नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 0 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 0 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


रानातल्या कविता- ना. धों. महानोर

Go down

रानातल्या कविता- ना. धों. महानोर Empty रानातल्या कविता- ना. धों. महानोर

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:55 am

रानातल्या कविता- ना. धों. महानोर 5652_Mahas
महानोर हे आपल्या अद्भूत अशा शेतीमुळे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ कार्यक्रमामुळे साहित्यबाह्य विश्वातही ख्यातकीर्त आहेत. महानोरांनी कविता केल्या, अजिंठ्याच्या पायथ्याशी राहणे झाल्यामुळे याच विस्मयकारी लेण्यांच्या परिसरात घडलेल्या एका खर्‍याखुर्‍या प्रेमकहाणीला कादंबरीरूप दिलं, शिवाय साहित्याचे अन्य बाजही त्यांनी तितक्याच लीलया हाताळले... तरी शेतीत रमणारं त्यांचं मन त्यातून बाहेर येऊ शकलं नाही.

या शेतानं लळा लावला असा असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो- रडलो.
आता तर हा जीवच अवघा, असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.

महानोरांचा अवघा जीवच जेव्हा त्या शेतातल्या हिरव्या बोलीचा शब्द होऊन गेला, तेव्हा त्यातून व्यक्त होणार्‍या जाणीवा आणि संवेदना या किती तरल असतील, हे सांगण्याचीही गरज नाही. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या छोटेखानी संग्रहातील ६४ कविता या मुळातून वाचल्याशिवाय त्यातील भावभावना आणि गोडवा हा थेट आपल्यापर्यंत पोहोचणे कठीणच आहे.

महानोरांच्या या कविता रानातल्या आहेत आणि रानातलं सौदर्य जसं त्या आपल्याला उलगडून दाखवत जातात, तसंच रानातली दु:खही आपल्या कानावर घालत जातात. रानात वावरताना सतत महानोर सभोवतालच्या निसर्गाकडे अत्यंत जिव्हाळ्यानं बघताना दिसतात. त्यामुळेच

पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

या ओळींचा दाखला देऊन प्रख्यात समीक्षक वा. ल. कुलकर्णी म्हणतात : 'हा कवी खरोखरच जागोजाग झाडाझुडपांशी, पाटबंधार्‍यांशी, गुरावासरांशी, पाखरांशी, मेघांशी खेळ मांडून गातो आहे. त्याला खरोखरच शब्दगंधाने बाहूत घेतले आहे...`

महानोरांनी १९६० ते ६६ या काळात या कविता लिहिल्या. मराठवाड्यातल्या दूरच्या भागात, अजिंठ्याच्या पायथ्याशी बसून महानोर निसर्गाची विविध रूपं पाहत होते आणि त्यातून नाना प्रकारच्या प्रतिमा त्यांच्या भोवती सतत भिरभिरत होत्या. अनेकदा त्या स्त्री देहाच्याच होत्या. त्यातूनच 'ज्वार उभार गर्भार` अशी लख्ख प्रतिमा महानोर उभी करून गेले.

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले...

या अवघ्या दोन ओळीतून महानोर पुढे काय घडत जाणार आहे, ते आपल्याला सांगून जातात आणि घडतही नेमकं तसंच जातं.

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातून बोलविले
भरात येऊनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

आणखी एका कवितेत ते लिहून जातात :

- अश्शी लखाखली बोर अंगभर चंदकोर
उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर

पण रानातल्या शृंगाराची इतकी आरस्पानी वर्णनं करणार्‍या महानोरांनी याच रानातलं दु:खही तितक्याच थेटपणे शब्दबद्ध केलं आहे.

नांगरून पडलेली जमीन सर्वत्र. नुसताच शुकशुकाट
एखादेच चुकार वासरू कुठेतरी. उद्ध्वस्त घाट.

या अवघ्या दोन ओळींतून महानोरांनी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍याच्या मनातला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला आहे.

ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही
कोरड्या डोळ्यात आता थेंब नाही

या शब्दांचा अर्थ कळून घेण्यासाठी महानोरांप्रमाणेच शेतात राहायला हवं. महानोरांनी सारी प्रबोधनं टाळून पळसखेड्यातील शेतातच गेली पाच सहा दशकं राहणं पसंत केलं. आमदार नामदार झालेला, 'जैत रे जैत`सारख्या सिनेमाची गाणी लिहिणारा, शरद पवार-लता मंगेशकर-जब्बार पटेल यांच्यासारख्यांचा मित्र असलेला माणूस हा सहजासहजी मुंबई-पुण्यात वास्तव्याला येऊ शकला असता. पण महानोरांनी ते केलं नाही. कारण त्यांना साद घालत होते 'पक्षांचे लक्ष थवे` आणि त्यातूनच 'गगनाला पंख नवे` फुटल्याचा साक्षात्कार त्यांना होत होता.

अख्खा संग्रह वाचून झाल्यावर महानोर आपल्याला सांगतात :

जन्मापासूनचे दु:ख जन्मभर असे
जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे

त्याचं कारण महानोरांच्या शब्दांत

'....तेव्हा माझे रान-
रानातली झाडे मला फुले अंथरूण!`
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही