नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


सायन्सची आर्ट

Go down

सायन्सची आर्ट Empty सायन्सची आर्ट

लिखाण  Admin on Mon May 14, 2012 1:16 am

तरुण वैज्ञानिकांची गरज दिवसेंदिवस वाढतच आहेत. बेसिक सायन्स घेऊन या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनाही चांगली पॅकेजेस आणि परदेशात काम करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतायंत. यामुळेच बेसिक सायन्सची गोडी असलेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या संधी मिळतील , त्यासाठी कशी तयारी करावी याविषयी माहिती देण्यासाठी ' महाराष्ट्र टाइम्सने ' राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन खास तुमच्यासाठी ...

बीएआरसीमधील काही कोर्सेस

डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स , एमएसस्सीनंतर एक वर्ष

डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटॉपिक टेक्निक्स

डिप्लोमा इन रेडिएशन मेडिसिन

फिजिक्स , मॅथ्समधील पदवीधरांसाठी दोन वर्षांचा एमएसस्सी इन मेडिकल फिजिक्सचा अभ्यासक्रम

बायोलॉजीमधल्या संधी

बायोलॉजी आधी खूप ' डिस्क्रीप्टीव्ह ' होतं. पण आज ते प्रत्येक क्षेत्राशी निगडित झालंय. त्याचं स्वरुप आता खूप बदललंय. प्रत्येक क्षेत्राला याचा स्पर्श आहेत. अॅप्लिकेशन ओरियंटेड झालं आहे. यामुळे साहजिकच यातील संधी वाढल्या आहेत. आपल्या देशातच सुमारे पाच हजार शास्त्रज्ञांची गरज आहे. इंडस्ट्रीला लागणारी कौशल्यं कोणती आहेत ती लक्षात घेऊन ती आत्मसात केली तर भरपूर संधी मिळू शकते.

स्टेटसवाल्या स्कॉलरशीप्स

प्युअर सायन्सला कोण विचारतो ? हा समज साफ चुकीचा आहे. तसंच , ही खूप खर्चिक शाखा असल्याचा आणखी एक समज आपल्याकडे आहे. परंतु , सायन्समध्ये करिअर करणाऱ्यांना स्कॉलरशीपचा पर्याय उपलब्ध असतो. बारावीपासून पीएचडीपर्यंतचं शिक्षण स्कॉलरशीपवर करता येऊ शकतं. या स्कॉलरशीप मिळवल्या की विद्यार्थ्याला वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळं स्टेटसही मिळतं. यामुळे भविष्यातील संधी त्याला लवकर मिळू शकतात.

होमी भाभा उपक्रम

होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरमध्ये एनआययूएस हा उपक्रम राबवला जातो. बारावी ते ग्रॅज्युएशन या दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना सहा सुट्ट्यांमध्ये एकाच प्रोजेक्टवर रिसर्च करण्याची संधी मिळते. मुळात बीएसस्सी करताना हा कामाचा अनुभव तुम्हाला मिळाला तर , तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर सायन्स ऑलिम्पियाड हाही एक चांगला उपक्रम आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी संधी असून शाळेत असल्यापासून विद्यार्थ्याला विज्ञानाची गोडी निर्माण होते. टेक्स्टबुकमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सायन्सपेक्षा खूप अधिक आणि वेगळं सायन्स शिकण्याची संधी या ऑलिम्पियाडच्या माध्यमातून मिळते.

संशोधनाची आवड हवी...

संशोधन म्हणजे फक्त पेपरवर काहीतरी लिहिणं नव्हे. अनेकदा काही प्रॅक्टिकल गोष्टींवरही संशोधन केलं जातं. ० संशोधनात कोणत्याही प्रकारची तीव्र स्पर्धा नाही.
करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
आवडीच्या गोष्टी करायला मिळतात.
संशोधन हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. यात निर्मितीचा आनंद मिळू शकतो.
तुमच्या आदर्शांची निवड करणं सर्वात महत्त्वाचं असतं.
जास्तीत जास्त प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. त्यातूनच न वनवीन गोष्टींचे शोध लागू शकतात.
आपला मुद्दा दुसऱ्याला पटवून देण्याचं कौशल्य तुमच्यात असायला हवं. संशोधन प्रेझेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

इतर कौशल्यही आत्मसात करा

केमिस्ट्रीवरचा रिसर्च आणि मग जॉब हे समीकरण आता बदलंलय. यामुळेच संशोधन करतानाच इतरही कौशल्य आत्मसात करणं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. वेगवेगळी आणि अचूक माहिती मिळवणं , प्रभावी संवादकौशल्य , पेटंटबाबतची माहिती असणं , फारच आवश्यक आहे. वीएसस्सीला आपल्याच विषयाचा अभ्यास करतानाच , विषयाला पूरक अशा अॅड ऑन कोर्सचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. या कोर्समुळे संशोधन , उद्योग क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. याचबरोबर केमिकल इंडस्ट्री , फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा विकास होतोय. अनेक नवनवी बायोटेक औषधं बाजारात येतायत. यामुळे फार्मा उद्योगाला केमिस्ट हवे आहेत. बायोटेकचं ज्ञान असलेले ग्रॅज्युएट्स , पोस्ट ग्रॅज्युएट्सची गरजही पुढे वाढतच जाणार आहे.

डॉ. रमेश साने , मानद संचालक , खालसा कॉलेज

संशोधनाकडे लक्ष द्या

एखाद्या गोष्टीचं पेटंट घ्यायचं तर तुमचं संशोधन त्या तोडीचं असायला हवं. म्हणजे ते करणारा विद्यार्थी हा संशोधनामध्ये रस असलेला हवा. विद्यार्थीही पेटंटसाठी सहज अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सायन्सचं शिक्षण घेताना पेटंटबाबतची बेसिक माहिती ठेवणं यासाठीच गरजेचं बनलंय. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट म्हणजे काय ? कॉपी राइट्स , ब्रँड राइट्स काय असतात ? त्यांचं पालन कसं करायचं ? याबाबतची अपिल वगैरे कशी फाइल करायची ? पेटंटचा अर्ज कसा लिहायचा ? ते ' डिफेंड ' कसं करायचं ? या गोष्टींची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असायला हवी. पेटंटचे दोन प्रकार आहेत , प्रोडक्ट पेटंट , प्रोसेस पेटंट. प्रोसेस पेटंट तुलनेने कमी घेतली जातात. मुळात पेटंट फाइल करण्याबाबत एक भीती अनेकांच्या मनात असते. ती काढून टाकली पाहिजे. कारण , तरच संशोधनाला चालना मिळणार आहे.

नोकरीवालं करिअर

विषय कोणताही असो , त्यात प्राविण्य मिळवलं की सारं सोपं होतं. सायन्समध्ये फिजिक्स , केमिस्ट्री , मॅथ्स या तिन्ही विषयांना महत्त्व आहे. विषयाची निवड सुरूवातीलाच करणं खूप महत्त्वाचं असतं. उदा. फिजिक्स घेतलं तर त्याबरोबर मॅथ्स घेतलं पाहिजे. शिवाय मुलांना यापैकी कोणत्या विषयाची आवड आहे हे पालकांनी सर्वप्रथम जाणून घ्यायला हवं. तुमच्याकडे नॉलेज चांगलं असेल तर नोकरी मिळणं सोपं जातं. मुंबई युनिव्हर्सिटीत एमएस्सी फिजिक्सला आठ विषयांचे पर्याय आहेत. प्युअर सायन्सनंतर नोकरीचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत. बीएड केलं की ज्युनिअर कॉलेजला तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करू शकता. नेट-सेटची परीक्षा दिली तर डिग्री कॉलेजला प्राध्यापक होता येतं. प्राध्यापक म्हणून काम करताना आवडत्या विषयात संशोधन करण्याचा पर्याय असतो. बीएआरसीसारख्या संस्थेकडे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. फिजिक्स घेतलेलं असेल तर तुम्हाला भरपूर पर्याय आहेत. पायलट व्हायचं असेल तर फिजिक्स , मॅथ्सचं बेसिक नॉलेज असावं लागतं. लष्करात शिक्षक म्हणून किंवा सीडीएस(कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस)मध्ये नोकरीची संधी मिळते. बीएसस्सी करताना सोबत अनेक कोर्सेस करण्याची संधी मिळते. प्युअर सायन्स हा नोकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
डॉ. विजय पवार , प्राध्यापक सिद्धार्थ कॉलेज

बायोटेक की बीटेक ?

बायोटेकमध्ये अनेक शाखा येतात. दोन्हीतला नेमका फरक सांगायचा झाला तर बीटेकमध्ये क्वांटिफिकेशनला महत्त्व आहे. तर बायोटेकमध्ये थिअरॉटिकल अभ्यासावर भर दिला जातो. दोन्हीला स्कोप खूप आहे. मात्र , विद्यार्थ्यांनी ज्या इन्स्टिट्युटमध्ये यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आहेत त्या बघून त्याच संस्थांमध्ये अॅडमिशन घ्यावी. त्यातही जर निवडायचं असेल तर थिअरॉटिकल बॅकग्राऊंड असलेल्या बायोटेकची निवड करायला हरकत नाही. कारण थेअरीवच्याच आधारावर आपण नवी संशोधनं करू शकतो.

डॉ. सिद्धिविनायक बर्वे , उपसंचालक सायन्स रिसर्च सेंटर , केळकर कॉलेज

विद्यार्थ्यांनी अपडेट राहायला हवं

जग झपाट्याने बदलतंय. दहा वर्षांपूर्वीच्या संधी आणि आताच्या संधी यामध्ये खूप फरक पडलाय. यामुळे विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहणं गरजेचं आहे. बारावीपासूनच तुमचा रस लक्षात घेऊन करिअरसाठी प्रयत्न केलेत तर नक्कीच यशस्वी होणार. टीआयएफआर दरवर्षी २५ शाळांमधल्या शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांना आपल्याकडे आमंत्रित करते. तिथे त्यांना सायन्सविषयी , यातल्या नवनव्या ट्रेंड्सविषयी माहिती करून दिली जाते. आमच्याकडे कॅम्प भरवले जातात. पालकांनी नुसते चांगले क्लासेस शोधण्यासाठी पायपीट करण्यापेक्षा रिसर्च संस्थांमध्ये जावं , तिथून माहिती घ्यावी.

डॉ. अमोल दिघे , प्राध्यापक , टीआयएफआर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही