नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


त्याला अमेरिकेचा अपमान चालतो!

Go down

त्याला अमेरिकेचा अपमान चालतो! Empty त्याला अमेरिकेचा अपमान चालतो!

लिखाण  Admin Sat May 19, 2012 7:39 pm

[You must be registered and logged in to see this image.]

अमेरिकेच्या विमानतळावरील सुरक्षा रक्षक शाहरुख खान यांना चार-पाच तास अडकवून ठेवतात. त्यांचे कपडे उतरवून झडती घेतात तरी खान यांचा रागाचा पारा चढत नाही व ते पुन: पुन्हा अमेरिकेत जाऊन स्वत:चा अपमान करून घेतात ; पण वानखेडेवरील गरीब सुरक्षा रक्षकांशी मात्र ते हुज्जत घालतात, असा सणसणीत टोला लगावलाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.

वानखेडे मैदानावर शाहरुखच्या ( गैर ) वर्तनाचा बाळासाहेब ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. इकडे ते कसेही वागले तरी त्यांना कायद्याचे , काँग्रेसचे खास संरक्षण आहे, असा टोमणाही बाळासाहेब ठाकरे यांनी लगावला आहे.

हिंदुस्थानच्या राजकारणात , सिनेक्षेत्रात , क्रिकेट व उद्योग क्षेत्रातही सध्या फक्त ' सिलिब्रिटीं ' चीच चलती आहे व हे सिलिब्रिटी आपल्याच मस्तीत बेधुंद झालेले आहेत. त्यांचे समाजातील वागणे व बोलणे यांचा लोकभावनेशी मेळ बसत नाही. म्हणूनच अभिनेता शाहरुखच्या तथाकथित धिंगाण्याचे काय करायचे ते कायदा पाहून घेईल. वानखेडे स्टेडियमवरील ड्रेसिंग रूममध्ये जाण्यापासून शाहरुख खान याच्या मुलांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. त्यामुळे भडकलेल्या शाहरुखने मारहाण , शिवीगाळ , धमक्या वगैरेंचा वापर केला. ' जिंदा गाड दूंगा ' असा फिल्मी डायलॉगही त्याने मारला. जिंदा गाड दूंगा , दफना दूंगा म्हणजे काय ? कायद्याच्या भाषेत ही धमकी कोणत्या कलमाखाली बसते ? व त्या संदर्भात गुन्हा दाखल होताच काय करावे लागते , हे काय आम्ही पोलिसांना सांगायला हवे ? , असा सवालही त्यांनी पोलिसांना केला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता शाहरुख यास पाच वर्षे वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवण्यास बंदी घातली आहे. असोसिएशनच्या तातडीने झालेल्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यापुरती कारवाई केली. आता पोलीस काय कारवाई करणार आहेत ? अर्थात , शाहरुख खानवर आजन्म वानखेडे बंदीची भाषा करणा-यांनी ही बंदी पाच वर्षांवर आणली हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे, असे म्हणत एमसीएच्या कारवाईवरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

वानखेडेवरदेखील शाहरूखने पुन्हा ' माय नेम इज खान ' दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेही खानाचा हा शो फ्लॉपच झाला! अमिताभ बच्चन यांच्यापासून त्यांनी शिकावे व चांगल्या कार्यातही नाव कमवावे. बच्चन यांच्या पायास हात लावण्यापेक्षा त्यांचे पाय जमिनीवर इतके मजबूत का आहेत ते शोधावे, असा सल्लाही बाळासाहेबांनी आपल्या अग्रलेखातून दिला आहे.


- महाराष्ट्र टाईम्स
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही