नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


मन हे माझे वेडे.....

Go down

मन हे माझे वेडे..... Empty आठवण त्याची आली....

लिखाण  vinayasawant on Tue Jul 03, 2012 1:29 am

आठवण त्याची आली,
अन डोळ्यांची पापणी ओली झाली,
हसता हसता डोळे भरले,
अन दोन मोती डोळ्यात तरळले,
त्याचीच वाट ते पाहत होते,
काय माहित त्या वेड्या आसवांना?
नेमके कुणासाठी ते वाहत होते,
खूप समजावलं त्यांना,
म्हटलं नका असे ओघाने वाहू,
तो परतेल या आशेवर नका असे राहू,
आहे कुणी तरी त्याच्या वर माझ्या इतकाच प्रेम करणार,
त्याचा त्रास पाहून एकटच एकांतात रडणार,
ऐकताच ते हुंदाक्यानाही रडू आले,
म्हणाले विसरू नकोस अग तुलाही मन आहे,
त्यानाही उत्तर मिळाल परतीच,
म्हटलं ते दोन क्षण सुद्धा अनमोल आहेत,
त्याचे सुख पाहून माझी ओंजळ भरून वाहे.....
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 31
Location : Mumbai

वापस वरती Go down

मन हे माझे वेडे..... Empty एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

लिखाण  vinayasawant on Thu Jun 28, 2012 1:32 am

एकदा
का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातला प्रत्येक स्वाद
मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे

ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 31
Location : Mumbai

वापस वरती Go down

मन हे माझे वेडे..... Empty एक सखा हवा......

लिखाण  vinayasawant on Thu Jun 14, 2012 1:35 am

एक सखा हवा माझ्या गप्पात रंगणारा,
खट्याळ बोलण्यावरी माझ्या खुदकन हसणारा,
एक सखा हवा माझ्या भावना ओळखणारा,
शब्द मुके होता नयनांची भाषा जाणणारा,
एक सखा हवा मजवर उगीच रागवणारा,
अश्रू गळताच घट्ट मिठीत घेणारा,
एक सखा हवा मजवर प्रेम करणारा,
हळूच कधी येऊन केसात गजरा माळ्णारा,
एक सखा हवा आयुष्यभर साथ देणारा,
ठेच लागताच मला नेहमी सावरणारा,
एक सखा हवा मज संगे चंद्र तार्यांच्या विश्वात रमणारा,
दमून भागून झोपी जाता मला गुपचूप न्याहाळणारा,
एक सखा हवा आयुष्याची शिदोरी ठरणारा,
एक सखा जो जन्मो-जन्मी फक्त माझाच होऊ पाहणारा.....
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 31
Location : Mumbai

वापस वरती Go down

मन हे माझे वेडे..... Empty मन हे माझे वेडे.....

लिखाण  vinayasawant on Sun May 20, 2012 2:50 am

मन हे माझे वेडे
नेहमी ओढ़ घेई त्याच्याकडे
पण कळे न हे मनाला
प्रेम माझे सांगू कसे मी त्याला ???
मनाशी एकदा निश्चय केला
होशील का साथीदार माझा विचारायचे त्याला
पण धीर कही होइना
मनातले ओठाबाहेर येइना
शेवटी त्यानेच घातला विषयाला हात
म्हणाला सांग ना काय आहे तुझ्या मनात??
ऐकून ते मन झाले कावरे - बावरे
काय सांगू हे मलाच न कळे
मिटले डोळे अन घेतला श्वास
विचारल आहे ना तुझा माझ्यावर विश्वास ???
होकार त्याचा ऐकताच वाटल जिंकल मी जगाला
तू सोबत असताना कुणाची पर्वा कशाला ???
सगळ चांगल घडत असताना
मधेच माशी शिन्कावी
अन त्याला भेटायला त्याची प्रेयसी यावी
तिला पाहून मन माझे गहिवरले
सुंदरस स्वप्न हे क्षणातच ढासळले
या मैत्री मागचे प्रेम त्याला कधीच नाही कळले
तेव्हाच जीवनाचे खर रहस्य मला उलगडले
केले जरी एखाद्यावर प्रेम जिवापाड
ठेवावे जपून ते मनाच्या पडद्याआड़
मग राहते ते हृदयात सुखरूप
अन देते आयुष्याला नवे स्वरुप......
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 31
Location : Mumbai

वापस वरती Go down

मन हे माझे वेडे..... Empty Re: मन हे माझे वेडे.....

लिखाण  Sponsored content


Sponsored content


वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही