नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


कोल्हापूरचे वैभव ....न्यू पॅलेस

Go down

कोल्हापूरचे वैभव ....न्यू पॅलेस Empty कोल्हापूरचे वैभव ....न्यू पॅलेस

लिखाण  Admin Tue Jun 19, 2012 12:02 pm

कोल्हापूरचे वैभव ....न्यू पॅलेस 16789_FP_L

पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिध्द आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांमुळे कोल्हापूरने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरला पन्हाळा गड, रंकाळा तलाव, राधानगरी धरण,खासबाग मैदान, शालिनी पॅलेस या ठिकाणांनी वैभवसंपन्न बनविले आहे. या सर्व ऐतिहासिक ठिकाणांसोबत कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने!

कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारणीस १८७७ साली सुरवात झाली व न्यू पॅलेस इ.स. १८८४ मध्ये बांधून पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे.

३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचिन काळातील महाराजांच्या कालखंडात वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. म्युझिअमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत: दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र, यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो. या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन, फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.

हत्तीच्या दालनामध्ये आपणस प्रथम दर्शनी दिसतो तो विविध आभूषणाने सजलेला बैठक स्वरूपातील हत्ती. हत्तीला सजविण्यासाठी असणाऱ्या विविध आभूषणामध्ये हत्तीवरील भरजरी झूल (घाशा), जरी पटका तसेच चांदीची लहान तोफ, प्राचीन काळातील दुमिर्ळ नाणी आपणास या दालनामध्ये पहावयास मिळतात.

त्यानंतर येते ते फर्निचर दालन, या दालनात आपणास शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वापरत असलेले विविध साहित्य पाहता येते.विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत आकर्षक पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजाचे फोटो या दालनात आपणास पाहावयास मिळतात.यानंतर आपण प्रवेश करतो राजश्री शाहू हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराजांची संक्षिप्त ओळख करून देणारे हे दालन खऱ्या अर्थाने आपणास छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनपट छायाचित्राच्या स्वरूपात याठिकाणी पहावयास मिळतात. महाराजांच्या बालपणीची छायाचित्रे, छत्रपती शाहू महाराज यांचे अधिकार ग्रहण केलेल्या प्रसंगाचे छायाचित्र, ऑफिसमधील तसेच दिल्ली दरबारात वापरत असलेली खुर्ची , पुर्वीच्या काळातील पितळी खलबत्ता, गिडी जग, तोटी असलेला पितळी तांब्या ठेवण्यात आलेला आहे. शाहू महाराज (पहिले) यांच्या वापरातील कपडे, महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपती शिवाजी (४ थे) यांना दिलेला करवीर 'राजचिन्हाचा ध्वज' ठेवण्यात आलेला आहे.शाहू कुस्ती मैदान येथे भरवण्यात आलेले कुस्ती मैदान पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचे छायाचित्र तसेच शिकारीचे विविध प्रकार पहावयास मिळतात.

जसजसे आपण पुढे पाहत जातो तसे इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा मिळतो. याच दालनामध्ये इतिहास प्रसिध्द घराण्याच्या वंशावळींची ओळख करुन देणारा माहिती फलक पहावयास मिळतो. त्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष, पवार छत्रपती घराण्याची वंशावळ, भोसले घराणे शाखेची वंशावळ, कागलकर घाटगे सर्जेराव घराण्यांची वंशावळ अधोरेखीत करण्यात आली आहे.

या दालनातील आणखी एक वैशिष्टये म्हणजे शिकारलेल्या निरनिराळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण व विविध उपयोगी वस्तू पाहताना आपण भारावून जातो. सांबराचे शिंग व गेंड्याच्या पायापासून तयार केलेले टी पॉय,गव्याच्या पायापासून तयार करण्यात आलेले पेटी स्टँड, वाघाच्या शेपटीतील मणक्यापासून बनविलेली छडी, वाघाच्या व गव्याच्या पायापासून बनविलेला ऍ़श ट्रे, डुकराच्या दातापासून तयार केलेली फुलदाणी, शहामृगाच्या पायापासून बनविलेले मेणबत्तीचे स्टँड, वाघाच्या कवटीपासून तयार केलेली सिगारेट केस व ऍ़श ट्रे हे सर्व पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही.

शस्त्रास्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे या ठिकाणी पहावयास मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी तयार करुन घेतलेली विविध प्रकारची हत्त्यारे, इ. स. १८७० मध्ये श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (पहिले) इंग्लंडला गेले असता त्यांनी खास ऑर्डर देऊन मागितलेली सोन्याचा मुलामा चढवलेली बंदुक, विविध नमुन्यातील बंदुका तसेच दहा फुटी आकर्षक पुनी गन या ठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेते. जुन्या काळातील ढंका, नौबत, नगारे, चौघडे तसेच डुकराची शिकार करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची ओळख या शस्त्रास्त्र दालनात होते.

यानंतर आपण प्रवेश करतो ते न्यू पॅलेसचा मुख्य भाग असलेला दरबार हॉल. अतिशय प्रशस्त व कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पहावयास मिळतो. दरबार हॉलचे हे भव्य विलोभणीय दृश्य पाहताना पूर्वीच्या काळातील राजे महाराजांचे वैभव आवाक् करुन टाकते. दरबार हॉलमध्ये महाराजांसाठी असलेले कलाकुसरीने भरगच्च सजलेले 'राजसिंहासन' सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच या हॉलमध्ये पुूर्वी जसा दरबार भरायचा तशीच मांडणी अजून ठेवलेली आहे. हॉलमधील छताकडे नजर टाकली असता त्याकाळी कलाकारांनी केलेले नक्षीदार कोरीव काम पाहीले की डोळयाचे पारणे फिटते. हॉलच्या दोन्ही बाजूस खिडकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने बेल्जीअम ग्लासवर अतिशय दुर्मिळ आकर्षक रंगचित्राव्दारे चित्तारलेली आहेत.

आपण पुढे जातो ते भारतासह विविध देशातील हिंस्त्र प्राणी, पशू आणि पक्षी यांची शिकार केलेले प्राणी आपणास पाहावयास मिळतात.महाराजा शहाजी छत्रपती (दुसरे) यांनी मारलेला आफ्रिकन गेंडा पाहावयास मिळतो, हिमालयातील खोकड, बर्फाळ प्रदेशातील अस्वल, हिमालयातील काळे अस्वल लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. वेगाने धावणारे चित्त्तळ ( रायबाग), पाहताना त्याच्या नजरेतील धार लक्षात येते हॉलच्या मध्यभागी सर्वाचे लक्ष वेधून घेतो तो वाघांचा कळप, सांबर, चौसिंगा, दुर्मिळ असे कस्तुरी मांजर व खवल्या मांजर, तसेच बुलबुल, बदक,लाव्हऱ्या, कोकीळ, मलबारी खार, हरिचल, ब्लड फेजंन्ट असे विविध प्रकारचे पशू , पक्षी व प्राणी पाहून त्याकाळी महाराजांनी केलेल्या शिकारी डोळयासमोर येऊन उभे राहतात.

आपण म्युझिअमच्या बाहेर येतो बाहेरील सर्व भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. म्युझिअमच्या समोर हिरवेगार लॉन आहे. विविध प्रकारच्या वृक्षांमुळे सर्व परिसर निर्सगरम्य वाटतो. बाहेरील आवारामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच इतर महाराजाचे पुतळे पहावयास मिळतात. पुढील बाजूस प्राणी संग्रहालय व विस्तृत असे जलाशय आहे.या जलाशयामध्ये विविध प्रकारचे प्राणी तसेच दुर्मिळ पक्षी आपणास पहावयास मिळतात. या प्राणी संग्रहालयातील खास वैशिष्टय म्हणजे मध्य भारत येथून प्रत्येक वर्षी साधारणत: जानेवारी महिन्यामध्ये या जलाशयामध्ये स्थलांतरीत होणारा पक्षी म्हणजे चित्रबलाक. हा दुर्मिळ पक्षी इतर कोणत्याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही. तसेच जलाशयाच्या मध्यभागी असणाऱ्या झाडावर काळया रंगाचे दुमिर्ळ असा कांडेसर पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला आपणास पहावयास मिळतो. जलाशयाच्या कडेला आपण अगदी बारकाईने पाहिले असता आपणास हॉर्न बील डक्स व कासव ही आपल्या मनाला भुरळ घालतात.

सतिश जयपाल शेंडगे, कोल्हापूर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही