नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


स्कॉलरशिप्सचे बेस्ट पर्याय

Go down

स्कॉलरशिप्सचे बेस्ट पर्याय Empty स्कॉलरशिप्सचे बेस्ट पर्याय

लिखाण  Admin Thu Jun 07, 2012 1:00 pm


प्रा. मीनल मापुस्कर
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं तसंच , संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे अनेक स्कॉलरशिप्स दिल्या जातात. ट्युशन फी माफ , अनुदान देणं तसंच , काही योजना राबवणं असे हेतूही या स्कॉलरशिप मागे असतात. विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील अशा काही स्कॉलरशिप्सची माहिती इथे घेऊ.
भारतातील उच्च शिक्षण हे अन्य देशांच्या मानाने स्वस्त आहे. परंतु , तरीही आजही खिशाला परवडत नाही म्हणून हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. म्हणूनच केंद्र-राज्य शासन , अन्य सरकारी उपक्रम तसंच स्वंयसेवी संस्थांचे विश्वस्त निधी , कॉर्पोरेट्सचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम , टयुशन फी माफ योजना याद्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते. अशा स्कॉलरशिप्स व फी माफ योजनांची नीट माहिती असेल तर योग्य व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करणं सहज शक्य होईल. पर्यायाने मूलभूत संशोधनाकडेही गुणवंतांचा ओढा वाढेल. अशाच काही योजना व स्कॉलरशिप्सची माहिती घेऊया.
इंजिनीअरिंगसाठी ' टयुशन फी माफ योजना '
हुशार पण गरजू विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचं शिक्षण घेता यावं यासाठी एआयसीटीईने टयुशन फी वेव्हर (माफ) स्कीम आणली. याअंतर्गत वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी याअंतर्गत टयुशन फी माफ केली जाते.
सरकारी इंजिनीअरिंगच्या कॉलेजमध्ये वर्षाला १५ हजार फी असते तर , खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजात हीच फी ४५ हजार ते १ लाख रुपये इतकी असते. या योजनेअंतर्गत इंजिनीअरिंग पदवी , पदविका अभ्यासक्रम तसंच , पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमांना सूट दिली जाते. यासाठी सर्व जातीचे विद्यार्थी पात्र असतात. ही योजना सर्व प्रकारच्या (सरकारी , विनाअनुदानित , अल्पसंख्याक वगैरे.) कॉलेजांसाठी बंधनकारक आहे. कॉलेजातल्या अभ्यासक्रमांच्या एकूण जागांच्या ५ टक्के जागा या स्कीमसाठी उपलब्ध असतात. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रात या स्कीम अंतर्गत साधारणत: ५७०० जागा उपलब्ध असतात. या जागा वाढीव स्वरूपाच्या आहेत.

टयुशन फी वेव्हर स्कीमची वैशिष्टयं -

ही योजना इंजिनीयरिंगच्या सर्व प्रकारच्या कॉलेजांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी कॅप राउंडमधूनच अॅडमिशन दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी , कॉलेज व कोर्सचा वेगळा कोड ( TFWS choice code) दिलेला असतो. आपला चॉईस भरताना तो नमूद करणं आवश्यक आहे. या स्कीममधील जागा राज्यस्तरावर भरल्या जातात.
फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सबडिव्हीजनल ऑफिसर , उपजिल्हाधिकारी/जिल्हाधिकारी यांच्याकडून घेता येईल.

इन्स्पायर :
मूलभूत व नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये जाऊन संशोधन करण्याकडे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्पायर ही योजना तयार केलीय. ती तीन टप्प्यांत विभागली आहे.
सीट्स :
या योजने अंतर्गत १० ते १५ वर्षांमधल्या दहा लाख विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचं इन्स्पायर अवार्ड दिलं जातं. नाविन्यपूर्ण शोधाचा आनंद घेण्याचं बाळकडू सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यामार्फत दिलं जातं. यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या शाळेमार्फत अर्ज पाठवायचा असतो.

२) शी : ( SHE - Scheme for Higher Education)
देशभरातील १० हजार विद्यार्थ्यांना नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी ८० हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. यासाठी बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षेतील पहिले एक टक्का विद्यार्थी निवडले जातात. या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी लाच प्रवेश घेणं आवश्यक आहे.
आयआयटीजेईई , एआयईईई व एआयपीएमटी या सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये पहिल्या दहा हजारात नंबर असलेले परंतु नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सीलाच प्रवेश घेतलेले विद्यार्थीही पात्र असतात.
इंडियन इन्स्टिटयुट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च , नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ सायन्स एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च , डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी सेंटर फॉर बेसिक सायन्सेस या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसंच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना , नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा , जगदीश बोस सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलर्स , सायन्स ऑल्मपियाड मेडलिस्ट यामध्ये निवड झालेले व नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेत बी.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी. लाच प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात.
पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच संशोधन करण्याची संधी या योजनेद्वारे मिळते. शास्त्रीय मूल्यं तसंच शास्त्रीय दृष्टीकोन विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवण्यासाठी याचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्टसाठी दरवर्षी नोंदणी करावी लागते. भारतातील वा परदेशातील विद्यापीठे , संस्था तसंच संशोधन संस्था व केंद्रे यांच्यामध्ये उन्हाळी सुट्टीमध्ये संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट वर्क करण्याची संधी प्राप्त होते.

ऑर्स : Assured Opportunity for Research Careers
डॉक्टरेट अभ्यासासाठी रिसर्च फेलोशिप दिल्या जातात. नैसर्गिक व मूलभूत विज्ञानशाखेबरोबरीनेच मेडिकल , अॅग्रीकल्चर या क्षेत्रातील संशोधनासाठीही फेलोशिप दिली जाते.
अधिक माहितीसाठी - http://www.inspire-dst.gov.in

इंडियन ऑईल अॅकॅडेमिक स्कॉलरशिप्स
भारतातील सर्वात मोठा उद्योग व फॉर्च्युन ५०० मधील पहिल्या क्रमांकाच्या भारतीय कंपनीद्वार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलीटी कार्यक्रमांतर्गत विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी स्कॉलरशिप्स देण्यात येतात. दरवर्षी २६०० स्कॉलरशिप्स खालीलप्रमाणे विविध अभ्यासक्रमांना देण्यात येतात.
या स्कॉलरशिपसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांने ६५ टक्के , अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/महिला वर्गातील विद्यार्थ्यांने ६० टक्के , अपंग विद्यार्थ्यांने ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. या स्कॉलरशिप साठी www.iocl.com या वेबसाइटवरील स्कॉलरशिपाच्या पर्यायमधून माहिती घ्यावी.

अभ्यासक्रम स्कॉलरशिप पात्रता स्कॉलरशिप रक्कम कालावधी
संख्या परीक्षा प्रति महिना (रु.) (वर्षे)
१०+/आय.टी.आय. २००० १०वी रु. १००० २
इंजिनीयरिंग ३०० १२वी रु. ३००० ४
एम.बी.बी.एस. २०० १२वी रु. ३००० ४
एम.बी.ए. १०० पदवी रु. ३००० २
विद्यापीठ अनुदान आयोग
पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप स्कीम
पदवी शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांना (रँक होल्डर) पदव्युत्तर शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ही स्कॉलरशिप योजना सुरु आहे. यासाठी लाइफ सायन्सेस , फिजिकल सायन्सेस , केमिकल सायन्स , अर्थ सायन्सेस , मॅथेमॅटिकल सायन्सेस , सोशल सायन्सेस , कॉमर्स , भाषा या विषयातील पदवी शिक्षण घेतलेले विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतात. स्कॉलरशिपचा कालावधी २ वर्षे असून एकूण ३००० विद्यार्थ्यांना यासाठी निवडले जाते. स्कॉलरशिप अंतर्गत रू.२०००/- प्रति महिना ( २० महिन्यांसाठी) दिले जातात. www.ugc.ac.in या वेबसाईटवरुन सविस्तर माहिती घेता येईल.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही