नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


जंगली महाराज

Go down

जंगली महाराज Empty जंगली महाराज

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:35 pm

जंगली महाराज 8806_MahaS

महाराष्ट्राच्या संतमंडळात जंगली महाराज हे नाव प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलिकडच्या काळातील संत होते. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रुढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असं विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटतं आणि यातच त्यांचं खरं संतत्व दडलं आहे.

जंगली महाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजुत आहे. तीही चुकीची आहे, असं म्हणता येणार नाही, कारण महाराजांचं वास्तव्य बराच काळ पुण्यातच होतं आणि त्यांचं बरंचसं कार्यही पुण्यातच झालं आहे. जंगली महाराज हे अलिकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करुन घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करुन जणू एक तपचं केलं. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. (तात्यासाहेब) खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. आपण मिळविलेल्या माहितीत कोणताही अ-ऐतिहासिक भाग राहू नये याची पूर्ण दक्षता बाळगली. त्यांच्या चरित्राचे वाचन विद्वान अभ्यासक महाराजांचे शिष्य आणि भक्तगण यांच्यासमोर करुन, पूर्ण शहानिशा करुन जे चरित्र लिहिलं ते पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनान प्रकाशित कले असून इ. स. २००४ साली त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. या चरित्राच्या आधारेच जंगली महाराजांविषयीचा हा लेख लिहिला आहे.

जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. महंमदशहा कादरी यांनाच जंगली शहा असं म्हणत असत. महाराष्ट्रातील बहुतेक सूफी संत हे कादरी या शाखेचेच होते. या संदर्भात योगसंग्रामाचे कर्ते शेख महंमद, सिद्धांतबोधाचे कर्ते शहामुनी, नागेश संप्रदायाचे आलमखान, मुंतोजी बामणी यांचा उल्लेख करता येईल.

जंगली शहा यांचं जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानसं खेडं आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतकं गुण्यागोविंदानं नांदत आहेत. होनमूर्गीचं कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथं जसं बसवेश्वराचं मंदिर आहे त्याचप्रमाणं मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ती धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला. त्यामुळं त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अतिशय व्यापक झाला. ते शेतात जाऊन कष्टाची कामंही करीत व द्रव्यार्जन करीत. श्रमप्रतिष्ठेवर त्यांचा भर होता. आपल्या वयाच्या तरुणांना ते धार्मिक शिक्षण देत. बालपणीच त्यांनी अनेक धर्मांच्या ग्रंथांचा अभ्यास केला.

हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरु होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धर्मगुरु म्हणून ते मानले जात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे ताहिरशहांचे समकालीन होते. ते दत्तोपासक होते. ताहेरशहा हे मंत्रविद्या-पारंगत असून त्यांनी या विद्या व सिद्धी जंगलीशहांना शिकविल्या होत्या, अशीही माहिती श्री रेगे यांना उपलब्ध झाली आहे. जंगलीशहा स्वामी समर्थांना भेटले व त्यांचही शिष्यत्व स्वीकारल्याचा उल्लेख जंगलीमहाराजांच्या चरित्रात आहे. यानंतर जंगलीशहा सर्वसंग-परित्याग करुन विरक्त झाले. त्यांनी विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे आणि नेर्ले अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं व लोकहिताची अनेक कामं करायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा शिष्य-परिवार वाढत वाढत चालला. त्यांनी जागोजाग धर्मशाळा, मंदिरं, मशिदी, दर्गे, घाट इत्यादी असंख्य बांधकामं केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. उत्तरायुष्यात ते पुण्याला आले व तिथंही त्यांनी लोकहिताची कामं केली. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. त्यांच्या शिष्यपरिवारात रखमाबाई ऊर्फ आईसाहेब गाडगीळ, जमखंडीचे राजे अप्पासाहेब पटवर्धन, सरदार कुपुस्वामी, मुदलियार, हमजाखां, का. रा. मोडक, रंगराव शिरोळे, मुंबई राज्याचे माजी पोलीस उपप्रमुख श्री. दी. आ. शिरोळे यांचा उल्लेख करता येईल.

इ. स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करुन ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती

- Similar topics

 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही