नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

कणा - कुसुमाग्रज

Go down

कणा - कुसुमाग्रज Empty कणा - कुसुमाग्रज

लिखाण  vinayasawant on Mon Jun 18, 2012 2:19 am

"ओळखलत का सर मला" पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर, आत्ता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा
- कुसुमाग्रज
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही