नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


सेट टॉप बॉक्स

Go down

 सेट टॉप बॉक्स Empty सेट टॉप बॉक्स

लिखाण  Admin Thu Jun 07, 2012 12:37 pm

डिजिटायजेशननंतर देशात सर्वत्र टीव्ही प्रसारणाचे रूप बदलणार आहे. याची सुरूवात येत्या १ जुलैपासून देशभरातल्या मेट्रो सिटीजमधून होणार आहे. यामुळे ग्राहकांना ' डायरेक्ट टू होम ' किंवा केबल ' सेट-टॉप-बॉक्स ' यापैकी एका पर्यायाचा स्वीकार करावा लागेल. या सगळ्या बदलांचा अंतिम फायदा ग्राहकांनाच आहे. मात्र हे पर्याय निवडताना नेमकं काय लक्षात घ्यायचं याबाबत...

डीटीएच अर्थात डायरेक्ट टू होम आणि केबल सेट-टॉप-बॉक्स यांची तुलना केली तर डिश टीव्ही केव्हाही सरस ठरतो. कारण डीटीएचमध्ये आपल्याला थेट सॅटेलाइटवरून सिग्नल्स मिळतात आणि ते आपल्या सेट-टॉप-बॉक्सच्या माध्यमातून टीव्हीवर पोहोचतात. यामुळे याद्वारे दिसणारं चित्र केव्हाही चांगलं असतं. केबल सेट-टॉप-बॉक्समध्ये मात्र आपण फायबरच्या वायर्सच्यामाध्यमातून सेट-टॉप-बॉक्स जोडतो पण डीटीएचमध्ये सिग्नल्स येण्यासाठी आकाश निरभ्र असायला लागतं. म्हणूनच अनेकदा पावसाळ्यात डीटीएच ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. आर्थिकदृष्ट्याही ते कोणाला परवडणारं नसतं. यामुळे केबल सेट-टॉप-बॉक्सचा पर्याय हा सर्वांना परवडणारा आणि योग्य असा पर्याय आहे. डीटीएचमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या खासगी कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये डिश , एअरटेल , सन , व्हिडीओकॉन अशा कंपन्यांचा समावेश आहे. तर केबलसाठी मुंबईत तरी सध्या हॅथवे केबल , इन केबल , डिजिकेबल , डेन केबल हे चार पर्याय आहेत. ट्रायने दिलेल्या निर्देशांनुसार काम करताना सर्वांची पॅकेजेस तयार करणं क्रमप्राप्त आहे. मात्र सेवांच्याबाबतीत कंपनीच्या नेटवर्कनुसार परिणाम होऊ शकतो. यामुळे कंपनी निवडताना तुम्ही त्याची सेवा कशी मिळेल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.

सेट-टॉप-बॉक्सची निवड करताना
डीटीएच किंवा केबल यापैकी कोणताही पर्याय घेतलात तरी सेट-टॉप-बॉक्सची निवड ही खूप महत्वाची ठरते. त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात ठेवा...

बॉक्स एन्क्रिप्टेड असला पाहिजे. यामुळे आपल्याला आपल्या पॅकेजमध्ये एक चॅनेल अॅड करणं
किंवा काढणं शक्य होऊ शकतं.

बॉक्स एन्क्रिप्टेड आहे हे ओळखण्यासाठी यातलं कार्ड काढल्यावर बॉक्स बंद झाला पाहिजे.
या बॉक्समध्ये किमान ५०० चॅनेल्सची कपॅसिटी असावी. हॅथवे सारखी कंपनी यामध्ये ९९९ चॅनेल्सची सुविधा पुरवते. चॅनलची कपॅसिटी जास्त असल्यामुळे अधिक चॅनल घेणं शक्य होतं.

बॉक्समध्ये इंग्रजी , मराठी सबटायटल्स आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग रिड करण्याची क्षमता असली पाहिजे. कारण सध्या बहुतांश चॅनेल्सकडे अशा सुविधा आहेत. मात्र आपल्या सेट-टॉप-बॉक्समध्ये जर ते रिड करण्याची क्षमता नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही.

टीव्ही बघून झाल्यावर बॉक्स बंद करण्याऐवजी तो स्टॅण्डबाय मोडवर ठेवणं अधिक योग्य असतं. कारण म्हणजे या बॉक्समध्ये सातत्याने सॉफ्टवेअरचं अपग्रेडेशन सुरू असतं. जर तो बंद केला तर अपग्रेडेशन प्रक्रिया थांबते आणि आपण बॉक्स पुन्हा चालू केला की , तो सिग्नल रिड करण्यापासूनची प्रक्रिया सुरू होते. एन्क्रिप्टेड बॉक्समध्ये आपल्याला व्हॅल्यू अॅडेड सेवा अॅड करता आल्या पाहिजेत.

चॅनेल्सचं गणित
ट्रायच्या निर्णयानुसार देशातील १०० फ्री टू एअर चॅनेल्स केवळ १०० रूपये आणि स्थानिक कर इतक्या रूपयांत उपलब्ध होणार आहेत. यापुढील ५०० खासगी चॅनेल्सपैकी विविध पॅकेजेस आपल्याला जास्तीत जास्त १५० रूपये आणि कर इतक्या किंमतीत मिळतील.

व्हॅल्यू अॅडेड सेवा
डिजिटलायजेशनमध्ये सर्वाधिक फायदा म्हणजे ग्राहकाला मिळणाऱ्या व्हिडीओ ऑन डिमाण्ड , गेम्स , रेकॉर्डिंगसारख्या व्हॅल्यू अॅडेड सेवा. या सेवांच्या माध्यमातून विविध कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे भविष्यात यावरून कोणत्या कंपनीचे डीटीएच किंवा केबल सेट-टॉप-बॉक्स घ्यायचे याचा निर्णय होणार आहे.

एचडी बॉक्सेस
एकीकडे सरकार सेट-टॉप-बॉक्सेस देत असतानाच एचडी बॉक्सही बाजारात येऊ लागले आहेत. यामध्ये आपल्याला विविध एचडी चॅनेल्स पाहता येऊ शकणार आहेत. आज देशात १९ एचडी चॅनेल्स आहेत. ही चॅनेल्स एचडी कन्टेंट देण्यासाठी त्याचं वेगळं शुटींग करत असतात.

दोन टीव्हींसाठी
सध्या बहुतांश घरांमध्ये दोन टीव्हींचा ट्रेण्ड चांगलाच रूजू लागला आहे. यामुळे अनेकांना दोन टीव्हींसाठी हा सेट-टॉप-बॉक्स कसे लावायचे हा प्रश्न अनेकांना पडतोय. अनेकदा आपल्याला एकाच सेट-टॉप-बॉक्समधून टूवे कनेक्शन देण्यात येतं. पण तसं कनेक्शन घेणं चुकीचे ठरतं कारण त्यामुळे दोन्ही टीव्हीवर एकच चॅनल पाहावं लागतं. यामुळे दोन वेगवेगळे सेट-टॉप-बॉक्स घेणं कधीही चांगलं.

निर्णय स्वागतार्हच
भारतासारख्या सर्वाधिक ग्राहक असलेल्या देशात शासनाने घेतलेला डिजिटायजेशनचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामध्ये ग्राहकांना चॅनेल्स निवडीचे स्वातंत्र्य राहणार असून त्याला अधिकाधिक व्हॅल्यू अॅडेड सुविधाही उपलब्ध होणार आहेत. यानिर्णयामुळे येत्या तीन वर्षात देशातील १०० कोटी टीव्ही युजर्सच्या घरांमध्ये डिजिटल सिग्नल पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे व्ह्यूवरशिपचे रेटिंग वाढून कॅरेज फीज घटण्यासाठी मदत होणार आहे.
शशी अरोरा , सीईओ , डीटीएच अॅण्ड मीडिया , भारती एअरटेल

पारदर्शकता येईल
डिजिटायजेशनमुळे ग्राहकाला चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. यापूर्वी आपला केबलचालक जे चॅनेल्स दाखवतो ते पाहणे आपल्याला क्रमप्राप्त होते. आता आपण आपल्या आवडीचे चॅनेल्स स्वीकारू शकतो. यासाठी त्यांना जवळपास ५०० चॅनेल्सचे पर्याय असणार आहे. यातील प्रत्येक गोष्टीचे बिल देण्यात येणार असून या व्यवहारात मोठ्याप्रमाणावर पारदर्शकता निर्माण होणार आहे आणि परिणामी सरकारचे उत्पन्न वाढणार आहे.
के. जयरामन , एमडी अॅण्ड सीईओ , हॅथवे केबल अॅण्ड डेटाकॉम लि.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही