नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


शिव मानसपूजा

Go down

शिव मानसपूजा Empty शिव मानसपूजा

लिखाण  Admin Sat May 19, 2012 10:53 pm

शिव मानसपूजा 7635_MahaS

श्री शिवशंकर म्हणजे महादेव ! परमेश्वर ! दक्षिणेकडे शंकराला 'ईश्वर' म्हणतात. स्मशानात राहणारा, चिताभस्म लावणारा, हत्तीचे कातडे पांघरणारा सदाशिव म्हणजे कल्याण करणारा देव आहे. तो रुद्र आहे, उग्र आहे पण 'मुनिजन सुखकारी' ही आहे. तो भेळा आहे, लवकर प्रसन्न होणारा आहे आणि प्रसन्न झाल्यावर भक्ताची कोणतीही इच्छा तातडीने पुरी करतो. पार्वतीसारखी लोकोत्तर त्रिभुवनसुंदरी त्याच्या प्राप्तीसाठी जीव टाकते, कठोर तपश्चर्या करते. एवढा त्याचा गुणसंभार आहे, त्याचे विविधरंगी व्यक्तिमत्त्व मोठे आकर्षक वाटते.

शंकराची स्तोत्रे अनेकांनी विविध भाषांत रचली आहेत. आद्य शंकराचार्यांनी संस्कृत भाषेत लिहिलेली शिवमानसपूजा इतकी सुगम, प्रासादिक, प्रसन्न आणि नादमधुर आहे की, आसेतुहिमाचल हिंदुस्थानभर सर्व प्रांतात ती लोकप्रिय आहे, तिचा प्रसार सर्वत्र आहे.

तशा काव्यबद्ध मानसपूजा सर्वच देवतांच्या उपलब्ध आहेत. मानसपूजा म्हणजे प्रत्यक्ष उपचाराशिवाय केवळ मनाने केलेली पूजा. ही साधणे अवघड आहे. पण ह्या पूजेचा एखादा श्लोक मनात घोळवीत पूजा केली की, पूजेचा क्रम बरोबर जमतो. अधलेमधले काही चुकत नाही. म्हणून ह्या मानसपूजा काव्यबद्ध करून ठेवलेल्या असाव्यात.

मानसपूजा म्हणजे देवाला सगळे उपचार कल्पना करून अर्पण करावयाचे. प्रत्यक्षात आपण त्याचे ध्यान करावयाचे आणि ध्यानमूर्ती कल्पनेने डोळ्यासमोर आणून तिला कल्पनेनेच न्हाऊ घालावयाचे, गंध लावावयाचे, पूजा करावयाची, वस्त्रे अर्पावयाची.

शंकराचार्यांनी शिवमानसपूजेचे पाच श्लोक लिहिले आहेत. पहिले चार शार्दूलविक्रीडित वृत्तात असून शेवटचा श्लोक मालिनी वृत्तात आहे. रत्नै: कल्पितमासनं हिमजलै: स्नानं च दिव्याम्बरं हे शिवशंकरा, रत्नखचित आसन कल्पून त्याच्यावर तुझी स्थापना केली आहे. तुला शीतल जलाने स्नान घालून उत्तमोत्तम वस्त्रे समर्पिली आहेत. नानारत्नविभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनम् जातीचंपकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् हे पशुपते, जाई, चाफा, बेलाची पाने आणि विविध प्रकारची फुले अर्पण करून तुला धूप दाखवितो आहे. दिवा ओवाळतो आहे. सौवर्णे नवरत्नखंडरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् नवरत्नांनी मढवलेल्या सोन्याच्या पात्रात तुला पंचखाद्य, खीर, तूप, दूध, दही, केळी इत्यादी विविध पदार्थ अर्पण केले आहेत. त्यांचा तू स्वीकार कर.

शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखंडोज्ज्वलं- ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु विविध प्रकारच्या भाज्या, सुवासिक केलेले पाणी, कर्पूरयुक्त विडा तुला अर्पण करीत आहे. छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदंकाहलकलागीतं च नृत्यं तथा मी तुझ्यासाठी छत्र आणले आहे, दोन चामरे आणली आहेत, पंखे आणले आहेत आणि निर्मळ, स्वच्छ आरसेही आणले आहेत. वीणा, मृदंग, भेरी इत्यादी विविध वाद्यांच्या साथीवर नाचगाणीसुद्धा तुझ्यासमोर चालली आहेत. साष्टांगं प्रणति: स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. वेगवेगळ्या प्रकारे तुझी स्तुती करतो. मनातल्या मनात संकल्प करून अर्पण केलेल्या ह्या सर्वोपचारांचा तू स्वीकार कर.

हे शिवशंकरा, माझा आत्मा म्हणजे तूच आहेस. पार्वती ही माझी बुद्धी आहे, माझे प्राण हे शिवगण आहेत. माझे शरीर हे तुझे घर आहे. मी जे विविध विषय उपभोगतो ती तर तुझी पूजाच आहे आणि झोप ? झोप रे देवा कुठली ? माझी झोप म्हणजे समाधी असते. आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृह पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिती: संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् मी पायाने कुठेही चाललो तरी तुला ती प्रदक्षिणा असते. मी जे जे बोलतो ती तुझीच स्तुती असते, स्तोत्र असते. सांबसदाशिवा, मी जे जे काही करतो ती केवळ तुझी आणि तुझीच आराधना असते. करचरणकृतं वाक्वायजं कर्मजं वा-श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विदितमविदितं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो माझ्या हातांनी काही नको ते केले असेल, माझी पावले भलत्या मार्गाकडे वळली असतील, तोंडून अधिक -उणा शब्द उच्चाला गेला असेल, शरीराने, कर्माने वा मनाने काही चूक, अपराध जाणता-अजाणता घडला असेल तर तू करुणेचा सागर आहेतस. हे शंभूमहादेवा, त्या सार्‍यासाठी तू मला क्षमा कर.

आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली ही मानसपूजा भक्तिभावपूर्ण तर आहेच पण साधी, सुगम असूनही आलंकारिक रचना, समर्पक अर्थगर्भ शब्द आणि अवघ्या पाच श्लोकांत मानसपूजेचे सार सांगणारी ही काव्यरचना गेली शेकडो वर्षे म्हणूनच सर्वत्र लोकप्रिय आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही