखादाच सर लॉरेन्स ऑलिव्हए तो शेक्सपिअरचा हॅम्लेट रंगमंचावरून थेट तुमच्या अंतर्मनात पोहोचवू शकतो. लेखकाचंही तसंच असतं. शेकडोंनी पुस्तकं बाजारात येत असतात पण तुमच्या मनाला भिडणारं लेखन कितीजण करू शकतात?

खरं तर त्या लेखकांनं अनुभवलेलं ते प्रसंग, ते जीवन तुम्ही-आम्ही सार्‍यांनीच बघितलेलं असतं. पण त्यातून एखादी विलक्षण कलाकृती निर्माण करण्याचं सामर्थ्य क्वचितच कोणाच्या हातात असतं.

‘व्हाय नॉट आय?’ या आपल्या ग्रंथातून वृन्दा भार्गवे यांनी हे काम करून दाखवलं आहे. वृन्दा भार्गवे हे नाव मराठी वाचकवर्गाच्या विशिष्ट वर्गात चांगलंच परिचित आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’पासून ‘लोकसत्ता’पर्यंत आणि ‘सकाळ’, ‘लोकमत’पासून ‘मिळून सार्‍याजणी’पर्यंत अनेक वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं आहे. त्यांचा एक कथासंग्रह आणि एक अनुवादित ग्रंथ यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. पण 'व्हाय नॉट आय?' या पुस्तकातून त्यांनी आपल्याला एका वेगळ्याच अनुभवविश्वात नेऊन ठेवलं आहे. हा अनुभव वास्तवातला आहे. पण स्वत: अनुभवलेलं हे वास्तव चित्रित करताना वृन्दा भार्गवे यांच्या इतपत तरल आणि भावगर्भ रंगशैलीचा वापर अलीकडल्या काळात क्वचितच कोणी केलेला असेल. त्यामुळेच ‘अंधारावर उजेड कोरणार्‍या मायलेकींची ही कहाणी’ आपल्या मनाचा पुरता ठाव घेऊन जाते.

'व्हाय नॉट आय?' या पुस्तकाची वन लाइन स्टोरी अगदीच साधी-सुधी आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे सात वर्षांच्या एका पाणीदार डोळ्यांच्या मुलीची दृष्टी जाते. वैद्यकीय अनास्था आणि हलगर्जीपणा यांच्या कहाण्या रोजच्या रोज वर्तमानपत्रांतून वाचायला आणि टीव्हीच्या शेकडो चॅनेल्सवर बघायला मिळत असतानाच्या या काळात या घटनेनं खरं तर आपल्या मनावर एखादा ओरखडाही उठणं कठीण. पण खरी कहाणी या घटनेनंतरच सुरू होते आणि ती शब्दांकित करावी असं वृन्दा भार्गवे यांना का वाटलं, ते त्यांनी ‘उजेडयात्रा’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या छोटेखानी मनोगतात सांगून टाकलं आहे. ‘जन्म आणि मृत्यू यातील अवकाश म्हणजे जगणं. ते निकोप, निरभ्र असावं, ही प्रत्येकाचीच इच्छा. जगण्याला व्याधीची, व्यंगाची वाळवी लागली की ओझ्याचं आयुष्य घेऊन चालावं लागतं... पण काहींना आक्रोश करून, वेदनेचे असंख्य गुणाकार पानापानांवर पेरतं राहणं आणि दुसर्‍याला व्याकूळ करून बधिर बनवणं नको वाटतं...’ सात वर्षांची देवू आणि तिची आई यांनी नेमकं हेच ठरवलं आणि त्यातूनच एका जिद्दीचा प्रवास सुरू झाला.

मुंबईच्या एका उपनगरात वृन्दा भार्गवे यांना ‘दु:खानं मगरमिठी मारलेल्या’ या दोन मायलेकी भेटल्या. पण त्या दु:ख कवटाळून बसल्या नव्हत्या. त्यांना आपल्या दु:खाचं, आपल्यावरील आघातांचं प्रदर्शन करून लोकांची कोरडी सहानुभूती मिळवण्यात रस नव्हता. देवूच्या वाट्याला नियतीनं दिलेल्या जीवनाचा मार्ग बदलवून टाकण्याची जिद्द तिच्या आईत होती आणि खुद्द देवू तर ‘मोडून पडला कणा...’ तरी लढायला तयार होती. त्यातूनच देवूचं उभं जीवन बदलून गेलं आणि शोकांतिकेचं रूपांतर सुखात्मिकेत झालं. ही जिद्द आणि उमेद, संघर्षाला सामोरं जाण्याची ही ताकद, हे बळ आपल्यात का नाही, असा प्रश्न ‘व्हाय नॉट आय?’ हा ग्रंथ आपल्या मनात उभं करतो आणि एक ईर्षा आपल्या मनात जागवतो.

देवूच्या या जीवनप्रवासातील अनुभव जितके दाहक आहेत, त्याहीपेक्षा या अनुभवांशी लढा देऊन पुढे जाण्याची देवूची विजीगिषु वृत्ती अधिक तेजस्वी आहे. हे देवू आणि तिच्या आईचं जसं यश आहे, त्याचबरोबर वृन्दा भार्गवे यांचंही. त्यामुळेच हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही