नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


मणिपूरच्या शाळेत घुमतात मराठी प्रार्थनेचे स्वर

Go down

मणिपूरच्या शाळेत घुमतात मराठी प्रार्थनेचे स्वर Empty मणिपूरच्या शाळेत घुमतात मराठी प्रार्थनेचे स्वर

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 7:51 pm

मणिपूरच्या शाळेत घुमतात मराठी प्रार्थनेचे स्वर 16216_Shalaka

‘माझ्या मराठी भाषेचा, लावा कपाळाला टिळा’, असे म्हणत राज्यात विविध ठिकाणी नुकताच मराठी भाषा दिन साजरा झाला. पण, राज्याबाहेरही मराठीचा झेंडा दिमाखाने फडकत आहे, तोही महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असणाऱ्या मणिपूरसारख्या ईशान्येकडच्या राज्यात. येथील खारासोम मधील ओझा शंकर विद्यालयात रोजची प्रार्थना मराठीत आळविली जाते.

या शाळेतील आठवीपर्यंतचे जवळपास १५० विद्यार्थी शाळेची मराठी प्रार्थना अस्खलितपणे म्हणतात. या विद्यार्थ्यांचे एरव्ही रोजचे शिक्षण आणि व्यवहार इंग्रजी भाषेत होत असले तरी प्रार्थना मात्र मराठी भाषेत होते. ‘हे परमात्मन जगन्निवासा शुभंकरा श्रीकरा’ असे म्हणत परमेश्वराची आळवणी केली जाते. त्याचबरोबर ‘ये कल कल करती क्या कहता गंगाधारा’ हे राष्ट्रीय एकात्मता साधणारे गीत हे विद्यार्थी त्यांच्या पहाडी आवाजात सादर करतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहते.

या सगळ्यामागे ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या डॉ.देवराव पाटील यांची गेल्या ३ दशकांची मेहनत आहे. डॉ.पाटील यांना या कार्याची प्रेरणा भैय्याजी काणे यांच्यापासून मिळाली. १९७२ साली शंकर दिनकर उर्फ भैय्याजी काणे मणिपूरला गेले. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी तेथील चिमुरड्यांना ज्ञानदानाचे कार्य करण्यास सुरवात केली. नंतर त्यांनी २ मुलांना महाराष्ट्रात शिक्षणासाठी आणले. ही संख्या नंतर वाढत गेली. काणे यांच्यानंतर डॉ.पाटील यांनी मणिपूरहून शिक्षणासाठी मुलांना आणले. मुलांना हजारो मैल दूर पाठवण्यासाठी त्यांच्या पालकांची मने वळविली. यातूनच या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मणिपूरच्या जनतेमध्ये भारतापासून तुटलेपणाची भावना होती. ही भावना संपवून राष्ट्रीय एकात्मता साधणे हे सर्वात मोठे आव्हान होते. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या काणे यांच्या कार्यसंकल्पनेची डॉ.देवराव पाटील यांना भुरळ पडली आणि त्यांनीही या कार्याला हातभार लावला. सुरुवातीला हे काम डॉ.पाटील व्यक्तिगत पातळीवर करत होते. त्यातूनच १९८३ साली पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान हा ट्रस्ट उभा राहिला. या ट्रस्टच्या माध्यमातून डॉ.पाटील यांनी मुलांना आपल्याबरोबर शिक्षणासाठी महाराष्ट्रात आणण्याचे काम सुरूच ठेवले. कर्नाटकातील काही शहरात हे विद्यार्थी राहिल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, सांगली अशा ठिकाणीही या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली होती. जवळपास १५ वर्षे ही मुले डॉ.पाटील यांच्याकडे राहिली. या मुलांच्या निवासाची आणि भोजनाची सोय त्यांनी केली. डॉ.पाटील यांच्या पत्नी डॉ.नीला पाटील यांनीही या राष्ट्रीय कार्यात साथ दिली.

या शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्कारांसाठी मणिपूरहून हजारो मैल विद्यार्थ्यांना आणण्यापेक्षा तेथेच शाळा सुरू करावी, असा विचार डॉ.पाटील यांच्या मनात आला. या वेळेपर्यंत अनेक नागा, कुकी विद्यार्थी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते आणि आपल्या गावी परतले होते. त्यांच्यातील सकारात्मक बदल, उत्तम संस्कारित व्यक्तिमत्त्व यामुळे नागा पालकही प्रभावित झाले. त्यापैकी एका कुटुंबाने खारासोम (मणिपूर) येथे पाच एकर जमीन शाळेसाठी दिली आणि २७ ऑक्टोबर २००९ रोजी नागा विद्यार्थ्यांसाठी ओझा शंकर विद्यालयाचे स्वप्न साकार झाले. या एकमजली आरसीसी बांधकाम असलेल्या इमारतीत डॉ.पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी तेथे ज्ञानदान करण्याचे कार्य हाती घेतले आहे. सध्या आठवीपर्यंतचे शिक्षण या शाळेत दिले जात आहे. दूरच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. सध्या जवळपास १५० विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत जवळपास ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी येथून चांगल्या भविष्याचा पाया रचून बाहेर पडले आहेत.

सध्या या शाळेत रोज मराठीतून प्रार्थना म्हटली जाते. कवी द.के.भट यांनी रचलेली ही कविता पुढीलप्रमाणे :

हे परमात्मन जगन्निवासा शुभंकरा श्रीधरा
पद रविंदा तुझ्या वंदन आरंभी ईश्वरा
स्मरण तुझे संजीवक तारक
तिमिर विनाशक, प्रकाशप्रेरक
मनामनांचा संगम न्यावा प्रसन्नतेच्या घरा

या शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी ख्रिश्चन आहेत. त्यामुळे आपल्या देवाची प्रार्थना करण्यापेक्षा सर्व जगात एकच कर्ताकरविता आहे, हे संस्कार त्यांच्या मनावर कोरले जावे, हा ही प्रार्थना घेण्यामागचा हेतू. हे संस्कृतप्रचूर मराठी बोल नागा विद्यार्थ्यांच्या ओठावर आता सहजपणे रूळले आहेत.

परस्परांचे करू संरक्षण सम्यक पोषण बलसंवर्धन
द्वेषाचे कधी न जडो लांच्छन स्नेहांकित अंतरा
अखिल अध्ययन हो तेजोयुत, गुरू पदविला नेऊ भारत
विश्वी नांदू बांधव बांधव सुखवू विश्वेश्वरा

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही कविता जेव्हा पठण केली जाते तेव्हा आपण निश्चितच मराठी असल्याचा अभिमान वाढतो.

एक काळ असा होता की ईशान्येकडच्या प्रदेशात हिंदी भाषेवर बहिष्कार असल्यासारखेच होते. फूटबॉल आणि क्रिकेट एवढेच खेळ इथे खेळले जात असत. पण, आज इथल्या मुलांच्या ओठावर हिंदी गाणी रूळू लागली आहेत. खो-खो, कबड्डी यासारखे खेळ इथे खेळले जाऊ लागले आहेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी असे राष्ट्रीय सण साजरे होऊ लागले आहेत. वैद्यकीय शिबिरे घेतली जात आहेत. विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन मिळू लागले आहे.

पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.देवराव पाटील यांनी मणिपूर आणि नागालँडच्या दुर्गम भागातील तरूण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवून अपप्रवृत्तीच्या विळख्यात अडकण्यापासून वाचविले आहे आणि शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता साधून मने जोडली आहेत. विशिष्ट ध्येयाने जगण्याचा काळ आता मागे सरला आहे, असे वाटत असतानाच डॉ.पाटील, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांचे सहकारी यांनी एक पिढी चुकीच्या दिशेकडे जाण्यापासून वाचविली आहे. गेली ३ दशके हे काम अत्यंत निष्ठेने केले जात आहे. कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता डॉ.पाटील यांनी घेतलेले हे व्रत निश्चितच प्रेरणादायी आहे.

संप्रदा बीडकर

Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही