नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


गावरान मटण

Go down

गावरान मटण Empty गावरान मटण

लिखाण  Admin Thu May 24, 2012 6:20 pm

गावरान मटण 4725_GavranMutton
जसजसा श्रावण महिना जवळ येऊ लागतो तसतसं चवीने खाणार्‍यांची मासांहारी खाण्याकडे अधिक ओढ लागते. बुधवारी, शुक्रवार आणि रविवार हे दिवस हक्काचे मांसाहारी म्हणून कोणताही बहाणा न शोधता ही मंडळी मटणावर येथेच्छ ताव मारताना दिसतात. महाराष्ट्रात दर पंधरा कोसावर जशी भाषा बदलते तशी मटण बनविण्याची पद्धतही बदलत असते. रसरसीत तवंग असणारा मटणाचा रस्सा समोर आल्यावर अस्सल खाण्यार्‍यांना धीर धरवत नाही. म्हणूनच आज गावरान मटण कसे तयार केले जाते, हे आपण पाहणार आहोत.

अगोदर अर्धा किलो मटण, चार कांदे, वीस पंचवीस लसून पाकळ्या, एक इंच आले, चार-पाच हिरव्या मिरच्या, चार टी स्पून धने, चार टी स्पून खसखस, दहा लवंगा, दोन छोटे दालचिनीचे तुकडे, आठ काळी मिरी, अर्धा टी स्पून शहाजिरे, तीन चार तमालपत्र, अर्धा वाटी सुके खोबरे, हळद, तिखट, मीठ, तेल, कोथींबीर हे साहित्य तयार ठेवा.

आता मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, तिखट, आले लसणाची वाटलेली अर्धी गोळी, दोन-चार टी स्पून तेल लावनू एक तास ठेवावे. सुके खोबरे किसून घ्यावे. खोबरे, हिरव्या मिरच्या आणि सगळा गरम मसाला बारीक वाटून घ्यावा. पातेलत तेल गरम करुन चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. त्यावर आले लसणाची उरलेली गोळी परताव्या. त्याच्यावर खोबरे, मिरच्या आणि गरम मसाल्याची गोळी परतून घ्यावी. त्यावर मटण आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगले परतावे आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवावे. वरुन कोथिंबीर घालावी.

हा गावरान रस्सा भाकरी, पराठ्याबरोबर फारच छान लागतो.

महाराष्ट्रात प्रत्येक शहरात आणि खेड्यात अस्सल मटण मिळण्याची काही ठिकाणे आहेत. तेथे जाऊनच मटण खरेदी करण्याची प्रथा आहे. जसे की, पनवेलमध्ये पनवेल नाक्यावर तर शासकीय वसाहतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला असणार्‍या मटण शॉपमध्ये मटण घेणार्‍याची मोठी रांग असते. जळगाव जिल्ह्यात आसोद्याचे मटण तर नागपूरात मटण सिताबर्डीचे, औरंगाबादमध्ये पडेगाव, सोलापूरात विजापूर वेसमध्ये मटणासाठी मोठी रांग असते. श्रावणातल्या कडकडीत मांसाहार वर्ज्य प्रथेसाठी यापूर्वीचे मटण भरपूर खायला हरकत नाही.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही