नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


जून २०१२ - राशिफल

Go down

जून २०१२ -  राशिफल  Empty जून २०१२ - राशिफल

लिखाण  Admin on Thu Jun 07, 2012 12:26 pm

मेष
आपल्या राशीच्या धनस्थानातून रवि-शुक्राचे होणारे भ्रमण आपली आवक वाढविणारे राहील. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. बुध-शुक्राची युती लेखक, साहित्यिक, वकील, कवी, कलाकार, गायक, वादक यांना आपापल्या क्षेत्रात चांगल्या संधी देणारी आहे. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नोकरी-व्यवसायात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आपले तत्त्व सोडून कोणतेही काम करु नका. घरात मंगल कार्याची नांदी होईल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. लाभस्थानातून चंद्र नेपच्यूनची युति होत आहे. कवींना नवकाव्य स्फुरेल. आध्यात्मिक उन्नती होईल. लेखक, साहित्यिक, गायक यांना चांगल्या संधी लाभतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. पुढे घडणार्‍या घटनांची चाहुल लागेल. सूचक स्वप्ने पडतील. हातून दानधर्म होईल. बुध-हर्षलचा होणारा केंद्रयोग गैरसमज निर्माण करणारा राहील. आपल्या बोलण्यावर ताबा ठेवण्याची गरज आहे. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. तसेच कुटुंबातील वयस्कर व्यक्तिंच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. धनस्थानातील गुरु व उत्तरार्धात पराक्रमस्थानी येणारा रवि आपला आर्थिक उत्कर्ष करणारा राहील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.

वृषभ
आपल्या राशीतील बुध-शुक्राची युति वैयक्तिक उत्कर्षास पूरक आहे. कौटुंबिक वातावरण अतिशय उत्साहाचे राहणार आहे. चांगल्या घटना घडल्यामुळे उत्साहाला उधाण येईल. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. जिभेवर साखर पेरणी करुन आपले ध्येय साध्य करण्यात यश येईल. राशीतील रवि आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला ठसा उमटविणारा राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतून चांगले यश मिळेल. मनाजोग्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळेल. नवीन कार्यशाळांचे आयोजन करता येईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे प्रवास घडून येतील. रचनात्मक कार्यक्रमातून फायदा होईल. ४ तारखेला रवि-शुक्राची होणारी युति वकील, कवी, वे, गायक, कलाकार यांना पूरक फलदायी राहील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. रेंगाळलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. रंग, फर्निचर, केमिकल्स या क्षेत्रातील व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. तरुणांना नोकरीत सुसंधी चालून येतील. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ४ तारखेला बुध तर १४ तारखेला रवि आपल्या धनस्थानी येत आहे. हे ग्रहमान आपली आवक वाढविणारे राहील. उष्णतेचे विकार, नेत्रविकार याकडे दुर्लक्ष करु नका. नवीन व्यावसायिक करार होतील. २१ तारखेला सुखस्थानातून पंचमस्थानी मंगळाचा प्रवेश होत आहे. धाडसी कामे केली जातील.

मिथुन
वक्री शनि आपल्या राशीच्या सुखस्थानात आला आहे. त्यामुळे कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. कुटुंबात एकमेकांमध्ये काही कारणांनी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता राहते. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार रेंगाळतील. नवीन वास्तु अथवा जमीन खरेदी संबंधीचे व्यवहारात विलंब होईल. आपल्या पूर्वनियोजित उपक्रमात बदल करावे लागतील. व्ययस्थानातील गुरु कामानिमित्त प्रवास घडविणारा राहील. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. १ तारखेला व्ययस्थानी होणारी बुध-शुक्राची युति लेखन, साहित्याचा तसेच कलेचा ओढा वाढविणारी आहे. कलाकारांना चाहत्यांची चांगली दाद मिळेल. चंद्र-राहूची युति आपल्या कार्यातून प्रसिद्धी वाढविणारी आहे. सामाजिक पत उंचावेल. परंतु मनाला हुरहुर वाटणारी एखादी घटना घडल्यामुळे मन अस्वस्थ होईल. ६ तारखेला व्ययस्थानी होणारी रवि शुक्राची युति आपला खर्च वाढविणारी आहे. सामाजिक पत उंचावेल अशी खरेदी कराल. चैनीच्या वस्तू तसेच सोने खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून महिला सहलीत सहभागी होतील. वडिलधार्‍या व्यक्तींकडून आकर्षक भेटवस्तू मिळेल. ४ तारखेला बुध तर १४ तारखेला रवि आपल्या राशीत प्रवेश करीत आहेत. नवीन करार होतील. नवीन कार्यारंभ यशस्वी होतील. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांसाठी पूरक ग्रहमान आहे.

कर्क
महिन्याच्या सुरवातीलाच बुध-शुक्राची युति आपल्या राशीच्या लाभस्थानातून होत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या भरभराट करणारे हे ग्रहमान आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. तसेच व्यवसाय - उद्योगाच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्यात यश येईल. विविध व्यावसायिक उपक्रम राबविले जातील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद मिळेल. सुग्रास भोजनाचे योग येतील. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. तरुणांना अनेक चांगल्या संधीचा फायदा घेता येईल. लेखक साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. सरकारी पुरस्कार मिळतील. नवोदित कलाकारांना यशोमार्गावरुन वाटचाल करता येईल. ६ तारखेला रवि-शुक्राची होणारी युती सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढविणारी आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीतून लाभ होतील. संततीकडून सुवार्ता कानी येईल. १0 तारखेला आपल्या अष्टमस्थानातून होणारी चंद्र नेपच्यूनची युति पुढे घडणार्‍या घटनांची चाहूल देणारी आहे. सूचक स्वप्ने पडतील. महिन्याच्या उत्तरार्धात व्ययस्थानी जाणारा रवि प्रतिस्पर्धी वाढविणारा राहील. व्यवसाय उद्योगात मोठय़ा युक्तीने निर्णय घ्यावे लागतील. कामाचा व्याप वाढेल. नेत्रविकारांचा त्रास होईल. त्याकडे दुर्लक्ष करु नका. डॉक्टर, वकील, वे यांना पूरक ग्रहमान आहे. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह होतील. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा राखून ठेवावा लागेल.

सिंह
आपल्या राशीतील मंगळापुढे धाडसी निर्णय घेतले जातील. दशमस्थ गुरु नोकरी व्यवसायात सुसंधी देणारा राहील. महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या राशीतील मंगळ धनस्थानी कन्या राशीत प्रवेश करीत आहे. तर तेथेच शनि वक्री होऊ न आलेला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ओढाताण होऊ शकते. जुनी येणी वसूल करताना नाकीनऊ येतील. स्थावर मालमत्तेतून गैरसमज निर्माण होऊ शकतात, वादंग उद्भवू शकतात. सप्तमस्थ नेपच्यूनमुळे विवाहेच्छूक तरुणांचे विवाह जमविताना पूर्ण चौकशी करण्याची गरज आहे. दशमस्थानी होणारी बुध-शुक्राची युति उद्योग-व्यवसायात नवीन करार घडवून आणेल. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. मौल्यवान वस्तूंचे व्यापारी, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, रंग, फर्निचर, केमिकल्स संबंधीचे व्यावसायिकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. ६ तारखेला होणारी रवि-शुक्राची युति व्यावसायिकांना सरकारी परवाने मिळवून देईल. रेंगाळलेली सरकारी कामे प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्याने मार्गी लागतील. नवीन कार्यारंभ केले जातील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नती होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. कवि, कलाकार, लेखक यांना आपल्या चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. खेळाडूंना क्रिडाक्षेत्रात सुसंधी लाभतील. गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. महिन्याच्या सुरुवातीला होणार्‍या ग्रहणामुळे मनस्ताप होण्याची शक्यता राहते.

कन्या
या महिन्यातील मुख्य ग्रहपालट म्हणजे आपल्या राशीच्या व्ययस्थानात इतके दिवस ठाण मांडून बसलेला मंगळ आपल्या राशीत प्रवेश करीत आहे व तेथेच शनि देखील आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचार करण्याची गरज आहे. बुध-शुक्राची भाग्यस्थानातून होणारी युति नवीन व्यावसायिक करारातून फायदा देणारी राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. परदेशस्थ संस्थांशी होणारे व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक तजवीज करण्यात यश येईल. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. तरुणांना नोकरीत सुसंधी लाभतील. नवीन परिचय होतील. बड्या व्यक्तींच्या सहकार्याने काही कामे मार्गी लागतील. कामाची पूर्वनियोजित आखणी केल्यामुळे अवघड कामे देखील विनासायास पूर्ण होतील. कामानिमित्त परदेशप्रवास होतील. महिला दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतील. सहलीत सहभागी होतील. तसेच सांस्कृतिक कार्यात सक्रीय सहभाग घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पहात होता ती बातमी महिन्याच्या उत्तरार्धात कानी आल्याने समाधान लाभेल. शनि-मंगळामुळे मात्र भाजणे, कापणे यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे कोणतेही काम करताना सतर्क राहावे.

तुळ
महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ जून रोजी आपल्या राशीच्या अष्टमस्थानी बुध-शुक्राचा युतियोग होत आहे. अनपेक्षित धनलाभ होतील. आपली आवक वाढेल. शेअर्स, रेस, सट्टा या मार्गातून लाभ होतील. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना आपले तत्त्व बाजूला ठेवलेत तर लाभ होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. हितशत्रूच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जाल. विरोधकांना आपली मतं पटवून देण्यात यश येईल. ६ तारखेला अष्टमस्थानी होणारी रवि-शुक्राची युति सरकारी नोकरदारांना तसेच उच्च पदस्थ अधिकारी वर्गाला फायदा करुन देणारी राहील. नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. या महिन्यातील चंद्रग्रहण मनस्वास्थ बिघडविणारे राहील. गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. २१ जून रोजी आपल्या राशीच्या लाभस्थानातील मंगळ व्ययस्थानात शनिबरोबर जात आहे. शनि-मंगळाचा व्ययस्थानातून होणारा योग आपल्या वैयक्तिकदृष्टीने अनुकूल नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमात अनपेक्षित बदल करावे लागतील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. गुप्तशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. लेखक, साहित्यिक, पत्रकार, संपादक यांना चांगल्या संधी लाभतील. आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर मोठी मजल मारता येईल. व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना चांगल्या संधी लाभतील.

वृश्चिक
आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणारी बुध-शुक्राची युति उद्योग - व्यवसायात तसेच भागीदारी व्यवसायातून लाभ करुन देणारी राहील. नवीन कार्यारंभ होतील. स्त्री सहकार्‍यांकडून मदतीचा हात पुढे येईल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कामाचा व्याप वाढेल. नवनवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक तरतूद करणे शक्य होईल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना आपापल्या क्षेत्रात लाभ होतील. सामाजिक पत उंचावेल. सुसंधी लाभतील. चाहत्यांकडून आपल्या चांगल्या कामाची दाद मिळेल. रवि-शुक्राचा होणारा शुभयोग प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यातून लाभ करुन देईल. सरकारी परवाने हाती येतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यवसाय-उद्योगासाठी कर्ज मिळेल. सप्तमस्थ गुरु विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरविण्यास अनुकूल फलदायी राहील. मनाजोगा जोडीदार मिळेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. कुटुंबात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. या महिन्यातील चंद्रग्रहण मनस्वास्थ बिघडविणारे राहील. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. या महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या कर्मस्थानातील म्हणजेच सिंह राशीतील मंगळ कन्या राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हा व्यवसाय उद्योगातून सामाजिक पत वाढेल - संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील.

धनु
१ तारखेला आपल्या राशीच्या षष्ठस्थानात होणारी बुध-शुक्राची युति आपणांस अनपेक्षित लाभ करुन देणारी आहे. व्यवसाय-उद्योगातून नवनवीन कल्पना आकार घेतील. बरेच दिवस रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. नवीन व्यावसायिक करार होतील. हितशत्रूच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. अनोळखी व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसू नका. आपली प्रत्यक्ष खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्‍वास ठेवू नका. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात जामीन राहू नका. उधार-उसनवारी टाळावी. विरोधकांना आपले मत पटवून देण्यात यशस्वी व्हाल. षष्ठातील रवि-शुक्र सरकारी कामातून यश देईल. नोकरीत पदोन्नती होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्ज मिळेल. व्यवसायाचा विस्तार करता येईल. सरकारी परवाने मिळतील. सरकारी वाहन-वास्तूचा लाभ घेता येईल. या महिन्यात होणारे चंद्रग्रहण आपला मनस्ताप वाढविणारे राहील. त्यामुळे महत्त्वाचे योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने घ्यावे. गर्भवती आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. आपल्या भाग्यस्थानात दीर्घकाळ असणारा मंगळ आता कर्मस्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे नोकरीत अधिकारपदाची प्राप्ती होईल. पोलिस, लष्कर येथे काम करणार्‍या अधिकारी वर्गासाठी हा बदल अनुकूल राहील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकाराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर
महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ तारखेला आपल्या राशीच्या पंचमस्थानात बुध-शुक्राची युति होत आहे. लेखक, साहित्यिक, पत्रकार, संपादक तसेच कवि, कलाकार यांना सुसंधी लाभतील. जनसंपर्कातून लाभ होतील. सामाजिक पत-प्रतिष्ठा उंचावेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला जाईल. चित्रकारांना पुरस्कार मिळतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. ४ तारखेला होणारे चंद्रभ्रमण आपला मनस्ताप वाढविणारे राहील. भावंडांमध्ये तसेच आप्तस्वकीयांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक करार तूर्त तरी लांबणीवर टाळावे. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते. आपल्या आवाक्यातील कामे करावीत. नोकरीत मात्र बढती-बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश येईल. उत्तरार्धात आपल्या राशीच्या अष्टम स्थानातील मंगळ भाग्यस्थानी आल्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. खेळाडूंना सुसंधी लाभतील. चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. विविध उपक्रम राबविण्यात यश येईल. वाहनसौख्य लाभेल.

कुंभ
आपल्या सुखस्थानात मागील महिन्यात गुरुमहाराजांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आपला राहत्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. गृहउद्योग तसेच जोडधंद्यातून आपणांस फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल. तरुणांना नोकरीच्या सुसंधी लाभतील. सरकारी कामात यश मिळेल. हाती आलेल्या संधीचा लाभ घ्या. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लेखन होईल. चांगल्या कलाकृती घडतील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. व्यवसाय-उद्योगातून चांगली आवक राहील. रंग, फर्निचर, केमिकल्स, चैनीच्या वस्तू, यांचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना, चांगली आवक राहील. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होईल. कवि, कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. ज्या बातमीची आपण वाट पाहत होता ती समजल्यामुळे उत्साहाला उधाण येईल. विद्यार्थ्यांना मनाजोग्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. सामाजिक पत-प्रतिष्ठा उंचावेल. नवीन कार्यारंभ कराल. सप्तमस्थानात इतके दिवस ठाण मांडून बसलेला मंगळ महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या राशीच्या अष्टमस्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडीअडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे. मात्र उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.

मीन
१ तारखेला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून बुध-शुक्राची युति होत आहे. उद्योग-व्यवसायात चांगले करार होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील व त्यातून लाभ होतील. नवीन परिचय होतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. कवि, कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यास अनुकूल ग्रहमान आहे. परप्रांतात चांगले व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्यासाठी महिला सहलीचे आयोजन करतील. ६ तारखेला रवि-शुक्राची युति आपल्या पराक्रमस्थानातून होत आहे. सरकारी परवाने मिळतील. कोर्टकचेरीतील कामात तडजोड होऊ न मनाजोगा निकाल लागेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. भावंडांचे विवाह ठरतील. घरात शुभसमारंभाचे आयोजन होईल. महिन्याच्या सुरवातीला म्हणजेच ४ तारखेला होणारे खंडग्रास चंद्रग्रहण मन सैरभैर करणारे राहील. मनस्ताप होणार्‍या घटना घडतील. गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घ्यावी. अनावश्यक प्रवास टाळावेत. रवि-शुक्राची अनुकूलता मात्र आपणांस नवीन वाहन-वास्तूचे योग देणारी राहील. आपल्या षष्ठस्थानातील मंगळ महिन्याच्या उत्तरार्धात सप्तमस्थानात प्रवेश करीत आहे. तेव्हा जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध होतील.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही