नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

डोळ्यांत वाच माझ्या

Go down

डोळ्यांत वाच माझ्या Empty डोळ्यांत वाच माझ्या

लिखाण  Admin on Thu May 17, 2012 5:27 pm


रणरणत्या उन्हात त्वचेची काळजी घेण्याच्या हजार टिप्स तुम्हाला मिळत असतील. पण उन्हाचा जास्त त्रास डोळ्यांना होतो. डोळ्यांवर ताण पडून थकल्यासारखं वाटतं , डोकं दुखतं. डोळ्यांवरचा हाच तणाव कमी करून त्यांना आराम देण्यासाठी काही व्यायाम करून पहाणं गरजेचं आहे.

डोळ्यांवर पडलेल्या तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते का ?

हो नक्कीच. डोकेदुखीसाठी डोळ्यांवर पडलेला तणाव नक्कीच कारणीभूत ठरू शकतो. आणि तो वाढत गेल्याने तीव्र डोकेदुखीची समस्याही उद्भवू शकते.

मंद प्रकाशात वाचन केल्याने डोळ्यांवर ताण येतो का ?

हो. वाचनासाठी नेहमी भरपूर , स्वच्छ प्रकाश असणं महत्वाचं आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.

कॉम्प्युटरवर काम करणं डोळ्यांसाठी हानिकारक आहे का ?

नाही. कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना इजा पोहोचत नाही. पण सतत कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसल्याने किंवा वाचन केल्याने डोळ्यावर ताण पडतो. म्हणूनच कामामध्ये छोटा ब्रेक घेणे आवश्यक आहे.

वाचन करताना पुस्तक आणि डोळ्यांमध्ये अंतर ठेवणे कितपत महत्वाचे असते ?

वाचन किंवा लिखाण करताना डोळ्यांमध्ये आणि पुस्तकात कमीत कमी १२ इंच अंतर असणं आवश्यक आहे. त्याने डोळ्यांवर ताण पडत नाही.

नमिता जैन
क्लिनिकल एक्सरसाइज , लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट


डोळ्यांसाठी सोपे व्यायाम

दोन्ही तळहात काहीशी उब तयार होईपर्यंत एकमेकांवर घासा. त्यानंतर त्यांचा खोलगट आकार करून बंद डोळ्यांवर ठेवा. या स्थितीत तुमचे हात किमान १ मिनिट तरी ठेवा. साधारण ३ वेळा सलग ही कृती होऊ द्या. दिवसातून जास्तीत जास्त वेळा हा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

पापण्यांची उघडझाप करणे हा एक साधा पण परिणामकारक व्यायाम आहे. दर २० सेकंदांनी पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांवरचा तणाव कमी होतो.

मान स्थिर करून डोळे वर खाली करण्याचा व्यायामप्रकार करता येईल. साधारण १० वेळा ही क्रिया
केल्याने डोळ्यांना आराम मिळू शकतो.

त्याचप्रमाणे मान न हलवता उजवीकडे व डावीकडे डोळ्यांच्या हालचाली करता येतील. सलग १० वेळा ही क्रिया केल्याने फायदा होतो.

शब्दांकन - आंकांक्षा मारुलकर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही