नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


ध्येय आणि संयम ठेवा; यश तुमचेच!

Go down

ध्येय आणि संयम ठेवा; यश तुमचेच! Empty ध्येय आणि संयम ठेवा; यश तुमचेच!

लिखाण  Admin Tue May 15, 2012 6:23 pm

टार्गेट ठेवून अभ्यास
यूपीएससी करण्याचा निर्णय जरी मी बारावीत घेतला असला, तरी त्याची तयारी 2009 पासून करायला सुरवात केली. घरातूनच प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची पार्श्‍वभूमी असल्यामुळे माझी प्रेरणा आणि मार्गदर्शक माझे कुटुंबीयच होते. मी कला शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे मला अवांतर वाचनाला जास्त वेळ मिळाला. मी अभ्यासक्रमाचे भाग केले. त्यासाठी विशिष्ट टार्गेट ठेवले. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याची पद्धत क्‍लिअर ठेवावी लागते. अधिकारी बनताना त्याच्यात लागणारा प्रीसाइजनेस, अतिशय स्वच्छपणे व्यक्त होण्याची ताकद आणि मला जे बोलायचे आहे तेच दुसऱ्यापर्यंत पोचविणे या व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबींवर मी जास्त विचार केला.
- अमृतेश औरंगाबादकर, पुणे, बीए (इकॉनॉमिक्‍स) (देशात 10वा)
--------------------------------------------------------------------------------------
नोकरीतून वेळ काढून अभ्यास
वडील आणि आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेतून अभियांत्रिकी पदवीनंतर यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मी 2005 मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. त्यानंतर घरातील शेती, नोकरीमध्ये वेळ गेल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. नोकरी सुरू असल्याने सकाळी दिवसभरात अभ्यासाला केवळ पाच तास वेळ मिळत असे. दुसऱ्या प्रयत्नात संयम ठेवत अभ्यास केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससी करताना मोठा बाऊ करण्याची गरज नाही. नवीन अभ्यासक्रमात ऍप्टिट्यूड प्रकाराची पद्धत तुलनेने सोपी वाटली.
- प्रकाश निकम, बीई, (देशात 319)
--------------------------------------------------------------------------------------
टी. चंद्रशेखर यांची प्रेरणा
मी पेशाने डेंटिस्ट आहे. दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तीन वर्षे नोकरी केली. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, मी फार काळ इथे काम करू शकत नाही. मला प्रशासकीय सेवा अधिक चॅलेंजिंग वाटली आणि 2009 पासून मी यूपीएससीच्या तयारीला सुरवात केली. यूपीएससीच करण्यामागे ठाण्याचे प्रशासकीय अधिकारी टी. चंद्रशेखर आणि माझ्या कॉलेजमधील विद्यार्थिनी अश्‍विनी जोशी हे दोघे माझी प्रेरणा होते. अभ्यास करताना जेव्हा मला ताण यायचा तेव्हा मी याच अधिकाऱ्यांशी बोलायचो. हा अभ्यास करताना मात्र मी "लर्न-अनलर्न-रिलर्न' हा त्रिकोण शिकलो आणि अवलंबिला. यापुढे वेगवेगळ्या विभागांत काम करताना मला हे तत्त्वच वापरावे लागणार आहे.
- डॉ. विजय जोगदंडे, ठाणे, बीडीएस, देशात 277
--------------------------------------------------------------------------------------
आव्हाने स्वीकारायला शिकलो
मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. यूपीएससी करण्याचा निर्णय मी दहावीनंतर घेतला. मात्र, यूपीएससी करताना स्वतःची स्ट्रॉंग शैक्षणिक पार्श्‍वभूमी असली पाहिजे, असे मत असल्यामुळे मी इंजिनिअर झालो. 2009 मध्ये मी यूपीएससीच्या अभ्यासाला सुरवात केली. हा अभ्यास करण्यासाठी दिल्ली आणि पुण्यातील खासगी क्‍लासेसमध्ये मार्गदर्शन घेतले. यूपीएससी करताना हा अभ्यासक्रम धैर्य, ताबडतोब व्यक्त होणे, स्वयंप्रेरणा बनणे या गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व आव्हानांना मी सामोरा जाऊ शकतो, हा आत्मविश्‍वास असल्यामुळेच दुसऱ्या प्रयत्नांत मी यशस्वी झालो.
- विकास सुरळकर, वाशिम, बीई (मेक) (देशात 127वा)
--------------------------------------------------------------------------------------
नकारात्मक विचार केला नाही
मी मूळचा बीड जिल्ह्यातील. अभियंता असल्याने नोकरीसाठी पुण्यात आलो. पाच वर्षे नोकरी केली व त्यादरम्यान इस्राईल, फिनलंड या देशांत फिरण्याची संधी मिळाली. भारतात आल्यावर प्रशासकीय सेवेत मोठी संधी असल्याचे सल्याचे लक्षात आले. नोकरीचा 2009 मध्ये राजीनामा दिल्यानंतर या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत उशिरा निर्णय घेऊन ही कुठलाच नकारात्मक विचार मनात आला नाही. दिल्लीत राहून या परीक्षेचा प्रामाणिकपणे अभ्यास केला. चौथा प्रयत्न असूनही, अभ्यासाच्या पद्धतीचा विशेष त्रास नाही झाला. इंजिनिअरिंगचे आणि यूपीएससीचे विषय पूर्णपणे वेगळे असल्याने या परीक्षेसाठी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, भूगोल या विषयांची निवड केली होती.
- रवींद्र बिनवडे, बीड, बीई (देशात 30वा)
--------------------------------------------------------------------------------------
परीक्षा पद्धती फायद्याची ठरली
मी बारावीनंतर बीएस्सी बायोटेक्‍नोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर पुण्यात कायद्याचा अभ्यासला सुरवात केली. दरम्यान, या परीक्षेच्या अभ्यासाची माहिती मित्र-मैत्रिणींकडून मिळाली. स्पर्धा परीक्षेबाबत उत्सुकता निर्माण झाल्याने ही परीक्षा देण्याचे निश्‍चित केले. या परीक्षेच्या अभ्यासासाठी एक वर्ष कायद्याचा अभ्यास बाजूला ठेवून परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. मी बायोटेकनंतर एकदम कायद्याचा अभ्यास सुरू केल्याने दिशा जरी बदलली तरी एक अनुभव पाठीशी होता. त्यामुळे कोणताही ताण जाणवला नाही. या परीक्षेसाठी मराठी साहित्य, इतिहास हे दोन विषय ऑप्शनला होते. नवीन अभ्यासपद्धती तुलनेने सोपी वाटली. तत्काळ निर्णय घेऊन सोडवायचे प्रश्‍न असल्याने अडचण आली नाही.
- तेजस्वी सातपुते, नगर, बीएस्सी, (देशात 198)
--------------------------------------------------------------------------------------
घरात वीज यावी म्हणून!
मी कऱ्हाडमध्ये शालान्त शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. संगणक अभियंता म्हणून एक वर्ष काम करीत असताना यूपीएससीची तयारी केली. दहावीत असताना घरात वीज नसल्याने प्रशासकीय सेवेत प्रवेश करता येईल का, याबाबत प्रश्‍नचिन्ह होतो. आपणच या सेवेत रुजू होऊन हे विजेचे संकट दूर केले पाहिजे, ही भावना मनात निर्माण झाली व नेटाने अभ्यास सुरू केला. सध्या भारती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सध्या काम करतो आहे. नव्या अभ्यासक्रमाचे टेन्शन आलेच नाही. आई-वडिलांचे कष्ट पाहून प्रेरणा मिळते.
- रत्नाकर शेळके, कऱ्हाड, बीई, देशात 479
--------------------------------------------------------------------------------------
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी...
माझ्या मैत्रिणीचे वडील प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. त्यांची प्रेरणा घेत मला यूपीएससी करायचे होते; पण त्यानंतर मी इलक्‍ट्रिकल इंजिनिअर झाले. एक वर्ष नोकरी केल्यानंतर माझ्या लक्षात आले, की देशात होणाऱ्या भ्रष्टाचार वगैरे सामाजिक प्रश्‍नांवर नुसते बोलून चालणार नाही; तर यंत्रणेचा भाग बनून तिथे काम करण्याची गरज आहे. 2009 मध्ये यूपीएससीच्या तयारीला लागले. पहिला प्रयत्न नोकरी करत असताना दिला; पण तो पूर्ण फसल्यावर नोकरी सोडली आणि पुढचे पूर्ण वर्ष अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी ठरले आहे.
- समृद्धी हांडे, नागपूर, बीई (इलेक्‍ट्रिकल), (देशात 323वी)
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही