नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 0 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 0 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


निव्वळ अधोगती!

Go down

निव्वळ अधोगती! Empty निव्वळ अधोगती!

लिखाण  Admin on Thu May 17, 2012 5:35 pm

खेळाचा बाजार झाला की काय होते, ते इंडियन प्रीमियर लीगच्या पाच खेळाडूंवर मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून झालेल्या कारवाईने स्पष्ट केले आहे. गेली पाच वर्षे चालणाऱ्या या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अटीतटीने झुंजणाऱ्या खेळाडूंमध्येच टी. पी. सुधींद, मोहनिश मिश्रा, अभिनव बाली, शलभ श्रीवास्तव आणि अमित यादव हे क्रिकेटपटू पैशासाठी आपले इमान विकायला तयार झाल्याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. यापैकी शलभ याने हे सारे बनावट असल्याचा कांगावा केला आहे; तर आपण जे बोललो ते अगदी सहजपणाने बोललो असल्याचा खुलासा मोहनिश मिश्रा याने केला आहे. पैसे घेतल्याचा गंभीर आरोप एखाद्यावर झाल्यावर असा कांगावा किंवा खुलासा करण्याची रीतच झाली आहे. या दोन क्रिकेटपटूंनी त्याचाच कित्ता गिरविला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या खेळात अमाप पैसा आला. यामुळे खेळाडूंचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पालटला. त्यांच्यामध्ये एक व्यावसायिकता निर्माण झाली. व्यावसायिक टेनिसपटू असतात, तसे व्यावसायिक क्रिकेटपटू निर्माण होऊ लागले. अर्थात, कोणी कोणता व्यवसाय निवडायचा हे ज्याच्यात्याच्या आवडीवर आणि कौशल्यावर अवलंबून असते. त्यामुळे त्याबाबत तक्रार करण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येक व्यवसायाचे म्हणून काही संकेत असतात. काही नियम असतात. काही परंपरा असतात. मात्र, अलीकडच्या काळात व्यावसायिक संकेत, नियम पाळावयाचे नाहीत; परंपरांना छेद देईल असेच वर्तन करावयाचे आणि ते उघड झाल्यावर कांगावा करायचा, अशी रीत बहुसंख्य व्यवसायांत दिसू लागली आहे. एकंदरच समाजामध्ये व्यावसायिक निष्ठा कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागणे चिंताजनक आहे. त्यातून क्रिकेटचे जगही मुक्त नाही, हेच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पाच खेळाडूंच्या वर्तनावरून स्पष्ट झाले आहे. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ असल्याचे आता इतिहासजमा होऊ लागले आहे, असाच याचा अर्थ आहे. यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेचा हेन्सी क्रोनिए, भारताचेच महंमद अझरुद्दिन, अजय जाडेजा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा या क्रिकेटपटूंवर याचप्रकारच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरल्याचा ठपका ठेवला गेल्याची आठवण येते. याचा अर्थ क्रिकेटकडे एक क्रीडाप्रकार म्हणून पाहण्याचे दिवस आता राहिले नाहीत. तो एक पैसा आणि कीतीर् देणारे साधन ठरू लागला आहे. सध्याच्या जगात याच गोष्टींना नको इतके महत्त्व आले असल्याने त्या मिळविण्यापाठी अनेकजण धावत आहेत. त्यामुळेच खेळ संपून पैशाचा हिशेब सुरू झाला आहे. देशासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळावयाचे नाही; मात्र आयपीएलमध्ये सहभाग घ्यावयाचा ही मतलबी वृत्ती त्यातूनच निर्माण झाली आहे. जेव्हा कर्तव्यापेक्षा मतलब श्रेष्ठ ठरतो आणि व्यावसायिक निष्ठेपेक्षा स्वार्थ व पैसा वरचढ होतो, तेव्हाच खेळाडूंचा तोल जायला सुरुवात होते. दुसरे असे की सध्याच्या विलक्षण स्पधेर्च्या युगामध्ये सतत अपयशी होणे कोणालाच झेपणारे नसते. त्याचाही एक मानसिक ताण प्रत्येक खेळाडूवर असतो. या साऱ्याचा परिपाक स्टंपवर लाथ मारणे, दुसऱ्या खेळाडूशी अर्वाच्य भाषेत वितंडवाद घालणे, बॅट उगारणे, हमरीतुमरीवर येणे अशा लज्जास्पद प्रकारात होतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांतही असे प्रकार झालेच; परंतु सुदैवाने संबंधित खेळाडूंना दंडही ठोठावला गेला. परंतु अशा दंडात्मक कारवाईचा अपेक्षित व दीर्घकालीन परिणाम या स्पधेर्त भाग घेणाऱ्यांवर होत नसल्याचे अनेकदा सप्रमाण सिद्ध झाले आहे. मुळात आयपीएलमध्ये खेळला जाणारा खेळ हा क्रिकेटच्या मूळ प्रकृतीशी अगदीच विसंगत आहे. परंतु वेगवान जीवनशैलीमध्ये लोकांचे झटपट मनोरंजन करण्यासाठी आणि त्यातून पैसे मिळविण्यासाठी हा खेळ सुरू झाला. एकेकाळी फ्रीस्टाईल कुस्त्यांचे फड लागत आणि त्यातील फोलपणा माहीत असूनही त्याला लोक गदीर् करत. त्या आभासात्मक कुस्त्या पाहताना रोजच्या कटकटी विसरत. आयपीएलच्या सामन्यांना आता त्याचीच कळा आली आहे, असे म्हणावे लागते. एकेकाळी क्रिकेटचा मोसम ठरलेला होता. आता बाराही महिने हा खेळ खेळला जातो. त्यातून खेळाडूंना येणारा शारीरिक, मानसिक व बौद्धिक थकवा कोणाच्याही खिजगणतीतही नाही. त्यामुळेच उन्हाळ्यात भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास भलेभले खेळाडूही उत्सुक असतात. या साऱ्याच गोष्टींतून एका चांगल्या क्रीडाप्रकाराची अधोगती झाली आहे. ती थांबविण्यासाठी आता जाणत्या, संयमी क्रिकेटपटूंनीच पुढाकार घ्यायला हवा.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही