नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Go down

बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा? Empty बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

लिखाण  Admin on Sun Jun 24, 2012 3:33 pm

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज मिळवावं लागतं. यासाठीच रोज भाज्या खाणं महत्त्वाचं असतं. भाज्या विकत घेताना, साठवून ठेवताना आणि शिजविताना कोणती काळजी घ्यावी ते विज्ञान आपल्याला सांगतं. त्यामुळे आता पाहू या बाबतीत विज्ञान कसं उपयोगी पडतं ते!
लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना आवडणारी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी. त्यामुळे प्रथम त्याबद्दल जाणून घेऊ या. बटाटे मोड न आलेले साधारण सालीचा रंग एकसारखा असणारे असे घ्यावे. बटाटे नेहमी अंधार्‍या जागेत ठेवावे. त्यामुळे त्यांचा स्वाद आणखी वाढतो. बटाट्याला मातीसारखा वास त्यामधील पायरॅसाईन प्रकारच्या संयुगामुळे येतो. बटाटे कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. त्या तपमानाला त्यामध्ये असे काही रासायनिक बदल होतात. ज्यामुळे त्याच्यातल्या स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यामुळे बटाट्याला एक प्रकारची गोडसर चव येते. अशा बटाट्याची भाजी लवकर सोनेरी होते. त्याच्या चिप्स बनवल्या तर लवकर सोनेरी होतात आणि त्याला थोडी कडू चव येते. त्यामुळे बराच काळ फ्रीजमध्ये असलेले बटाटे वापरण्यापूर्वी काही दिवस बाहेर काढून ठेवावे लागतात. तपमान १0 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की बटाट्यांना मोड येऊ लागतात किंवा ते खराब होऊ लागतात.

बटाट्यामध्ये असणारं क जीवनसत्त्व त्याच्या सालीखाली असतं. त्यामुळे कच्चे बटाटे वापरायचे असतील तर ते सालीसकट शक्यतो वापरावे. बटाटे वापरण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे ते प्रेशर कुकरमध्ये वाफेवर उकडावे. कित्येक स्त्रिया कुकरमधल्या पाण्यात थेट बटाटे ठेवून उकडतात. या पद्धतीत अनेक तोटे आहेत. पहिला असा की बटाट्याचा पाण्याशी थेट संबंध आल्याने त्यातील जीवनसत्त्व पाण्यात उतरतं. ब - आणि क - जीवनसत्त्व दोन्हींचा साठा शरीर करू शकत नाही आणि ती अन्नातून रोजच्या रोज मिळवावी लागतात; पण ती पाण्यात विरघळतात. त्यामुळे त्या बाबतीत फार काळजी घ्यावी लागते. कुकरमधलं पाणी आपण साधारणपणे फेकूनच देतो. त्यामुळे त्या पाण्यात विरघळलेलं क - जीवनसत्त्व वाया जातं. दुसरा तोटा असा की पाणी बटाट्यात शिरतं. त्यामुळे बटाट्यांना एक प्रकारची पाणचट चव येते. असे बटाटेवडे, कटलेट, फिंगर चिप्स यासाठी वापरले की त्यामध्ये पाण्याचा अंश खूप असल्याने ते तेल पितात आणि पदार्थ तेलकट होतो. तिसरा तोटा असा की, उपवास कचोरीची पारी किंवा पॅटिसची पारी त्यापासून बनवायची असल्यास त्यामध्ये बराच मैदा/कॉर्न फ्लोअर/साबुदाण्याचं पीठ घालावं लागतं आणि त्यामुळे चव बदलते. त्यामुळे कुकरमध्ये डबा ठेवून त्यावर ताटली ठेवून त्यामध्ये बटाटे ठेवून उकडून घ्यावे. त्यापूर्वी ते स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.

बटाटे विकत घेतानाच्या पहिल्या दोन निकषांबरोबर हेही पाहावं की, ते गुळगुळीत आहेत. त्यांच्यावरच्या डोळ्यांची संख्या कमीत कमी असावी. त्यांच्यावर हिरवट रंग असता कामा नये. असे बटाटे खाल्ल्याने अपाय होऊ शकतो. बटाटा हातात घेतल्यावर तो हाताला घट्ट आणि जड लागला पाहिजे. साधारणपणो एकदा आणलेले बटाटे दोन आठवडे चांगले राहतात. ज्या बटाट्यांची साल पातळ असते असे बटाटे तीन दिवसांत संपवावेत. पिवळ्या सालीचे बटाटे किंवा पांढरट पिवळट अशा सालीचे बटाटे हे भाजीसाठी, रश्शासाठी, फिंगर चिप्स वगैरेंसाठी योग्य असतात. कारण शिजल्यावर त्यांचा भुगा होत नाही. फोडी सुटसुटीत राहतात. याउलट सूपसाठी बेक्ड, मॅश्ड बटाटे बनविण्यासाठी कचोरी, पॅटिस यांची पारी बनविण्यासाठी बटाटा वापरायचा असल्यास तपकिरी रंगाचा बटाटा योग्य असतो, कारण शिजल्यावर त्याचा भुगा होतो. हे निकष पाहिले की कळतं की बटाट्याचा कीस, पोटॅटो ऑ गट्रिन अशा गोष्टींसाठी पिवळ्या किंवा पांढर्‍या सालीचा बटाटा योग्य ठरेल. याउलट उपास थालीपिठात घालण्यासाठी किंवा साबुदाणा बटाटा चकल्या किंवा वडे करण्यासाठी तपकिरी रंगाचा बटाटा योग्य ठरेल. बटाट्यामधल्या क जीवनसत्त्वाचा उल्लेख झालाच आहे; पण त्याशिवाय त्यामध्ये जे व जीवनसत्त्वाचे प्रकार आहेत, त्यापैकी ब ६ मोठय़ा प्रमाणात असते. ब ६ हे मेंदूच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतं. विशेषत: वृद्ध व्यक्तींना, मधुमेहींना त्याचा फार फायदा होतो. बटाटे जेव्हा वाफेवर उकडले जातात तेव्हा त्यांच्या सालीखालची ही सर्व जीवनसत्त्वे त्यामध्ये शोषून घेतली जातात. यासाठीच बटाटे शिजविण्यासाठी ती पद्धत उत्तम समजली जाते. पण काही वेळा कच्च्या बटाट्याचे पदार्थ करताना साल काढावी लागते तेव्हा ती पातळ काढावी आणि बटाटे चिरून लगेच वापरावेत म्हणजे जीवनसत्त्वांचा नाश होत नाही. खरे तर बटाटा पाण्याखाली धरून ब्रशने त्याची साल घासून स्वच्छ धुतला तर सालीसकट वापरता येतो. काचर्‍यांसाठी असा बटाटा वापरायला हरकत नाही. काचर्‍या खमंग होतात. बटाटे चिरून तसेच ठेवले तर त्यातील विकरांचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क होऊन त्यांचा रंग काळपट होतो. म्हणून आपण ते चिरून पाण्यात ठेवतो. कारण त्यामुळे हवेतील ऑक्सिजनशी संपर्क होत नाही व रंग बदलत नाही. पण असं करण्यामुळे त्यातील क आणि ब जीवनसत्त्वे पाण्यात उतरतात आणि पाण्याबरोबर फेकली जातात. म्हणजेच जीवनसत्त्वांचा नाश होतो म्हणून सर्वतोपरी काळजी घ्यावी लागते.

बटाट्यामधल्या जीवनसत्त्वांचा नाश होऊ नये म्हणून काय करायला हवं ते आपण पाहिलं. बटाट्यामध्ये असलेल्या खनिजांपैकी महत्त्वपूर्ण प्रमाण असलेली खनिजे म्हणजे पोटॅशिअम आणि मँगॅनीज. यांचा तर शरीराला उत्तम उपयोग होतोच; पण हल्लीच्या संशोधनाप्रमाणे त्यामध्ये असलेल्या क्यूकोअमाइन या रसायनाचा उपयोग रक्तदाबाची पातळी कमी करण्यासाठी होतो. बटाट्यामध्ये काबरेहायड्रेट्स खूप असतात. ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल आणि ब ६ यामुळे मेंदूमध्ये अशी चेताप्रसारके तयार होतात ज्यामुळे नैराश्य दूर होते. शांत झोप लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात बटाटा अवश्य वापरावा.

बटाट्याच्या पदार्थांपैकी फ्रेंच फ्राईज हा अलीकडचा लोकप्रिय प्रकार आहे. याची खासियत अशी की, बटाट्याचे तळलेले तुकडे बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. यासाठी तपकिरी रंगाचा बटाटा वापरावा लागतो. यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं. कच्च्या बटाट्याचे लांबट तुकडे करून आपण इतर तळण करतो तसे तळले तर ते बाहेरून जरा कुरकुरीत होतात आणि आतल्या आद्र्रतेमुळे लगेच मऊ पडतात. ते बाहेरून भरपूर कुरकुरीत राहण्यासाठी वेगळ्या प्रकारे तळावे लागतात. प्रथम साधारण १२0 ते १६३ अंश सेल्सिअस तपमानाच्या तेलात म्हणजे अगदी मंद विस्तवावर ते ८-१0 मिनिटे तळावे लागतात. यामुळे पृष्ठभागावरील स्टार्चच्या कणांना विरघळून एकमेकांशी बंध करून बाहेरचा स्तर जास्त जाड आणि बळकट बनवायला वेळ मिळतो. यानंतर आता हे तुकडे मोठय़ा विस्तवावर म्हणजे १७५-१९0 अंश सेल्सिअस तपमानाला ३ ते ४ मिनिटे तळले की ते सोनेरी आणि कुरकुरीत होतात आणि हा कुरकुरीतपणा जास्त काळ टिकतो. वेफर्स एकदम कुरकुरीत हवे असतील तरी हीच पद्धत अवलंबावी लागते.
बटाट्यानंतर आता समाचार घेऊ कांद्याचा आणि लसणीचा पुढच्या लेखात.

बटाटे विकत घेताना या गोष्टी नीट बघाव्यात. बटाटा हाताला जड आणि घट्ट लागला पाहिजे. त्याच्यावर फार डोळे असता कामा नये. त्याला मोड आलेले असता कामा नये. त्याच्यावर हिरवा रंग दिसता कामा नये. सालीचा रंग साधारण एकसारखा असून, बटाटा गुळगुळीत असला पाहिजे.
बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर थंड, अंधार्‍या जागेत ठेवावे. रेफ्रिजरेटरमध्ये कधीही ठेवू नये. बटाटे ठेवलेल्या जागी हवा खेळत असावी. बटाट्यात भरपूर क - जीवनसत्त्व आणि ब - ६ हे जीवनसत्त्व असतं. मेंदूमध्ये चेताप्रसारके (न्यूरोट्रान्समीटर्स) तयार करण्यासाठी ब-६ ची गरज असते. बटाट्यातील ट्रिप्टोफॅन व ब ६ मुळे बटाट्याचा शक्यतो रात्रीच्या जेवणात समावेश करावा. वाफेवर उकडणे ही बटाटे शिजविण्याची सगळ्यात उत्तम पद्धत आहे.

- डॉ. वर्षा जोशी
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही