नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

ये रे घना ये रे घना..........

Go down

ये रे घना ये रे घना.......... Empty सुकलेली फुलं

लिखाण  vinayasawant on Tue Jun 26, 2012 1:21 am

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

ये रे घना ये रे घना.......... Empty छान कविता

लिखाण  mansijoshi on Sun May 13, 2012 10:41 am

खुपच छान कविता

मानसी
mansijoshi
mansijoshi
Newbie
Newbie

Posts : 10
Join date : 13/05/2012

वापस वरती Go down

ये रे घना ये रे घना.......... Empty ये रे घना ये रे घना..........

लिखाण  vinayasawant on Sun May 13, 2012 4:00 am

ये रे घना ये रे घना
वाट पाहता तुझी मन हे आतुरले,
येशील नकळत या आशेने मन इतुके बावरले,
कडा भिजल्या भावना थिजल्या,
रोखण्या त्यांना मग हृदय असे सरसावले,
अश्रूंचा हा बांध फुटला कुणी न त्यांसी अडविले,
गळले अश्रू नि झाले मातीमोल,
लागे मग जीवास घोर
कधी पडेल का रे पहिल्या सरीचा एक थेंब अनमोल ?? एक थेंब अनमोल ??
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

ये रे घना ये रे घना.......... Empty Re: ये रे घना ये रे घना..........

लिखाण  Sponsored content


Sponsored content


वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही