नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

दहावीनंतर करिअरच्या वाटा

Go down

 दहावीनंतर करिअरच्या वाटा Empty दहावीनंतर करिअरच्या वाटा

लिखाण  Admin on Fri May 24, 2013 1:09 am

११वी व्यवसाय शाखा (एम.सी.व्ही.सी.)

११ वी व १२ वी स्तरावरील किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाला आता व्यवसाय (व्होकेशनल) अभ्यासक्रम म्हणून ओळखलं जातं. पारंपारिक कला , विज्ञान व वाणिज्य शाखेमधून पुस्तकी ज्ञान घेऊ न इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमामध्ये ७० टक्के भाग हा व्यावसायिक विषयावर तसंच प्रात्यक्षिकावर आधारीत आहे.

विविध ज्युनियर कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असून यासाठी प्रवेश ऑफलाईन दिले जातात. (म्हणजेच थेट कॉलेजातून प्रवेश अर्ज घेणं आवश्यक आहे.)

हा अभ्यासक्रम ६ गटांमध्ये विभागलेला आहे.

इंजिनीअरिंग गट - मेटेंनन्स व रिपेअरिंग ऑफ इलेक्ट्रीकल अप्लायन्सेस , बिल्डींग मेटेंनन्स , कॉम्प्युटर मेटेंनन्स , मल्टी मिडीया इंटरनेट टेक्नोलॉजी , इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी , मेकॅनिकल टेक्नॉलॉजी , ऑटो इंजिनीअरिंग टेक्निशियन , रिपेअर्स मेटेंनन्स व रिवाईंडिंग ऑफ इलेक्ट्रीकल मोटर्स

कॉमर्स गट - पर्चेसिंग व स्टोअर किपिंग , मार्केटिंग व सेल्समनशिप , अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग , ऑफिस मॅनेजमेंट , इन्शुरन्स , बँकिंग

मत्स्य गट - मत्स्य प्रक्रिया तंत्र , मत्स्य उत्पादक

कृषी गट - हॉर्टिकल्चर , क्रॉप सायन्स , डेअरी टेक्नोलॉजी , पोल्ट्री प्रॉडक्शन , सीड प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी , वॉटर शेड मॅनेजमेंट , पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ,
आरोग्य व वैद्यकीय सेवा गट - क्रेच व प्री स्कूल मॅनेजमेंट , ऑप्थॅल्मिक टेक्निशियन , एक्स रे टेक्निशियन , मेडिकल लॅब टेक्निशियन ,

गृहविज्ञान गट - ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम , बेकरी व कन्फेक्शनरी , कुकरी

१२ वी व्यवसाय अभ्यासक्रमानंतरील संधी

१२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल सहाय्य योजनेअंतर्गत सरकारकडून सुलभ अर्थसहाय्य
कारखान्यांमध्ये १ वर्ष उमेदवारी करण्याची संधी.

१२ वीला ६० टक्के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश

उच्च शिक्षणाकडे जायचं असल्यास बीए , बीकॉमच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेऊ शकता. तसंच हॉटेल मॅनेजमेंट पदवी/पदविका अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकता.

१२वी नंतर काही वर्ष एखाद्या कारखान्यामध्ये नोकरी केल्यावर स्वत:चा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल.


Source : Maharashtra Times Online Edition dtd 23.05.2013
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही