नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'

Go down

मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली' Empty मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'

लिखाण  Admin Sat Feb 16, 2013 1:28 pm

[You must be registered and logged in to see this image.]

नाशिकच्या केबीएच डेन्टल कॉलेजमधून पासआऊट झालेल्या डॉ. अमेय पाटीलने बनवलेला , पाण्यावर चालणारा ' पिको - हायड्रो इलेक्ट्रिक टूथब्रश ' सर्वत्र चर्चेचा बनलाय. आता तर थेट अमेरिकेने अमेयच्या या आविष्काराची दखल घेतलीय. तेथील सेशनमध्ये सहभागी होणारा अमेय डेंटिस्ट शाखेचा पहिला भारतीय विद्यार्थी आहे.

मूळ मुंबईकर असणाऱ्या अमेयने नाशिकमध्ये शिकताना ' पिको - हायड्रो इलेक्ट्रिक टूथब्रश ' या विषयावर संशोधन केले. पाण्यावर चालणारा हा अनोखा टूथब्रश सर्वत्र चर्चेचा तर बनलाच , शिवाय त्याने अनेक पुरस्कारही पटकावले. देशभरातील विविध पुरस्कार मिळविल्यानंतर अमेयला अमेरिकन स्टुडंट डेंटल असोसिएशनच्या (एएसडीए) रीसर्च पोस्टर सेशनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या सेशनमध्ये सहभागी होणारा अमेय डेंटिस्ट शाखेचा पहिला भारतीय विद्यार्थी आहे.

दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवड , त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ' अमेरिकन स्टुडंट डेंटल असोसिएशन ' ही संघटना काम करतेय. या संघटनेच्या दुसऱ्या स्टुडंट रीसर्च पोस्टर सेशनचं ६ ते १४ मार्च २०१३ दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील अटलांटा इथे हे सेशन होणार असून. यात अमेय ' पिको हायड्रो इलेक्ट्रिक टूथब्रश ' हा पाण्यावर चालणारा नाविन्यपूर्ण टूथब्रश सादर करणार आहे.

बीडीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अमेयला या संशोधनासाठी यापूर्वी ' पेरिओ इंडिया अॅवॉर्ड ', ' वर्ल्ड डेंटल कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या नंबरचे पारितोषिक ', ' इनोव्हेटर फ्रॉम वेस्टर्न रिजन फॉर इंडिया इनोव्हेटिव्ह इनिशिएटीव्ह आय ३ साठी निवड ' हे बहुमान मिळाले आहेत.

काय आहे ' पिको - हायड्रो इलेक्ट्रिक टुथ ब्रश '

हायड्रो इलेक्ट्रिक तंत्रज्ञान वापरुन बनविलेल्या या ब्रशमध्ये मेटल टर्बाईन , गिअर , ३ व्होल्टची बॅटरी आणि ट्रान्स्फॉर्मर यांचा वापर केला आहे. टूथब्रशच्यामागे जोडलेल्या टर्बाईनवर २० सेकंद नळातील पाणी सोडल्यास त्यातून तयार होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. ट्रान्स्फॉर्मरच्या वापरामुळे ही ऊर्जा वाढण्यास मदत होते. पाण्याचा प्रवाह बंद करुन टूथब्रशचा स्विच ऑन केल्यानंतर ऊर्जेमुळे अंतर्गत जोडलेले गिअरचे युनिट ब्रिसल्समध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करते. या ऊर्जेमुळे ही व्हायब्रेशन्स १५ ते २० मिनिटे टिकतात आणि व्हायब्रेशन्स सुरु असताना टूथब्रशने दात घासले जाऊ शकतात.

'' भारतात दात घासण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे दंतरोगाला आमंत्रण दिलं जातं. आपल्याकडचे डॉक्टरही याबाबत अनेकदा मार्गदर्शन करत असतात. मात्र त्यात पुरेसं यश मिळत नाही. या टूथब्रशची निर्मिती करताना या बाबींचा मी सखोल अभ्यास केला. देशभरात या प्रोजेक्टच्या कौतुकाने मी भारावलोय. आता हा प्रोजेक्ट अमेरिकेत सादर करण्याची संधी मिळाल्याने तो जगासमोर जाणार आहे. ''

Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती

- Similar topics

 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही