नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


तुझी छकुली

Go down

तुझी छकुली Empty तुझी छकुली

लिखाण  vinayasawant on Sun May 20, 2012 2:42 am

भातुकलीच्या खेलामधाली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडिला अधूरी एक कहाणी

आज आई हे गाण गात होती...... पण का ? कारण तिची राणी जी काही दिवसानी या जगात पावुल ठेवणार होती एक सुन्दर विश्व पाहणार होती एका मुलीच्या रुपात, तिला ती कायमची गमावणार होती म्हणून. हो आजच आईला कळल की तिच्या गर्भाशयात वाढतय ते तिचच दुसर रूप पण तरीही ती आज उदास होती. याच कारण माहितीय का तुम्हाला? हो, हेच खर आहे आज आई - बाबानी ठरवल मला अबोर्ट करण्याच का तर मी एक मुलगी आहे म्हणून. खुप रडू येत होत मला, वाटत होत की आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडाव. पण आत्ता तर ते कधीच शक्य नाही होणार. कारण या जगात पावुल ठेवाण्या आधीच माझ अस्तित्व संपलेल असेल. वाटत होत आईला सांगाव "अग आई मला पण जगायच आहे" अगदी तुझ्यासारखच, पण कस सांगू मी तिला? कारण तिची राणी आयुष्य जगण्या आधीच काळ पडद्याआड़ जाणार होती.

का माझ्या आई - बाबानी मला मारून टाकण्याचा निर्णय घेतला? का तर मी त्यांचा वंश पुढे चालवू शकत नाही फ़क्त एवढ्यासाठीच? का तर मी त्यांचा मुलगा नाही म्हणून? का तर मला पोसन्याची त्यांची ऐपत नाही म्हणून? का तर मी त्यांच्या डोक्यावरच फ़क्त एक ओझ म्हणून? किती सारे प्रश्न पडले मला पण उत्तर काही केल्या सापडले नाही. आज प्रत्येकाला मला आई, बायको, बहिण तर गर्लफ्रेंड सुद्धा म्हणून स्वीकारण शक्य आहे पण मुलगी म्हणून नको...... अस का??? आज एवढा मोठा निर्णय घेताना माझे आई - बाबा हे कसे विसरले की त्यांचही अस्तित्व एक स्त्री मुळेच आहे. जिने त्याना जन्म दिला, वाढवल, चांगले संस्कार दिले आणि या जगात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मग तोच अधिकार ते मला का मिळवून देऊ शकत नाहीत? या विचाराने वाटल बाप्पाशी खुप भान्डाव, त्याच्यावर रागवाव की जर हे असच होणार होत तर त्याने माझ अस्तित्व तरी का निर्माण केल? का? फ़क्त प्रश्न आणि प्रश्नच होते.

आज पिढ्यांपिढ्या असच चालत आल आहे. नेहमीच स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो का तर ती पुरूषाप्रमाणे बलवान नाही, कठोर नाही तर तिला नेहमीच एक नाजुक, सहनशील आणि अबला मानल जात. जी जन्माला आल्यापासून कधी मुलगी, कधी बहिण, कधी बायको तर कधी आई या रुपात सगळ्याच गोष्टी तटस्थपणे सहन करत असते अगदी न डगमगता मग ती स्त्री अबला कशी? आपला वंश पुढे चालावा म्हणून नेहमीच एक मुलाला प्राधान्य दिल जात आणि तेवढच दुर्लक्ष्य प्रत्येक मुलीकडे केल जात. जी मुलगीच एखाद्या घराच्या वंशजाला जन्म देण्यास कारणीभुत असते. किती विचित्र आहे ना पण हीच सत्य परिस्थिति आहे ज्याच अप्रूप आत्ता कुणालाच वाटेनास झाल आहे.

प्रत्येक स्त्रीच हेच कर्तव्य आहे की जन्माला आल्यापासून ते मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने फ़क्त इतरांसाठीच जगायच, जगायच आणि जगायच बस्स. "चुल आणि मूल एवढीच भूमिका तिची" यापलीकड्च विश्व कधी तिला जगताच नाही आल. तिच्या इच्छा, आकांक्षांचा कधी कुणी विचारच केला नाही. सगळ्यानाच याचा विसर पडलाय की तिला सुद्धा या जगात मानाने जगायच आहे, स्वताहाची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पण ते शक्य आहे का? देऊ शकतो का आपला समाज प्रत्येक स्त्रीला स्वताहाची ओळख? हो नक्कीच, फ़क्त गरज आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची. अगदी सोप्प आहे, जर प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिल आणि तिला योग्य तो सन्मान दिला तर..... पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक पुरुषाच्या मनात ही भावना रुजेल की आपणही एक भाऊ, एक पति, एक मित्र आणि एक चांगला बॉयफ्रेंड म्हणून तिच्यासाठी (स्त्री साठी) काही तरी देण लागतो.

आजच्या स्त्रीमध्ये देखिल पुरुषांप्रमाने कर्तुत्व करून दाखवण्याची कुवत आहे आणि म्हनुनच सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा हिरहिरीने पुढाकार असतो. त्यांच्या याच कुवतीला गरज आहे ती फ़क्त तुमच्या साथीची. आज जर मुलींच हे घटत प्रमाण थांबवायाच असेल तर सर्वच आई - वडिलानी सुजाणपणे निर्णय घेतले पाहिजेत. अशी आशा बाळगते की सगळे या गोष्टीचा गाम्भिर्याने विचार करतील आणि यापुढे कोणतेच आई - बाबा माझ्या आई - बाबांसारखे आपल्या मुलीला अबोर्ट करणार नाहीत. जाता जाता आईला फ़क्त एक निरोप द्यायचा आहे.

मला दूर करू नकोस आई
तुझ्याविना माझे अस्तित्वच नाही
कारण मला जगायच आहे
हे सुंदरस जग पहायच आहे
तुझ बोट धरून चालायच आहे
बाबांकडे हट्ट धरून रागवायाच आहे
आजीच्या छान गोष्टी ऐकायच्या आहेत
आजोबांच्या मिश्या ओढायच्या आहेत
दादा बरोबर खेलायाच आहे
ताईची खोड काढून पलायच आहे
असच हसायच, बागडायच आहे
शिकून खुप मोठ व्हायच आहे
होइन मी तुझी शान
वाटेल तुला माझा अभिमान
वाढेन मी तुझ्या छत्रछायेत छान
देशील ना ग मला जीवनदान
कारण मला जगायच आहे
जगायच आहे
हे सुंदरस जग पहायच आहे

ऐकतेयस ना ग आई ????

तुझी छकुली
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही