नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


सचिनचा असाही ‘पुजारी’!

Go down

सचिनचा असाही ‘पुजारी’! Empty सचिनचा असाही ‘पुजारी’!

लिखाण  Admin Mon May 14, 2012 1:41 am

सचिनचा असाही ‘पुजारी’! Sach10

सचिनचा भक्त असलेला कोलकात्याचा कृष्णेंदु सिन्हा आगळ्या पद्धतीने आपल्या देवाची पूजा करतो आहे. त्याने गेल्या २२ वर्षांपासून संग्रह केला आहे तो सचिनची छायाचित्रे आणि लेखांचा. आज त्याच्याकडे १0 हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे आहेत. याशिवाय गेल्या १५ वर्षांत सचिनच्या नावाचे जेवढेही लेख वृत्तपत्रांत किंवा विविध मॅगझिन्समध्ये छापून आले आहेत ते कृष्णेंदुजवळ उपलब्ध आहेत. कोलकात्यात एका मॅचच्या कव्हरेजसाठी गेलो असताना या अवलीयाची भेट झाली.
कृष्णेंदुने १९९0मध्ये पहिल्यांदा सचिनला खेळताना पाहिले, तेव्हा तो आठ वर्षांचा होता. तेव्हापासून सचिन त्याला भावला. सचिनचा फोटो कुठेही सापडला, तर तो त्याच्या नजरेतून सुटू शकत नाही. तो त्याचा संग्रह करू लागला. ही माहिती गोळा करण्यासाठी त्याला त्याच्या आई-वडिलांनीही मदत केली. एवढेच नव्हे, तर परिसरातील वृत्तपत्रविक्रेतेही कृष्णेंदुच्या ‘सचिनप्रेमा’ला जाणतात. त्यामुळे सचिनचे छायाचित्र वृत्तपत्रात छापून आले, की ते त्याला कळवतात. कृष्णेंदुला सचिनच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. त्याची आकडेवारी, त्याचे विक्रम तर त्याच्या तोंडावर आहेत.
सचिनचा जन्मदिवस तर तो एखाद्या मोठय़ा सणासारखाच साजरा करतो. या दिवशी तो सजून-धजून केवळ केकच कापत नाही, तर परिसरातील मित्र-परिवाराला मिठाई वाटतो.
झोपण्यापूर्वी सचिनचा ‘नामजप’!


कृष्णेंदु एलआयसीमध्ये कामाला आहे. कार्यालयातून आल्यावर तो जेवण करतो. जेवणानंतर सचिनवरचा एखादा लेख वाचतो आणि झोपण्यापूर्वी त्याच्या नावाचा जप करतो.

अखेर स्वप्न पूर्ण झाले! : आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना शुक्रवारी (दि.११) ईडन गार्डन्सवर झाला. या सामन्यापूर्वी कृष्णेंदुने सचिनची ड्रेसिंग रूममध्ये काही मिनिटे का होईना भेट घेतली. या भेटीत त्याने सचिनला त्याचे एक भले मोठे छायाचित्र आणि त्याच्या संपूर्ण जीवनावर आधारित असलेली एक डीव्हीडी भेट दिली. या स्वप्नवत भेटीमुळे त्याच्या आनंदालाही पारावार उरलेला नाही. कारण, डोळ्यांसमोर ज्याचा चेहरा तासन्तास असतो, त्या भगवंताची भेट आजपर्यंत झाली नव्हती, तो सचिनला कधी भेटला नाही आणि त्याने त्याचा ऑटोग्राफही घेतला नाही. तरीही गेल्या २२ वर्षांपासून त्याने ‘ईडन’वर सचिनचा त्याने एकही सामना सोडला नाही.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही