नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


अमेरिकन विद्यार्थ्याची मराठीची शाळा

Go down

 अमेरिकन विद्यार्थ्याची मराठीची शाळा Empty अमेरिकन विद्यार्थ्याची मराठीची शाळा

लिखाण  Admin Wed May 16, 2012 8:43 pm

भारतात येणारे परदेशी विद्यार्थी (विशेषत: अमेरिकन) वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये शिकणारे असतात. इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म, साहित्य इत्यादी ज्ञानशाखांमध्ये शिकणारे हे विद्यार्थी दलित साहित्य, मराठी संत, मराठी वृत्तपत्रं, मुंबईचा इतिहास यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीजबचतीसाठी सौरऊर्जा अशा कुठल्याही विषयांचा अभ्यास करत असतात आणि यासाठी पुण्यात राहून ते मराठी शिकतात.

जागतिकीकरणाच्या या काळात भाषांना पुन्हा महत्त्व आलं आहे. भारतात इतर शिक्षणाबरोबर एक तरी परभाषा शिकावी, असं मानणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परदेशातही दक्षिण आशियाई भाषा आणि संस्कृतींच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळालं आहे. त्यामुळे हा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. भाषांच्या वाढीसाठी, भाषा टिकवण्यासाठी हे चित्र उत्साहवर्धक आहे, यात शंका नाही.

पुण्यात शिकायला किंवा नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या अलिकडे खूप वाढली आहे. बऱ्याच कंपन्या नोकरीनिमित्त पुण्यात येणाऱ्यांना मराठी येणं अत्यावश्यक असल्याची अट घालत आहेत. नोकरीसाठी मराठी शिकणं ठीक आहे; पण शिक्षण आणि संशोधनासाठी मराठी शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी पाहिले, की लोकांना खूप आश्चर्य वाटतं. मराठी का शिकायची? आणि मराठीत काय शिकायचं असतं? हे बहुधा त्यांना पडलेले प्रश्न असतात.

भारतात येणारे परदेशी विद्यार्थी (विशेषत: अमेरिकन) वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये शिकणारे असतात. इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म, साहित्य इत्यादी ज्ञानशाखांमध्ये शिकणारे हे विद्याथीर् दलित साहित्य, मराठी संत, मराठी वृत्तपत्रं, मुंबईचा इतिहास यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीजबचतीसाठी सौरऊर्जा अशा कुठल्याही विषयांचा अभ्यास करत असतात आणि यासाठी पुण्यात राहून ते मराठी शिकतात. काहींना वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात राहायचं असतं म्हणून ते मराठी शिकतात.

मराठी अवघड आहे?

मराठी अवघड आहे असा बहुतेकांचा समज असतो त्यांना मराठी शिकताना येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतात. काही विद्यार्थ्यांना लिपीसुद्धा माहीत नसते, त्यामुळे लिपीचा सराव करण्यातच बराचसा काळ जातो. काहींना मात्र लिपीचा सराव करण्यातच बराचसा काळ जातो. काहींना मात्र, लिपी आणि जुजबी मराठी वाक्यं येत असतात. लिपीबाबत येणाऱ्या अडचणींबद्दल सांगायचं, तर त्यांना सर्वात अवघड असतं, ते इंग्लिश शब्द देवनागरीत वाचणं. डॉक्टर, हॉस्पिटल, मॅनेजमेंट, ऑफिस, सक्सेसफुल, हाउसफुल असले शब्द वाचून ते दचकतात. एकतर वेगळ्या लिपीत स्वभाषेतले शब्द त्यांना ओळखू येत नाहीत. दुसरं म्हणजे, या शब्दांचं ज्या स्थानिक उच्चारणानुसार लेखन केलेलं असतं, ते उच्चारण त्यांना पूर्ण अपरिचित असतं. भरीस भर 'येथे पन्चर काढून मिळेल' यांसारख्या पाट्या.

या धक्क्यातून ते थोडे सावरले, की मराठी व्याकरणाशी त्यांची धक्काबुक्की सुरू होते. यात मराठीतली 'तू, तुम्ही' ची 'भानगड' त्यांना गोंधळून टाकते. शिवाय असंख्य नातेवाचक शब्द. त्यांचे वापराचे स्थानिक संदर्भ (भानगड शब्दावरून आठवलं, पुढं पुढं हे विद्याथीर् इतके तयार होतात, की भानगड, तमाशे, राडा, बोंबाबोंब, खडूस, यडछप असले शब्द सराईतपणे वापरायला लागतात.) सगळ्यांत त्यांच्या सहनशीलतेचा कळस होतो, तो लिंगव्यवस्था (जेंडर) शिकताना. एकतर मराठीत वस्तूंना, भाववाचक नामांना लिंगे आहेत, हे त्यांना कळायला अवघड जातं. त्यात पुन्हा 'पंखा' हा कुठल्या कारणानं पुरूषधमीर् मानायचा? 'खिडकी' ही कुठल्या कारणानं स्त्रीधमीर् मानायची? आणि 'दार' हे कुठल्या कारणानं नपुंसकधमीर् मानायचं, हे त्यांना कळत नाही.

कंटाळा, वैताग, राग, लोभ, मोह, मद, मत्सर, हे शब्द पुल्लिंगी आणि हिंसा, भीती, करुणा, दया, मैत्री, प्रीती हे शब्द स्त्रीलिंगी असावेत, यात काहीतरी रहस्य दडलं आहे, असं त्यांना वाटतं.

सामान्यरूप ही अवघड वाटणारी दुसरी गोष्ट. हे माझं नवं पुस्तक हा एक साधा पदबंध. 'पुस्तका'नं एखादा पदबंध घेतला, की पूर्ण बदलून जाणार. लगेच प्रत्येक शब्द बदलून 'ह्या माझ्या नव्या पुस्तकात' होणार. (ही काय कटकट आहे असं वाटून अनेक निमभाषिकसुद्धा 'पुस्तकमध्ये' वगैरे बोलताना दिसतात, ही एक जाता जाता केलेली नोंद!)

मराठी पदबिन्यास अतिशय नवनिर्माणक्षण असल्यानं मराठीत मोठ्या प्रमाणावर नवीन शब्द तयार होतात आणि कुणीही करू शकतं. नापास हा मराठीतला शब्द विद्यार्थ्यांना चक्रावून टाकतो. 'ना' हा नकार दर्शवणारा पूर्वप्रत्यय आणि 'पास' हा इंग्रजी शब्द यांचं हे अनोखं मिश्रण आहे हे कळल्यावर ते सर्द होतात. एका भाषेतला प्रत्यय दुसऱ्या भाषेतल्या शब्दाला जोडून असंख्य शब्द मराठीनं तयार केले आहेत. रोज नवनवे शब्द अजूनही तयार होत आहेत. उदाहरण : महासिनेमा.

या सगळ्यांमध्ये रूळेपर्यंत वेगवेगळ्या वाक्यरचना समोर येतात.

मला जायचं आहे...
मला जावं लागतं...
मला जावंसं वाटतं...
मी जाऊ शकतो...
मला जाता येतं...

अशा असंख्य वाक्यरचना थोडासा बदल झाला, की वेगळाच अर्थ दाखवणाऱ्या शिवाय सकर्मक-अकर्मक क्रियापदांची भानगड. पुन्हा मराठीचं कधी संस्कृतीनुसार वागणं, कथी स्वत:च्या नियमांनी चालणं.

एवढ्या सगळ्या अडचणींमधून हा विद्याथीर् चिवटपणे शिकत राहातो आणि शेवटी इतका तयार होतो, की आजच्या काळातले पुलं, प्रकाश संत, श्याम मनोहर, नेमाडे असोत, की ढेरे, सरदार, सदानंद मोरे असोत, 'गावगाडा'वाले अत्रे असोत, की श्रीधर व्यंकटेश केतकर, फुले असतो, की शरद पाटील... सर्व प्रकारच्या शैलीतलं लेखन ते वाचू शकतात. चित्रे, कोल्हटकर, सुवेर्, महानोर, ढसाळ, बहिणाबाई, पाडगावकर, भट, अनिल, ग्रेस, मढेर्कर, कुसुमाग्रज यांच्या कविता किंवा ज्ञानेश्वराची ओवी, तुकोबांचा अभंग वाचतात. साहित्याचा आनंद घेतात. त्यातले बारकावे जाणून घेतात आणि आपण शिकतो ते सर्व वापरण्याचा प्रयत्न करतात. चुका झाल्या, तरी बेहत्तर!

अर्थात त्यांना इथपर्यंत घेऊन येणं सोपं नाही. विशेषत: मराठीत चांगले पर्यायी शब्दकोश आणि विविध प्रकारच्या संदर्भसाधनांची वानवा असताना! पण ही वानवा असणं ही नुसती नोंदवण्याची बाब नाही, तर लेखिकेसह सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून हे संदर्भसाहित्य वाढवलं पाहिजे हे जाणण्याची आणि कृती करण्याची गोष्ट आहे. प्रस्तुत लेख हा मराठीविषयीची सजगता निर्माण करण्याच प्रक्रियेतलाच एक भाग आहे, असं लेखिकेचं मत आहे.


संपदा वागळे
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही