नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty दोन जीवांची नाती ...

लिखाण  vinayasawant on Tue Jun 12, 2012 1:41 am

दोन जीवांची नाती
सांगे विश्वाची महती
दोन जीव हे वेगवेगळे
दोन ठिकाणी जन्म घेती
परी एकत्र नांदती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ...

कोण कोठला 'तो' अन्
कोण कोठली 'ती'
एकमेका साथ देती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ...

कधी रडणे कधी रूसवा
कधी भांडण कधी अबोला
परी एकमेकाविना न राहती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ...

संसार रथाची दोन चक्रही
मानूनी बंधने युगयुगांची
एकमेका सवे चालती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ...
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty रंग

लिखाण  vinayasawant on Mon Jun 11, 2012 2:38 am

ती बसली होती एका कोपर्यात
रंगहीन अदृश्य होंउंन
नुकताच ओघळला होता
गेला होता एक रंग तिला सोडून

मला रहायचय असच
अशा विचारात होती
असच ठेवायचे कोर मन
स्वतालाच समजावत होती

नाही काढायचे चित्र नवे
नाही भरायचे नवे रंगही
नाही भीरभीरु द्यायचे वेड्या मनाला
ना ऊमटूं द्यायचे त्यात तरंगही

असे काही दिवसही गेले
उठल्या मनावर काही रेघा, ओरखडे
तिचा निर्धार पक्का होता
तिला तोच रंग हवा होता

ऊडाला होता विश्वास तिचा
त्या श्रुष्टिच्या चित्रकारावरचा
माझाच रंग मला असा का
सोडून दुसर्या चित्रात जावा ? ?

मी सजवले होते मज़े सुंदर चित्र
भरले होते त्यात मोजकेच रंग
नको होती मला इंद्रधनूची झळाळी
नाही हवे होते रंग चंदेरी सोनेरी

आता ती सगळे सोडून बसली होती
तिच्या मनाचा कोरा कागद तसाच जपत होती
त्यावर पडू पहानार्या प्रत्येक रंगाला
ती स्वताहून दूर लोटत होती

एकदा आला तिच्याकड़े रंगांचा राजा
तोच तो सर्वा रंगानी भरलेला रंग पांढरा
तिच्या कळत नकळच
तो तिच्या कोरेपणात पूर्ण मिसळून गेला

त्याचाही होता पक्का निश्चय
द्यायचे होते तिला पूर्ण रंग नवे
फ़ुलवायचे होते त्याच मनावर
तेच मोजक्या रंगांचे चित्र नवे

कोरेपणाचाही असतो रंग पांढरा
असतात त्यातच तर सर्व रंगांच्या छठा
वेडे एक एक रंग उलघडून पहा
पुन्हा मिळेल तोच रंग हरवलेला

ह्या जगात चित्र असली जरी वेगवेगळी
तरी रंगमात्र सगळे सारखेच असतात
कुणाचे हरवले असले तरी
शोधले तर त्याच्या लाख छठा मिळतात

सात रंगानी बनलेली ही दुनिया
सात रंग सर्वांमधे असलेली ही दुनिया
तरी स्वताचा कोरेपणा जपणारी ही दुनिया
सर्वाना सगळे रंग देणारी ही दुनिया

तू ही उचल हवा तो रंग
उठूदेत तुझ्या मनात पुन्हा नवे तरंग
सजव तुझे चित्र सोडून कोरेपणा
पहा ज़रा या नव्या छठा

शेवटी सगळे कोरेच राहते
त्या मुळेच आत्ता रंगायच
हवा तो रंग हव्या त्या छठेत
आपले चित्र रंगवायाच

आता शेवट माहिती नाही
पण पांढर्या रंगाचा वेडा विश्वास आहे
रंगवेल ती तिचे चित्र पुन्हा
सापडेल तिला हावी असलेली त्या रंगाची छठा

आणि तो..

तो निघाला पुन्हा त्याच वाटेने
शोधायला असाच कोरेपणा
द्यायला पुन्हा रंग नवे
फुलवायला पुन्हा नव्या तिला
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty आभास हा......

लिखाण  vinayasawant on Mon Jun 11, 2012 2:32 am

कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty निर्मिती

लिखाण  vinayasawant on Sun May 20, 2012 3:00 am

एक सुंदर फुल उमलायचे होते त्याला,
काटयांच्याही सहवासात सुगंध द्यायचा होता सर्वाना,
हजार भ्रमरे अवतीभवती पण निष्ठा मात्र काटयांवरती,
तीक्ष्ण असे सल टोचती परी आयुष्य सुकर हे त्यांच्याभोवती,
दुक्ख त्यांचे कुणी न जाणती मनापरीस सारे त्यांसी खुंटती,
तरी धेय्य त्यांचे एकची "गंध" उरता मागे मरणा मग ते कवटाळती......
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty जीव दंगला गुंगला रंगला असा......

लिखाण  vinayasawant on Sun May 20, 2012 2:27 am

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ


जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू


मागे vinayasawant याद्वारे Mon Jun 11, 2012 2:23 am या वेळेस संपादित केल्या गेले; 1 वेळा
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

लिखाण  vinayasawant on Sun May 20, 2012 1:51 am

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू…हिरव्या चाफ्याच्यापाकळ्यात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
जरी तू…कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात Empty Re: कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

लिखाण  Sponsored content


Sponsored content


वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही