नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


शेगावचे श्री गजानन महाराज

Go down

शेगावचे श्री गजानन महाराज Empty शेगावचे श्री गजानन महाराज

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:32 pm

शेगावचे श्री गजानन महाराज 8886_MahaS

महाराष्ट्रीय आधुनिक संतांमध्ये शेगावच्या श्री गजानन महाराजांचा अग्रक्रमानं उल्लेख करावा लागतो. त्यांची चरित्रविषयक माहिती फारशी उपलब्ध होत नसली तरी मौखिक परंपरेनं त्यांच्याविषयी विपुल माहिती मिळते. त्यांच्या चरित्राविषयी माहिती देणारी साधनंही अत्यल्प आहेत. त्यांतील दोन चरित्रग्रंथांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो.
१) श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय आणि २) आकोटचे वकील मारोतराव पळसोदकर यांनी १९१२ साली लिहिलेल्या संतचरित्रसुमनावलीतील १२,१३,१४ हे तीन अध्याय.
श्री पळसोदकर वकील यांनी

हे कोठे जन्मासी आले ? कोठे वस्तीसी राहिले ?
यांचे मातापितर कवण जहाले ? आजन्मवार्ता नच ठावे।।
सदा राहती पिशाचवेषे। स्वरूपी डुल्लती प्रेमळसे।
दिगंबर मूर्ती शोभतसे। चंद्रापरी तेज फाके।।
कोणी भक्षाया देई अन्न। तरीच करावे भक्षण।
कोणी देत प्राशावया जीवन। तरी जीवन प्राशावे।।
सवे योगक्षेम जनाकरवी। स्वये भ्रमती विदेही।
चढे न घडे त्याची पर्वा नाही। सदा उदास वृत्ती असे।।

महाराज शके १८०० (इ. स. १८७८) मध्ये प्रकट झाले व भाद्रपद शु. पंचमी शके १८३२ (इ. स. १८१०) मध्ये समाधिस्थ झाले. म्हणजे उण्यापुर्‍या बत्तीस वर्षातच त्यांनी आपलं अवतारकार्य पूर्ण केलं. ते सदैव दिगंबरावस्थेत असत. ते चिलीम ओढीत, तथापि तिचं व्यसन त्यांना नव्हतं.

त्यांना जे अल्प आयुष्य लाभलं, त्यात त्यांनी केवढी समाजहिताची कार्य केली. त्यानी केलेली ही समाजकल्याणाची कामं लोकविलक्षण असल्यानं ते चमत्कार करीत असावेत, अशी काही जणांची कल्पना आहे. वस्तुत: त्यामागील सूत्र

लोकांच्या कल्याणा
संतांच्या विभूती।।

हेच होतं. त्यांच्याविषयी सांगितल्या जाणार्‍या प्रसंगांतून त्यांची लोकोद्धाराची तळमळ व करुणा प्रकट होते.

ते नेहमी गण गण गणात बोते बाते (किंवा गणि गण गणात बोते बाते) हे भजन म्हणत. श्री गजानन विजय या त्यांच्या चरित्रात त्याविषयीचं स्पष्टीकरण असं दिलं आहे -

त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा।
गणि या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।।
जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न।
हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।।
बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका।
बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।।
बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन।
ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।।
म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।
मानू नको त्यया व्रत। निराळा त्या तोचि असे।।
गिणगिण गणांत बोते। कोणी गणि गण गणात बोते।
ऐसी आहेत दोन मते। या भजनाविषयी शेगांवी।।

आचारविचार पवित्र असावेत, नामस्मरण व ध्यान करावं, भक्तीत व्यवहार नसावा, कन्यापुत्राची आसक्ती नसावी, अशी विरक्ती बाणवावी, मन शुद्ध असावं, क्षमाशील असावं, योगसामर्थ्य अंगी बाणावं, देव कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाही, तो सर्वांचा उद्धारकर्ता आहे, भक्ताच्या कल्याणासाठी तो धावून येतो, त्याच्यावर अढळ श्रद्धा व विश्वास ठेवावा, अशा प्रकारचा हितोपदेश ते सतत करीत. जीवनात शुचिता असावी, तिच्यापासून क्षणभरही विलग होऊ नये हा त्यांच्या विचारसरणीचा गाभा होता.

आत्मा हा चिरंतन आहे, तो अमर आहे त्यामुळं मृत्यूला भिण्याचं कारण नाही असंही महाराज म्हणत. भक्ती केल्यानं जीवाचा उद्धार होतो, तेव्हा भक्तीची कास कधी सोडू नये, असाही उपदेश त्यांनी केला आहे. विरक्तीचा पुरस्कार केला असला त्यांनी कर्म करण्यावरही भर दिला आहे.

जे जे कुणी द्वाड असती। त्यांना सुधारण्याप्रती।
साधुपुरुष अवतार घेती। ईशाज्ञेने भूमीवर।।

या त्यांच्या चरित्रातील उल्लेखावरुन त्यांची पाखांड खंडनात्मक भूमिका ही स्पष्ट होते.

आजही महाराजांचे असंख्य अनुयायी त्यांच्या या उपदेशानुसार जीवन व्यतीत करीत आहेत.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही