नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


रोमांचकारी नथुल्ला पास

Go down

रोमांचकारी नथुल्ला पास Empty रोमांचकारी नथुल्ला पास

लिखाण  Admin on Thu May 17, 2012 5:33 pm

रोमांचकारी नथुल्ला पास P1110819

एका बाजूला चीन आणि एका बाजूला भारत...समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार ७५० फूट उंचीवर असलेल्या नथुल्ला पास इथे भारताच्या सीमेवर उभं राहण्याचा हा अनुभव खूप रोमांचकारी होता.

हिमालयाचं आकर्षण असल्याने संधी मिळताच तिथे जायचं हे ठरलंच होतं.. तो रोमांचकारी अनुभव मिळाला तो नाथुला पास या भारत-चीन सीमेवर... सकाळीच गंगटोकवरून नथुला बॉर्डरकडे निघतानाच प्रचंड उत्सुकता होती. सिक्कीम ट्रीपचं आयोजन करतानाच पहिला आग्रह होता हा नथुल्ला पास पाहण्याचा. समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार ७५० फूट उंचीवर असलेली भारताची ही सीमा हे सगळं वाचलेलं होतं. आता वेळ होती अनुभवाची.

गंगटोक ते नथुल्ला हे अंतर अवघं ५७ किमी. मूळात ४ फुटाचा रस्ता. तोही पूर्ण खडा चढ. ४५ अंशातला पूर्ण रस्ता. कमालीच्या अरूंद आणि वळणावळणाच्या रस्त्यावर सुमो सारख्या गाड्या फक्त चालतात. १० वाजता परवानगी मिळताच तब्बल २०० पेक्षा जास्त गाड्या सुटल्या. थोडी एक इंचाची चूक की थेट हजार - दोनहजार फूट दरीत. फार फार तर २० च्या स्पीडने गाड्या चढत असतात. अनेकवेळा गाड्या चढावरून खाली घसरतात. त्यामुळे गाडीला गाडी मागे ठेवून चालविता येत नाही.

एव्हाना १२.३० वाजले होते अंतर किती झाले याचा अंदाज नव्हता. टॉसमंगो लेक हे १२ हजार फूट उंचीवरचं तळं आलं आणि बर्फाचे डोंगर दिसायला सुरुवात झाली. हवेतला गारवा प्रचंड वाढला. बहुतेक प्रवासी या तळ्यापर्यंतच येतात त्यामुळे इथपर्यंत आलेल्या गाड्यांच्या ताफ्यातले फक्त वरती ५० एक गाड्या नथुल्ला पासच्या दिशेने निघाल्या. आणि इथून सुरू झाला एक थरारक प्रवास.

हवामानात सतत बदल होत होते. स्वच्छ असणारं हवामान एकदम ढगाळ व्हायला सुरुवात झाली. बर्फाचे खडे गाडीवर कोसळू लागले. दोन्ही बाजूंनी बर्फ , गाडीवर साठणारा बर्फ , रस्त्यावर बर्फ आणि बाहेर काळाकुट्ट अंधार. पुन्हा अर्ध्याता सात वातावरण बदललं , स्वच्छ झालं.

थोड्या वेळात वातावरण पुन्हा बिघडलं. तुफान पडणारा बर्फाचा पाऊस , गाड्या या बर्फावरून पुढेच जात नव्हत्या. उलट्या मागे येत होत्या. ब्रेक लावूनही काही उपयोग नाही. बर्फावरून गाड्या मागे घसरत होत्या. आमच्या गाडीच्या बोनेटवर ४ इंच जाडीचा बर्फाचा थर जमलेला. काचेवर बर्फ , गार झोंबणारा वारा. हाडं गोठविणारी थंडी. तापमान उणे चारपर्यंत घसरलेलं. निसर्गाचं हे रौद्ररूप होतं. संपर्काचं कोणतंही साधन नाही. आम्ही नथुल्ला सीमेपासून फक्त चार किमी अंतर लांब होतो. गाडी रस्त्यावरील बर्फामुळे पुढे सरकारला तयार नव्हती. ड्रायव्हर त्या भागातलाच अनुभवी होता. हवामानामुळे परतीचा आग्रह धरत होता.

आमच्या अगोदर आणि मागच्या गाड्यांनी परतीचा निर्णय घेतलेला. आता रस्त्यावर फक्त दोन गाड्या. ड्रायव्हरला सांगितलं , ' थांबू , पण परत जायचं नाही ' आमची गाडी मध्येच उभी. पुन्हा थोड्या वेळाने पाऊस कमी झाला ड्रायव्हरने गाडी सुरू केली काचा साफ केल्या. पण तेच सुरू होतं. ५० फूट पुढे आणि परत बर्फावरून घसरत १० फूट मागे असा आमचा प्रवास सुरू होता. सीमा अवघी ८०० मीटर अंतर असताना आमच्याबरोबर असणाऱ्या एकमेव गाडीनेही हार मानली. ती गाडी पुढे जायलाच तयार नव्हती. त्या गाडीतले प्रवासी आमच्या गाडीत आले अन आमचा शेवटचा टप्पा सुरू झाला.

नथुल्लाला पोहचलो तर तिथे भारतीय सैन्य प्रवाशांच्या काळजीसाठी उभेच असतात. सीमा संरक्षणबरोबर जणू हाही एक उद्योग. ' हवामान खराब आहे. सीमा पहा आणि ताबडतोब निघा ' असा आदेशच त्यांनी दिला. थेट सीमेवरच्या पोस्टवर आम्ही पोहचलो. तापमान मायनस चार होतं. इथे मात्र आमचा ऊर अभिमानानं भरून आला. तब्बल १४ हजार ७५० फूटांवर आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला आम्ही सॅल्यूट केला. सैनिकांच्या प्रतिकूल वातावरणाबद्दल वाचणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं. पूर्णपणे लहरी निसर्गाला तोंड देत सीमेचं रक्षण करणं म्हणजे काय हे लक्षात आलं.

सीमेपलीकडे असलेली चीनची चौकी मात्र एकदम उत्तम बांधलेली होती त्यामानाने आपली चौकी म्हणजे फक्त पत्र्याचे शेड होते. जिथे गार वाहणाऱ्या वाऱ्याने आम्हाला उभं राहणंही अवघड होतं. तिथे या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही आपले सैनिक मात्र अतिशय सहजतेने उभे होते.

इथे इतक्या उंचीवर सैन्याचं छोटंसं कॅन्टीन आहे. अत्यंत माफक दरात इथे चहा कॉफी आणि खाण्याचे पदार्थ मिळतात. या सैनिकांबरोबर उभे राहून चहाचे घोट घेताना नकळत छाती फुगून आली होती. सीमेवर उभं राहणं म्हणजे काय हे मी अनुभवत होतो. एका बाजूला चीन आणि एका बाजूला भारत. बरोबर सीमेवर आम्ही उभे होतो. सगळीकडे पसरलेला बर्फ , झोंबणारे गार वारे , आपले बहादूर सैनिक आणि सोबत पत्नी आणि मुलगा , सैनिकांचा उत्साह त्यांच्याबरोबर साजरा केलेला माझा वाढदिवस खूप काही सांगून गेला. आयुष्यभर पुरेल असा हा अनुभव होता.

- केशव उपाध्ये
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही