नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


पद्मालय - गणपती पीठ

Go down

पद्मालय - गणपती पीठ Empty पद्मालय - गणपती पीठ

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:23 pm

पद्मालय - गणपती पीठ 9044_MahaS_L

पद्मालय नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतं ते असंख्य कमळं फुललेलं सरोवर. जळगावपासून ३५ कि. मी.वर असलेलं हे तीर्थक्षेत्र. हे गणपती क्षेत्र आहे. अखिल भारतामध्ये गणपतीची ही अडीच पीठं महत्वाची मानली जातात त्या पीठांपैकी हे अर्धे पीठ.

पद्मालय हे ठिकाण पुराणकाळापासून महत्वाचे मानले जाते. महाभारत काळामध्ये पांडवांनी बकासुराच्या वधापुर्वी ज्या एकचक्रानगरीमध्ये आश्रय घेतला होता ती एकचक्रनगरी म्हणजेच पद्मालयापासून अगदी जवळ असलेले एरंडोल. इथेच भिमाने बकासुराचा वध केला असं सांगितलं जातं. गणपतीचे हे मंदिर प्रभाक्षेत्र या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. एका टेकडीच्या माथ्यावर मंदिराचा समुह आहे. या समुहाच्या मध्यभागी मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन स्वयंभू गणेश मुर्ती आहेत. एकाच समतलावर स्थापित केल्या आहेत ज्याला आज पीठ म्हणतात. त्यापैकी एक उजव्या सोंडेची आहे तर एक डाव्या सोंडेची आहे. या मंदिराच्या समोर श्री गोविंद महाराजांच्या पादुका आहेत. या पादुकांच्या जवळच एक प्रचंड मोठी घंटा आहे. या घंटेबद्दल असं सांगितलं जातं की ४४० किलोची ही प्रचंड घंटा भिमाने बकासुर वधानंतर वाजवली होती. या घंटेचा आवाज दुरवर असलेल्या मंदिरातही स्पष्ट ऐकू येतो. मंदिरालगतच्या तलावात असंख्य कमळं फुलली असतात. यामुळेच याठिकाणाला पद्मालय असं नाव मिळालं आहे. पद्मालयाचे हे गणपती मंदिर उजव्या आणि डाव्या सोंडेची गणेश मुर्ती एकत्र असणारे जगातील एकमेव मंदिर आहे. याशिवाय इथे २१ कोरलेल्या गणपतीच्या मुर्ती आहेत. या वैशिष्ट्यामुळे गणेशभक्तांसाठी पद्मालय महत्त्वाचे आहे.

इथे भाद्रपद शु. चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला आणि कार्तिकी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. या मंदिरापासून जवळच मेडीचा गणपती म्हणून एक गणपती मंदिर आहे. शिवाय मंदिरापासून काही अंतरावर एक पाण्याचे कुंड आहे त्याला भिमकुंड म्हणतात. पांडव अज्ञातवासात असतांना त्यांनी इथे आश्रय घेतला असल्यामुळे पांडवाच्या वास्तव्याच्या खुणा गावकरी सांगतात. नयनरम्य परिसर, कमळांनी फुललेला तलाव आणि या सर्व पार्श्वभुमीवर गणपतीचे आखीवरेखीव मंदिर. या सार्‍यांनी पर्यटकांना गेली कित्येक वर्ष आकृष्ट केले आहे.

किर्ती मोहरील

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती

- Similar topics

 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही