नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


जात्यावरच्या ओव्या

Go down

जात्यावरच्या ओव्या Empty जात्यावरच्या ओव्या

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:45 pm

जात्यावरच्या ओव्या 8576_MahaS

ओवी हा एक काव्यप्रकार असून भागवत संप्रदायी संतांच्या अनेक रचनांमध्ये ओवीबध्द रचना आढळतात. ओव्या या दोन चरणी, चार चरणी अथवा सहा चरणीही असतात. जानपद गीतांच्या अंतर्गत मौखिक वाङ्मय म्हणून येणार्‍या ओव्या म्हणजे लोकसंस्कृती आणि या लोकसंस्कृतीतील लोकमानसाचा आरसाच होय. जात्यावरच्या ओव्या म्हणजे कुटुंबवत्सल स्त्रियांच्या भावभावनांचे विरेचन! संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या अभंग रचना या ओवीबध्द रचना म्हणून प्रसिध्द आहेत. श्रीधरपंतांच्या पोथ्यादेखील ओवीबध्द रचनेसाठी प्रसिध्द आहेत. या पोथ्यांचे अथवा अभंगांचे संस्कार जात्यावरच्या ओव्यांवर झालेले आहे. रामजन्माच्या एका अभंगात एक उल्लेख आहे तो असा-
राम वेळोवेळी आम्ही गावू ओविये
दळिता कांडिता जेवितांना बाई ये।

म्हणजे ओव्यांचा संबंध थेट श्रमांशी आहे. श्रम हलके करण्यासाठी ओव्या हे सूत्र लोकसंस्कृतीत दिसते. अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन घडविणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये जात्यावरच्या ओव्या हा एक सादरीकरण प्रकार म्हणून प्रतिष्ठित झालेला असला तरी मूळ जात्यावरच्या ओव्यांचा संबंध ग्रामसंस्कृतीशी आणि ग्रामसंस्कृतीतील एकत्र कुटुंबपध्दतींशी (ज्याला रूढ भाषेत खटल्याचं घर असं म्हणतात) आहे.

जात्याची दोन पाळी, या दोन पाळयांमध्ये भरडले जाणारे धान्य. भरडता, भरडता त्याचे होणारे पीठ. या पीठाचा उबदार, चवदार वास आणि धान्य दळण्यासाठी वापरला जाणारा जात्याच्या पाळीवरील खुंटा. या साधनांचा प्रत्यक्ष जात्यावरच्या ओव्यांशी संबंध असतो. जात्यावरच्या ओव्यांमधून साकार होणारे भावविश्व स्थल, काल, व्यक्ती आणि कारणपरत्वे बदलत जाते. पहाटे पायली पायलीने दळण दळणार्‍या सासुरवाशिण स्त्रीकडून म्हटल्या जाणार्‍या ओव्या तिच्या व्यक्तिगत सुखदु:खाचा उमाळा असतो. (बहुतेक दु:खांचाच). सीतेचा राम त्याग करतो, तेव्हा सीता एकटी निघते. तिला साथ असते फक्त बोरीबाभळींची. परटाच्या सांगण्यावरून सीतेच्या चाऱित्र्याबदद्ल मनात किंतु घेणारा राम आदर्श पुरूष कसा? खंडेराया तुला कसा घ्यावा वाटून, एक भाकरी त्याचे तुकडे केले दोन असा आलाप करणारी म्हाळसा, अशी विविध मानसचित्रे ही सासुरवाशिण स्त्री जात्यावरच्या ओव्यांमधून उभी करते. आपली वंचना, व्यथा, उपेक्षा या रामायण, महाभारतातील स्त्रियांच्या संदर्भात पाहते. जात्यावरच्या या कथा केवळ आत्मकथा नव्हे तर आत्मरूदन वाटतात. स्थल, काल, व्यक्ती आणि कारणपरत्वे ओव्या बदलत जातात. आजच्या काळातील लालबाग, परळसारख्या कामगार वस्तीतील एका स्त्रीच्या मुखातून निघालेली ही जात्यावरची ओवी पाहा-

झाड येलाचं, झाड बेलाचं, झाड सुरूचं, झाड पेरूचं
करकरा लवं बाई मोगरा जाई
कृष्णाला झोका देई राधिका बाई
सांगते काही खूण, सांगते काही खूण
भाईखेळ पहिली गल्ली,
झाड येलाचं, झाड बेलाचं, झाड सुरूचं, झाड पेरूचं


आता या ओवीत कृष्ण आणि राधेचा उल्लेख करणारी स्त्री पतीच्या विरहाने झुरताना व त्याला पत्राद्वारे सांगावा धाडताना दिसते आहे. म्हणूनच ती पतीचा पत्ता सांगत्ये आहे. 'भाईखेळा पहिली गल्ली`. पूर्वीच्या काळी खेडेगावातील स्त्री नवर्‍याला पत्र लिहायचे असेल तर ती एखाद्या शाळेतल्या पोराला सांगायची आणि त्याच्याकडून नवर्‍याचा पत्ताही लिहून घ्यायची. तो संदर्भ येथे आहे. पत्र लिहिणार्‍या स्त्रिया या बहुतांश सासुरवाशिणी असत. या सासुरवाशिणी स्त्रियांची विरहोत्कटता जात्यावरच्या ओव्यांमध्ये पदोपदी जाणवते. पहाटेच्या प्रसंगी जात्यावर दळण दळणार्‍या स्त्रियांच्या ओठी राम, कृष्ण, विठठ्ल, खंडोबा आदी देवदेवतांची नावे देखील असायची. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खांची न संपणारी वीण याचे दर्शन पहाटेच्या जात्यांवरच्या ओव्यांमधून होते. या ओव्या दळण दळणार्‍या स्त्रीलाच नव्हे तर तुम्हाला आम्हालाही चिंतनाला उद्युक्त करतात. अंतर्मुख करतात. दळणाचे वेगवेगळे प्रकार असतात. भरड दळण, अर्ध भरड दळण, पूर्ण पिठाचं बारीक दळण या दळणाच्या विविध पध्दतींमध्ये स्त्रीची शक्तीही विविध प्रकारे खर्ची पडते. त्याचा परिणाम ओव्यांवरही होतो. जषी स्त्रीची मनस्थिती, जशी चित्तवृत्ती तशा ओव्या.

लग्नात हळद दळताना चित्तवृत्ती उल्हासित असतात व हळदही भरड दळली जाते. अनेक स्त्रिया हळद दळताना सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे दळणाला वेग येतो. जात्याचे पाळे जलद फिरते. बारीक पिठाचे दळण दळताना दीड पाळे जाते फिरत असे तर भरड दळण दळताना एक पाळे जाते फिरते. त्याचा परिणाम ओवीवरही होतो. त्यामुळे ओवी दीड चरण अथवा एका चरणाची होते.लग्नाची हळद दळताना स्त्रिया कधीकधी दोन चरणाची ओवी एका चरणात मोठया दमात शीघ्र गतीने पुरी करतात. लग्नात हळद दळताची ओवी अशी-

गावाखालती गव्हाळी, गावाखालती गव्हाळी
नांगरली, वखरली सये ग, नांगरली, वखरली
न्हाउन धुवून केली मऊ
त्याच्या पोळया केल्या नऊ सये ग,
याच्या पोळया केल्या नऊ.


यासंदर्भात द. ग. गोडसे यांनी 'लोकधाटी` या ग्रंथात केलेले विवेचन असे- ' जात्याच्या घर्षणयुक्त भ्रमणामुळे त्याच्या अखंड भ्रमणक्रियेत काही सूक्ष्म, काही स्पष्ट नाद निर्माण होतात. सूक्ष्म तपासणी केली तर हे नाद वेगवेगळया कंपनांचे असतात असे आढळून येईल. जात्याच्या सातत्यपूर्ण भ्रमणामुळे हे नाद प्रवाहित होऊन त्यांना स्वरत्व प्राप्त होते. या सूक्ष्म, स्पष्ट स्वरांच्या प्रवहनाला सूक्ष्म वाक्वळणे असल्याचेही आढळते. (सर्व प्रवाही माध्यमांना ही वाक्वळणे त्यांच्या प्रवहनप्रक्रियेत मिळत असतात.) जात्याच्या दळण प्रक्रियेत जात्याच्या वरच्या फिरत्या पाळयाला सूक्ष्म झोल, झोके मिळत असतात. जात्याच्या या भ्रमणाची गती आणि भ्रमणात त्याला मिळणारे झोल-झोके यांमुळे जात्याच्या गतीला विशिष्ट लय प्राप्त होते. लय नि विशिष्ट स्वरांच्या या गुंजनामुळे स्वरांचा एक स्थायी स्वरकोश निर्माण होतो. हा स्थायी स्वरकोश दळणाची प्रक्रिया चालू असतांना सातत्याने गुंजत असतो... आणि या गुंजनाला जात्याच्या आवर्ताचीच लय असते. गुंजनाच्या या लयबध्द स्वरआवर्तातच जात्यावरच्या गेय ओवीच्या स्वररूपाची प्रेरणा असते.
या स्वररूपाला जात्याच्या भ्रमण-प्रक्रियेचे वळण मिळणे स्वाभाविक असते. त्यामुळे ग्रामीण ओवीच्या स्वररूपालाही वाक्वळणे मिळून स्वरांच्या प्रवहनाच्या गतीनुसार लय प्राप्त होते.

सारांश जात्याच्या भ्रमण-प्रक्रियेमुळे एक लयबध्द स्थायी स्वरकोश स्वयं निर्माण होतो आणि गेय आविष्काराला आवश्यक असलेली, स्वर आणि लय ही किमान साधने, जात्यावर दळण करणार्‍या कोणाही ग्रामीण स्त्रिला सहज उपलब्ध होतात. या उपलब्धीमुळे किमान बरा गळा असलेला कोणाही दळण करणार्‍या स्त्रीला गायनाची ऊर्मी येणे साहजीक असते. या ऊर्मीमुळे प्राप्त स्वरकोशाच्या लयबंध गुंजनात तिला ओवीचे स्वररूप भावते... आणि या अमूर्त 'भावनाला` मूर्त करण्याकरिता सुचलेल्या उत्स्फूर्त स्वरनिविष्ट शब्दांची योजना करून ती गाते. तिला भावलेल्या ओवीच्या स्वररूपाला अक्षररूप असे मिळते.`

म्हणजे जात्यावरच्या ओव्या मराठी स्त्री मनाचा आरसा आहेत हेच खरे.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही