नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


अकरावी पायरी चढताना..

Go down

अकरावी पायरी चढताना.. Empty अकरावी पायरी चढताना..

लिखाण  Admin on Thu Jun 07, 2012 12:56 pm


संकलन - संदेश सामंत , गायत्री गोखले

असंख्य कोर्सेसेच्या भाऊगर्दीत आपल्याला नेमकं काय शिकायचंय हे ठाऊक असेल , तर करिअरचा मार्ग निवडणं अजिबात कठीण नसतं. मात्र , यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःची आवड , क्षमता माहीत असणं गरजेचं आहे. तसंच , विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीत पालकांचाही रोल महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळेच अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात , याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ' महाराष्ट्र टाइम्स ' आणि यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वरतर्फे ने एका सेमिनारचं आयोजन केलं होतं.

क्षेत्र आवडीचं हवं

करिअर निवडताना फक्त मार्कांचा विचार करू नका. कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी आपल्याला त्यात किती रस आहे याचा विचार करा. तसंच , त्या क्षेत्रात आवश्यक असलेली मेहनत आपण घेऊन शकू की नाही हेही बघा. आपली कुवत ओळखणं , त्यावर मात करणं आणि मग आवडीच्या क्षेत्रात प्रवेश करणं केव्हाही चांगलं. त्याचप्रमाणे , आपल्या मनाजोगतं करिअर निवडताना त्यात वेळ किती लागतो , त्यात किती खर्च येतो हेही पाहिलं पाहिजे. यासाठीच करिअरचा विचार करताना विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत चर्चा करायलाच हवी.

- प्रा. नीरु छेडा , संचालिका , मयूरपंख काउन्सिलिंग सेंटर

करिअर निवडण्यापूर्वी :

आपली आवड आणि क्षमता ओळखा , त्याला साजेशा करियरला प्राधान्य द्या.
आपल्या गरजाही लक्षात घ्या. आपल्याला काय हवंय , आपल्यावर घराची काही जबाबदारी आहे का हेही पहा.
क्षमतेसोबत आपल्या मर्यादाही ओळखा. आपण किती मेहनत करू शकतो , एखाद्या करिअरमध्ये किती वर्षं द्यावी लागतात , एखाद्या कोर्सची फी किती आहे या सगळ्याचा नीट विचार करा.
दहावीनंतर अॅप्टिट्युड टेस्ट जरूर करून घ्या. पुढील वाट ठरवताना त्याचा नक्की उपयोग होईल.
मुख्य म्हणजे , स्वतःला थोडा वेळ द्या , भावनिक कल्लोळातून मुक्त व्हा आणि मोकळ्या मनाने विचार करा.
स्वतःचा सार्थ अभिमान बाळगावा , पण त्याचं गर्वात रुपांतर होऊ देऊ नये.
जे लक्ष्य ठरवाल ते टप्प्याटप्प्याने साध्य करा.
जे क्षेत्र करिअरसाठी निवडाल त्याचा नीट अभ्यास करा , त्याविषयी सगळी माहिती मिळवा. त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांचा योग्य विचार करा.

याशिवाय ,

नृत्य , नाट्यशास्त्र , संगीत याही कलांची आवड असल्यास त्याचेही कोर्सेस आज अनेक कॉलेजांमध्ये उपलब्ध आहेत. त्यायोगे तुम्ही सिनेइंडस्ट्रीत नृत्यदिग्दर्शक , व्हिडीओज , म्युझिक आल्बम्स इत्यादींसाठी काम करू शकता.

चित्रकला , पेंटिंगमध्ये गती असून त्यातच करिअर करायचं असल्यास , इंटिरिअर डिझायनिंग , ज्वेलरी डिझायनिंग , फॅशन डिझायनिंग , एग्झिबिशन मॅनेजमेन्ट असे अनेक पर्याय आहेत. त्यांचे पदवीचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
बारावीनंतर बीएमएम अथवा बीएमएसही करता येईल.
खेळांची आवड असल्यास स्पोर्ट्स सायकोलॉजी करता येईल अथवा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करता येईल , क्रीडाशिक्षक म्हणूनही शाळा-महाविद्यालयांत नोकरी मिळू शकेल. यासाठी मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन हा कोर्स करावा लागतो.
बारावीनंतर राज्यसेवा परीक्षा देऊन सरकारी प्रशासकीय क्षेत्र , पोलीस सेवा , फॉरेन सर्व्हिसेसमधेही प्रवेश करता येईल.
याहीपेक्षा वेगळं , थरारक , साहसी क्षेत्र म्हणून आर्मी , नेव्ही अथवा एअरफोर्स मधेही जाता येईल. आर्मीसाठी कोणत्याही शाखेची पदवी चालते , मात्र नेव्ही अथवा एअरफोर्स साठी विज्ञानशाखेची पदवी अनिवार्य असते , आणि फिजिक्स-मॅथ्स विषयही गरजेचे असतात.
दहावीनंतर मर्चंट नेव्ही हाही चांगला पर्याय आहे.
याशिवाय हॉटेल मॅनेजमेन्ट हेही कार्यार म्हणून उत्तम क्षेत्र आहे.

सायन्समधील विविध संधी :

बारावीनंतर इंजिनीअरिंग किंवा मेडिकल हे पारंपरिक पर्याय आहेतच , पण त्यासाठी चांगल्या मार्कांसोबत प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि जिद्द , चिकाटी हे गुण अत्यंत गरजेचं आहेत. भारतभर घेतल्या जाणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षा यासाठी द्याव्या लागतात. इंजिनीअरिंगमध्येही पुढे अनेक वेगवेगळ्या वाटा आहेत.
जरी या क्षेत्रांत जाण्याइतके मार्क मिळाले नाही तरी निराश होण्याची गरज नाही. आज अनेक पॅरामेडिकल क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. नर्सिंग , स्पीच थेरपी , नेचरोपथी , आहारतज्ज्ञ इ. अनेक पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत.
बारावीनंतर अॅक्चुरियल सायन्स म्हणजे विमाशास्त्र हा ही चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र त्यासाठी गणितात अत्यंत आवड असणं गरजेचं आहे.

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी :

l कॉमर्स म्हणजे निव्वळ टाईमपास असं समजू नका , याही शाखेत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
चार्टर्ड अकाउंटंट हे अत्यंत प्रसिद्ध क्षेत्र तर आहेच पण त्याच्या जोडीला कंपनी सेक्रेटरी , किंवा फायनान्समध्ये एम.बी.ए. ही करता येईल.
शेअर मार्केटमधेही करियर करता येईल.
बुक कीपिंग हाही चांगला ऑप्शन आहे.

दहावीनंतर आर्ट्सला गेल्यास :

भाषांचा अभ्यास हे छान करिअर ठरू शकतं. भारतीय तसंच परकीय भाषांत पदवी मिळवल्यावर राजदूत , परकीय वकिलातींमध्ये दुभाषी म्हणून काम करता येतं.
याचप्रमाणे लेखक , भाषांतरकार , पर्यटन , जर्नालिझम , रेडिओ , चित्रपट क्षेत्र अशा अनेक ठिकाणी भाषातज्ज्ञांना खूप वाव आहे.
याशिवाय आर्ट्सलामधून बारावीनंतर अर्थशास्त्र , भूगोल , मानसशास्त्र , सामाजिकशास्त्र या विषयांत पदवी मिळवून बँक , विमाकंपन्या , इत्यादी ठिकाणी काम करता येईल. पदवी मिळवल्यावर एमबीए हा ही पर्याय आहे.
लायब्ररी सायन्सची पदवी मिळवून ग्रंथालयात नोकरी मिळू शकते.
याशिवाय ह्युमन रिसोर्स अथवा शिक्षकी पेशा हेही पर्याय आहेत.

प्रा. संजय रानडे

रानडे सर अकरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहेत. यात त्यांना त्यांना अनेक अनुभव आले. या अनुभवातून त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली आहेत.

पूर्वीच्या आणि आताच्या अभ्यासाच्या पद्धतींमध्ये खूप फरक पडलाय. हा बदल स्वाभाविक असला , तरी याचे अनेक तोटे विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहेत.

शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा एकमेकांशी संवाद होणं आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना समस्या असली तर त्यांनी ती शिक्षकांना वेळीच विचारून तिचं निराकरण करणं आवश्यक असते. पण आजकालचे विद्यार्थी हे शिक्षकांना प्रश्नच विचारत नाहीत. आणि एखाद्या शंकेचे निराकरण न झाल्यास तिचा वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही. याचमुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारणं गरजेचं आहे.

विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची उत्तरं देतानासुद्धा शिक्षकांनी ' स्पून फीडिंग ' करणं थांबविलं पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकू देण्यास जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजं. यातूनच विद्यार्थ्यांची विषयात रुची निर्माण होते.
विद्यार्थी , शिक्षक आणि पालक असा त्रिकोण निर्माण झाला पाहिजे. आपण आपल्या पाल्याची ट्युशन फी भरली की आपली जबाबदारी संपली हा (गैर)समज पालकांनी दूर केला पाहिजे.
आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी कोण आणि कसे आहेत यावरही लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या पाल्यावर विश्वास जरूर ठेवावा पण तो आंधळा विश्वास असू नये ह्याची मात्र काळजी घ्यावी.
आजकाल विद्यार्थ्यांचे पाढे पाठ नसतात. खासकरून विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी पाढे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. या सुट्टीत ते पाठ करा. अकरावीचे वर्ष हे मज्जा करण्यासाठी नसून ते आपला बेस पक्का करण्यासाठी असते याचा विचार करा. आपला नावडता पाठ ऑप्शनला घालण्याची सवय मोडा. हे सवय भविष्यात घटक ठरू शकते.
विद्यार्थ्यांनी स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजेत. स्वतःच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आयुष्यात ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी खडतर मार्गावर न डगमगता प्रवास करा.
वाचन करण्याची सवय लावा. आपल्याकडे सामान्यतः असा समज असतो की वाचन हे फक्त कला शाखेतील विद्यार्थ्यांना गरजेचं असतं. पण हे अगदी चुकीचे आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा भरपूर वाचन केलंच पाहिजं. अभ्यासासोबतच इतरही छंद जोपासा. छंद तुम्हाला जगायला शिकवतात. आणि जीवनात ' इंटरेस्ट ' निर्माण करतात. आपल्या पालकांचा आदर राखा. तेच आपल्याला आजपर्यंत मदत करत आले आहेत याची जाणीव ठेवा. व्यसनांपासून दूर राहा. एक छोटसं व्यसनसुद्धा आयुष्य बरबाद करू शकतं याची जाणिव ठेवा. हा मार्ग स्वीकारल्यास तुमचे ध्येय तुम्हाला नक्कीच गाठता येईल.

खास पालकांसाठी :

आपल्या पाल्यावर कोणताही दबाव आणू नका , त्याचा त्याला विचार करण्यास उद्युक्त करा.
एखाद्या कोर्स साठी आर्थिक क्षमता नसल्यास त्याची कल्पना मुलांस द्या. अथवा कर्जाचाही विचार करा.
एखादे वेळी अपयश आल्यास पाल्यावर न चिडता त्याची बाजू ऐकून घ्या , त्याचे प्रश्न समजून घ्या आणि त्यावर एकत्रितपणे सामंजस्याने तोडगा काढा.
मुलांना अपयश स्वीकारायला मदत करा. मुलांशी संवाद वाढवा.

काही प्रश्न :

ज्याप्रमाणे बारावीनंतर शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळतात , त्याचप्रमाणे दहावीनंतरसुद्धा शिष्यवृत्ती मिळतात का ?

हो. मिळतात. पण , अशा शिष्यवृत्तींची संख्या फार कमी आहे. शिष्यवृत्ती या बहुतेक बारावीनंतरच जास्त उपलब्ध आहेत.

बारावी सायन्स करून त्यानंतर दुसरी स्ट्रीम घेतली तर कठीण जाईल का ?

कठीण आहे पण अशक्य अजिबात नाही. पण असा करत असताना पालकांनी आपल्या पाल्यांच्या अॅप्टिट्युडचा विचार करायला हवा. आपल्या पाल्याला हे कितपत त्रासदायक ठरेल याचा विचार करा.
एनडीएमध्ये जायला कोणती स्ट्रीम घ्यावी ?

तुम्हाला जर आर्मीमध्ये जायचं असेल तर तुम्ही अकरावी आणि बारावीला कोणतीही शाखा निवडू शकता. पण , नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये जायचे असेल तर विज्ञान शाखेतून बारावी करणं आवश्यक आहे.

आर्किटेक्चरची प्रवेश पद्धत काय आहे ? आर्किटेक्चरसाठी बारावीनंतर नाटा ( NATA) ही परीक्षा द्यावी लागते
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही