नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


भन्नाट मराठी विनोद

Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Thu Jun 28, 2012 1:18 am

ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.

दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो. Razz
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Thu Jun 28, 2012 1:01 am

मेंटल हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी एक विद्यार्थी - संशोधक आला होता , संचालक त्याला आवश्यक ती माहिती पुरवत होते.

"पण काय हो, एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे तुम्ही कसे ठरवता ?" त्या विद्यार्थ्याने विचारलं .

"आम्ही एक बाथटब पाण्याने भरतो आणि पेशंटला एक चमचा , एक चहाचा कप आणि एक बादली अशी तीन साधने देऊन बाथटब रिकामा करावयास सांगतो ." संचालाक म्हणाले

"आल लक्षात ." विद्यार्थी म्हणाला ,
"म्हणजे जो मनोरुग्णा नाही तो बादलीचा वापर करून बाथटब रिकामा करेल . कारण चमचा , किंवा चहाचा कप यापेक्षा बादली नक्कीच मोठी असते , असच ना ? "

"नाही तस नाही" संचालक म्हणाले , "जो मनोरुग्ण नाही तो बाथटबचा प्लुग ओढून पाणी सोडून देईल व तो रिकामा करेल . आता मला सांगा की , तुम्हाला खिडकीजवळची कॉट दिली तर चालेल का ? "
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Thu Jun 28, 2012 12:52 am

मंग्या पॅथोलोजी मध्ये काम करणारया अंजूच्या प्रेमात पडला,
तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने स्वताच्या रक्ताने प्रेमपत्र लिहील,
तिला ते पत्र देत तो मस्करीत म्हणाला " मला याचा रिपोर्ट कळव".
चलाख अंजूने दुसरया दिवशी त्याच्या हातात एक चिट्ठी ठेवली,
मंग्याला वाटल पोरगी पटली, त्याने चिट्टी उघडून पहिली,
...त्यात लिहील होत,

"रक्तगट O+ आहे फक्त हिमोग्लोबिन कमी झालय" pale
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Thu Jun 28, 2012 12:49 am

एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - "आपण कुठे चालला आहात ?''

प्रवासी - "" जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे" (अयोध्या)

टीसी - "" आपलं तिकिट दाखवा ''

प्रवासी - "" टिकिट तर नाही आहे ''

टीटी - "" तर चला माझ्या सोबत ''

मुसाफिर - "" कुठे ?''

टीटी - "" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे" (जेल) Smile
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Mon May 14, 2012 1:53 am

संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message...
============================================
एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !
============================================
पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..
चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...
============================================
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
============================================काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....
============================================
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."
============================================
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
============================================
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....
बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......
पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...
============================================संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं
बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं...
...
संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..
============================================
मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..
============================================
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.
============================================
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....
============================================
बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून .
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...
============================================
बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...
============================================
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty Re: भन्नाट मराठी विनोद

लिखाण  Sponsored content


Sponsored content


वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही