नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

फसवाफसवीचा खेळ

Go down

फसवाफसवीचा खेळ Empty फसवाफसवीचा खेळ

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 8:02 pm

खेळाडूंच्या फिक्‍सिंगमुळे क्रिकेटची विश्‍वासार्हताच धोक्‍यात येते. त्यामुळे केवळ खेळाडूंच्या चौकशीऐवजी व्यवहारांतील संपूर्ण सत्य शोधले पाहिजे.

सध्या मोठ्या धूमधडाक्‍यात सुरू असलेल्या "आयपीएल' क्रिकेट सामन्यांमुळे देशभरातील लक्षावधी जनतेचे घरबसल्या मनोरंजन होत असले, तरी एका टीव्ही चॅनेलने या मालिकेतील पाच खेळाडूंच्या विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे करून एका नव्याच वादास तोंड फोडले आहे. क्रिकेट आणि फुटबॉल या जगभरात अमाप लोकप्रियता गाठणाऱ्या आणि त्यामुळेच अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या खेळांत "फिक्‍सिंग'ची प्रकरणे नवी नाहीत. त्यामुळेच "आयपीएल'च्या आयोजकांनी या टीव्ही चॅनेलवरील स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पाच खेळाडूंना 15 दिवसांसाठी का होईना निलंबित करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे; पण या संबंधातील जो काही तपशील गेल्या दोन दिवसांत उजेडात येत आहे, त्यामुळे या खेळाडूंबरोबरच या टीव्ही चॅनेलच्या विश्‍वासार्हतेबाबतही प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. आयपीएल नियंत्रक मंडळाने बंदी घातलेल्या पाच खेळाडूंपैकी चार खेळाडू हे पूर्वी भरवल्या जात असलेल्या "इंडियन क्रिकेट लीग'चे माजी सदस्य आहेत. पैकी टी. पी. सुधींद्र आणि मोहनीश मिश्रा या वर्षी आयपीएलमध्ये काही मोजके सामने खेळलेही आहेत. पण त्यांची नावेही हे सामने नियमितपणे पाहणाऱ्यांच्या खिजगणतीत नाहीत. शिवाय, शलभ श्रीवास्तव हा गेले महिनाभर दुखापतीमुळे आजारी आहे आणि त्यामुळे "घरी बसून फिक्‍सिंग कसे करता येणार?' असा प्रश्‍न तोच विचारत आहे. अर्थात, हा सारा नंतरचा वकिली युक्‍तिवाद झाला. या चॅनेलकडे असलेल्या ध्वनिफितींनुसार यापैकी बहुतेकांनी काही लाखांच्या मोबदल्यात "स्पॉट फिक्‍सिंग' करण्यास वा त्यासंबंधातील बोलणी पुढे नेण्यास मान्यता दिल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. त्यामुळेच संयोजकांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्णय घेतले आणि खेळाडूंवर बंदीही घातली. पण त्यामुळेच एके काळी "सभ्य माणसांचा खेळ'- ए जंटलमेन्स गेम, असे वर्णन केलेल्या क्रिकेटच्या विश्‍वासार्हता कोणी जाणूनबाजून तर मोडीस काढायला निघाला आहे काय, असाही प्रश्‍न उपस्थित झाला असून, त्यासंबंधात ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि डीन जोन्स यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे.

मुळात काही वर्षांपूर्वी काही हजारांत पैसे घेऊन देशासाठी पाच दिवसांचे कसोटी सामने जीव तोडून खेळले जात. पण काळ बदलला. जीवनाला भलताच वेग आला आणि पाच दिवसांचे सामने एक दिवसावर आले आणि आता तर ते अडीच-तीन तासांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे सामन्यातील रोमहर्षकता वाढली आणि त्यापाठोपाठ अब्जावधी रुपयेही आले. क्रिकेट बाजूला पडले आणि ग्लॅमर व चीअर गर्ल्सचा खेळ सुरू झाला. त्यामुळे घटका दोन घटका जिवाची करमणूक होते म्हणून हे सामने बघणाऱ्या प्रेक्षकाची नजर मैदानात नेमकी कोणावर असते, याचेही खरे तर एकदा सर्वेक्षण व्हायला हवे. हे सारे आजच्या जीवनातील वास्तव असले, तरी त्यामुळे जर क्रिकेटच्याच विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न उभा राहत असेल, तर लोक या "रंगबिरंगी सर्कस'कडे पाठ फिरवतील, हे स्पष्ट आहे आणि लोकांनी पाठ फिरवली की त्यापाठोपाठ या खेळात जाहिरातदार आणि विविध टीम्सचे मालक यांनी ओतलेले अब्जावधी रुपयेही मागे घेतले जातील, हे उघड आहे. त्यामुळे क्षणिक लोभासाठी कोणी खेळाडू करोडोंच्या मोहात पडत असेल, तर त्याची मैदानातून कायमची हकालपट्टी व्हायला हवी आणि महंमद अजहरुद्दीनसारख्या मातब्बर खेळाडूला तसा धडा आपण शिकवलाही आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला असून, तो काळ्या पैशांचा आहे. अर्थात, फिक्‍सिंगमध्ये फिरवले जाणारे पैसे हे बेहिशेबी आणि काळ्या धनातलेच असणार, हे उघड आहे. पण आता "आयपीएल'मधील विविध संघांचे "मालक'च या काळ्या पैशाच्या व्यवहारात सहभागी होत आहेत काय, असा मुद्दा पुढे आला आहे. तसे असल्यास खेळाडूंबरोबरच या "मालक'वर्गालाही चाप लावायला हवा, असे मत गावसकर यांनी व्यक्‍त केले आहे. प्रश्‍न तसे करण्यास "आयपीएल'चे संयोजक धजावतील काय, हा आहे. तर डीन जोन्स यांनी खेळाडूंना गैरकृत्ये करण्यास म्हणजेच टेबलाखालून जादा पैसे देऊन आपल्या संघाकडे येण्याचे आमिष मालकवर्ग दाखवतात काय, असा मुद्दा चर्चेत आणला आहे. "खेळाडू नेमके कोणत्या कारणासाठी आपला मालक बदलतात?' असा जोन्स यांचा सवाल आहे. त्यामुळेच आता या प्रकरणाची होणारी चौकशी ही या पाच खेळाडूंपुरतीच सीमित राहता कामा नये. याचे कारण म्हणजे त्यापलीकडचे अनेक व्यापक स्तरावरील मुद्दे या व्यवहारात गुंतलेले आहेत. सुदैव एवढेच, की आता जे खेळाडू या स्टिंग ऑपरेशनच्या आणि फिक्‍सिंगच्या जाळ्यात सापडल्याचे बोलले जात आहे, त्यात कोणी "स्टार' नाही. तरीही खेळ हा खेळाडूपेक्षा महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेऊन यासंबंधातील सत्य हे बाहेर यायलाच हवे.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही