नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


यक्षगान आणि दशावतार

Go down

यक्षगान आणि दशावतार Empty यक्षगान आणि दशावतार

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:33 pm

यक्षगान आणि दशावतार 8957_MahaS

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सांस्कृतिक अनुबंध शोधताना दोन मुख्य देवतांच्या अनुषंगाने हे अनुबंध शोधता येतात. या दोन देवता म्हणजे कानडा विठ्ठल आणि कानडा मल्हारी. कानडा विठ्ठल हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आराध्य दैवत. विठ्ठल लोकदेव तर मल्हारी म्हणजेच खंडोबा हा कुलदेव. विठ्ठल भक्तिसंप्रदायी देवता तर खंडोबा लोकदैवत संप्रदायी देवता. गुरू दगडूबाबा साळी यांनी एका पदात विठ्ठल आणि खंडोबाचे माहात्म्य विषद केले आहे ते असे-
भू वैकुंठ पंढरी तषीच जेजुरी असे सांगती। संत वर्णती।।
तेथे टाळमृदुंग वीणा येथे उधळण भंडार किती। वाघ्ये डुलती।।
तेथे बुक्याचे भूशण येथे घणघणत घाटी गर्जती। वाघ्ये डुलती।।
तेथे पुंडलिक सगुण येथे प्रधान हेगडे पंता। रेहुडा प्रती।।
भीमा आणि चंद्रभागा इथं कर्‍हा भक्त जन येता। स्नान करिती।।
तेथे पंढरीचा विठोबा येथे खंडोबा भक्त जन येती। भावे पूजिती।।
धाव पाव देवा मल्हारी गड जेतूसी भुक्यानो किती। दर्षनाप्रती।।
गुरू दगडुबा साळी गुणा तुझ्या चरणी ठेवून मती। तुझे गुण गाती।।

कानडा विठ्ठल आणि कानड्या मल्हारीच्या या सांस्कृतिक अनुबंधाप्रमाणेच एका भक्तीनाट्याचा अथवा अलिकडच्या भाशेतील लोककलाप्रकारांचा अनुबंध आपणास विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे यक्षगान आणि दशावतार. यक्षगान हे नृत्यनाट्य आहे, तर दशावतार हे भक्तीनाट्य आहे. यक्षगान, भागवत मेळे, दशावतार आणि लळित हे सर्व कलाप्रकार एकाच जातकुळीतले आहेत. कारण भक्ती हा त्यांचा स्थायीभाव आहे. यक्षगान आणि दशावतारात जी साम्यस्थळे आहेत ती अशी-
१) या दोन्ही प्रकारांत गणेश वंदना असते. गणपतीचे रंगमंचावर आगमन, त्याची पूजा असते.
२) यक्षगानात हनुमान नायक व त्याचे साथीदार कोडंगी हे हास्यरस निर्माण करतात तर दशावतारात संकासूर किंवा विदूषक हास्यरस निर्माण करतात.
३) या दोन्ही प्रकारात गीत व नृत्य परस्परांत मिसळलेले असतात. ते एकमेकांपासून अलग करणे शक्य नसते. दशावतारातील सोंगे नृत्य करीतच रंगमंचावर प्रवेश करतात. राक्षस व देव पात्रांच्या युद्धाप्रसंगी जे नृत्य होते ते त्वेशपूर्ण तसेच आवेशपूर्ण असते. त्यावेळी पात्रांद्वारे घडणार्‍या वेगवान हालचाली व पदन्यास हे पाहण्यासारखे असते. युद्धप्रसंगांची तीव्रता नुसत्या नृत्याद्वारे अभिव्यक्त करण्यात दशावतारातील पात्रे यशस्वी होतात.

यक्षगानात अभिनय हा नृत्यातून अभिव्यक्त होत असल्याने नृत्याला अधिक महत्त्व असते. पुरूशांचे नृत्याभिनय आणि स्त्रियांचे नृत्याभिनय वेगवेगळे असतात. विविध प्रकारच्या मुद्रा, करन्यास आणि पदन्यास यांचे दर्षन यावेळी होत असते. प्रत्येक पात्र आपआपल्या ठरलेल्या पद्धतीनुसार नृत्य करीत रंगमंचावर प्रवेष करीत असते.
४) यक्षगान आणि दशावतारात रंगमंचावर कथा सादर होते ती सोंगांच्या रूपात. सोंगाच्या रूपात ही सर्व पात्रे येतात. दशावतारात सूत्रधार, विदूषक, संकासूर, ब्रम्हदेव, मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, सरस्वती, श्रीकृष्ण, गोपी, गोपाळ अशी सोंगे येतात. तर यक्षगानात हनुमान नायक, कोडंगी, कोक्के, चिक्क, गुलामुल्ली, बैरागी, कृश्ण, बळीराम आणि गोपी ही सोंगे येतात.
५) सूत्रधार हा दोन्हीकडे अत्यंत महत्त्वाचा असतो. दशावतारातील सूत्रधार हा बहुश्रुत, विद्वान आणि हजरजबाबी असतो. नाट्याचे नियोजन, पदाचे गायन, मधून मधून संपादणी करणे, प्रेक्षकांशी संवाद साधणे अषी कितीतरी कामे तो करत असतो.
यक्षगानातील सूत्रधाराची भूमिका मध्यवर्ती असते. तो संगीत, नृत्य व नाट्यशास्त्राचा चांगला जाणकार असतो. हा सूत्रधार रंगभूमीवर उभे राहून यक्षगानकाव्य गात असतो व त्या आधारे इतर पात्रे नृत्य करतात, संवाद म्हणतात. यक्षगानाच्या एकूण सादरीकरणामागे सूत्रधाराचे पात्र हे केंद्रस्थानी असते.
६) दशावतारात देवतांच्या मुखवट्यांचे रंग व वेशभूषा शांत व सौम्य असते तर राक्षसपात्रांच्या भूमिकेमध्ये आणता येईल तेवढी भडकता व उग्रता आणली जाते. म्हणजे एकूणच दशावतारातील सोंगांची वेशभूशा रेषमी, सळसळीत, झगझगीत, भडक असते. देवतांची वाहने व आयुधे बेगडाच्या सहायाने चमकदार केली जातात.
यक्षगानातील पात्रांची वेशभुषा भडक व नेत्र दिपवणारी असते. राक्षसांच्या रंगभूशेमध्ये लालसर रंगाचा वापर केला जातो तर देव पात्रांचे रंग सौम्य व गौरवर्णी असतात. राक्षसाचे पात्र अक्राळविक्राळ, उग्र व भीशण दिसावे असे सजवलेले असते.
७) दशावतार आणि यक्षगान या दोन्हीमध्ये स्त्रियांना भूमिका करता येत नाही. दोन्हीकडे पुरूषच स्त्रीपात्रे रंगवितांना दिसतात.

अशा प्रकारे कर्नाटकातील यक्षगान आणि कोकणातील दशावतार यांचे सांस्कृतिक अनुबंध परस्परांशी जोडलेले आहेत किंवा त्यांचा परस्परांवर प्रभाव पडलेला आहे एवढे नक्की.

डॉ.प्रकाश खांडगे

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही