नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


हरितालिका

Go down

हरितालिका           Empty हरितालिका

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:52 am

हरितालिका           5685_Mahas
नुकतीच हरितालिका तृतीया साजरी करण्यात आली आहे. हरितालिका हे स्त्रियांनी आचरण्याचे व्रत असून, कुमारिका आणि सौभाग्यवती जन्मोजन्मी मनासारखा पती मिळावा म्हणून या दिवशी उपवास करुन हरितालिकेची आणि तिच्या सखीची पूजा करतात. हरितालिका म्हणजेच पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती. हिचा विवाह श्रीविष्णूशी करुन द्यावयाचा, असा तिच्या पित्याचा आणि इतर वडीलधार्‍यांचा विचार होता. पार्वतीची इच्छा शिवशंकराशीच आपला विवाह व्हावा अशी होती. विष्णूशी विवाह केल्यास प्राणत्याग करु असे सांगून पार्वती आपल्या सखीबरोबर घरातून निघून गेली आणि अरण्यात राहून शंकराची उग्र उपासना करु लागली. तिच्या कठोर पतश्चर्येने शंकर भगवान प्रसन्न झाले व या दोघांचा विवाह झाला. प्राचीन काळी विवाहासारख्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या प्रसंगात उपवर मुलीला आपली पसंती वा नापसंती वडीलधार्‍यांना स्पष्टपणे कळविण्याचा अधिकार होता आणि तशी रूढीही होती, हे शिवपार्वतीच्या विवाहाप्रमाणेच, कृष्ण-रुक्मिणी, अर्जुन-सुभद्रा इत्यादी अनेक उदाहरणांवरून कळून येणारे आहे.

आपल्या इतिहासपुराणांत अशा अनेक प्रेमकथा अंतर्भूत आहेत. स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ही त्या काळात निकोप होती आणि त्या वेळी स्त्रीच्या मतस्वातंत्र्याला समाजाची मान्यता होती. विश्वनाथ महादेव आणि जगनमाता पार्वती यांचा विवाह म्हणजे जगातील पहिला विवाह समजला पाहिजे. तो प्रेमविवाह होता आणि तो वधूच्या निवडीप्रमाणे पार पडला होता. मधल्या काळात मुलींच्या संमतीचा विचार न करता त्यांना कोणाच्याही गळ्यात माळ घालावयास लावीत. पाऊणशे वयमान असलेला जरठ विधुर केवळ आर्थिक संपन्नतेच्या जोरावर सतरा वर्षांच्या कोवळ्या कुमारिकेशी विवाह करी. त्या काळच्या दुष्ट रुढींमुळे घाबरलेल्या कुमारिका पार्वतीचा आदर्श नजरेसमोर ठेवून तिच्याप्रमाणेच आपल्याला इच्छित वर मिळावा, अशा हेतूने हे व्रत करीत आल्या असाव्यात.

पूर्वी कित्येक समाजांत श्रावण शुद्ध तृतीया, श्रावण कृष्ण तृतीया आणि भाद्रपद शुद्ध तृतीया अशा तीन वेगवेगळ्या दिवशी हे व्रत करीत असत. या दिवशी हरितालिकेची पूजा आणि उपवास करण्याची प्रथा आहे. हरितालिका देवीच्या आरतीत शिवपार्वती मिलनाची कथा अंतर्भूत आहे.

जय देवी हरितालिके सखि पार्वती अंबिके
हरअर्धांगी वससी जाशी यज्ञा माहेरासी तेथें अपमान पावसी
यज्ञकुंडी गुप्त होसी जय देवी हरितालिके सखि पार्वती अंबिके
आरती ओवाळीत्यें ज्ञानदीपकळीके रिघसी
हिमाद्रीच्या पोटीं कन्या होसी तूं गोमटी
उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी तापपंचाग्नीसाधनें
धूम्रपानें अधोवदनें केलीं बहु उपोषणे शंभु भ्रताराकारणे
लीला दाखविसी दृष्टी हें व्रत करिसी लोकांसाठी
पुन्हां वरिसी धूर्जटी मज रक्षावे संकटी काय
वर्णू तव गुण अल्पमति नारायण मातें दाखवीं
चरण चुकवावें जन्ममरण

इथे नारायण हे कवीचे नाव आहे. कवीने स्वत:ला विनयाने अल्पमति नारायण असे म्हणवून घेतले आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही