नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


नारोशंकर मंदिर

Go down

नारोशंकर मंदिर Empty नारोशंकर मंदिर

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:40 pm

नारोशंकर मंदिर 8666_Mahasan_L

पेशव्यांच्या उत्कर्षाच्या काळात महाराष्ट्रात अनेक मंदिरं बांधण्यात आली. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे स्थापत्यकलेच्या दृष्टीने तर ती उत्कृष्ट आहेतच. पण ती बांधतांना आजूबाजूच्या वातावरणाचा, निसर्गाचा विचार करून बांधण्यात आली आहेत. आणि यामुळेच ही मंदिरं काळावर मात करु शकली आहेत.

असेच एक मंदिर आहे नाशिकला. मंदिराचे नाव आहे नारोशंकर. हे मंदिर प्रसिद्ध आहे ते इथल्या प्रचंड मोठ्या घंटेसाठी. गोदावरी काठावर वसलेले हे मंदिर नागरी आणि परंपरागत स्थापत्यशैलीच्या मिलाफाचे उत्तम उदाहरण आहे. नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी या मंदिराचे निर्माण केल्यामुळे हे मंदिर नारोशंकर याच नावाने प्रसिद्ध झाले. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांची वसईच्या किल्ल्यावरून १७३९ मध्ये सुटका करण्यात आली. त्या लढाईमध्ये मराठ्यांनी दाखवलेले शौर्य अभूतपूर्व होते. त्याचे स्मरण रहावे म्हणून नारोशंकर यांनी वसईहून येतांना ही प्रचंड घंटा सोबत आणली. नारोशंकर मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक बनून कायम आहे. असं म्हणतात, त्या काळात हे मंदिर उभारण्यासाठी १८ लाख रुपये खर्च झाले. आजच्या दृष्टीने या रकमेचा विचार करता ही किंमत कोटींच्या घरात जाते.

मंदिराच्या अगदी जवळून गोदावरी वाहते. हे ध्यानात घेऊन पुरापासून आणि लोकांनी गजबजलेल्या गोदावरीच्या घाटांपासून मंदिराची शांतता अबाधित राखण्यासाठी एक भरभक्कम दगडी भिंत मंदिराच्या सभोवती उभारली आहे. अनेक उपशिखरांनी वेढलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष्य वेधून घेते. मंदिराच्या सभोवती असणार्‍या भिंतीला वेढणारा अक्षय नाग भिंतीवर कोरला आहे. अक्षय नाग शिवमंदिराच्या भिंतीवर कोरला जातो. हा नाग शिवाचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवितो. सभामंडपाचे बांधकाम काहीसे हेमाडपंथी पद्धतीचे आहे. तर मंदिराच्या चारही बाजूना असणार्‍या छत्र्या रजपूत शैलीची आठवण करून देतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटेसाठी केलेली महिरपही राजपूत पद्धतीची आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून कारागिर खास बोलविण्यात आले होते असं म्हणतात.

मंदिराच्या मागच्या बाजूला दोन भव्य हत्ती कोरले आहेत. पूर्वी इथे बगिचा असावा. कालौघात तो नष्ट झाला असला तरी त्याच्या खुणा अजूनही जाणवतात. बगिचातले छोटे दगडी रस्ते वगैरे आजही आहेत.

शिवाची शोडषोपचार पुजा केली जाते. महाशिवरात्रीला आणि श्रावण सोमवारी इथे गर्दी असते. असे हे नारोशंकर मंदिर आणि इथली भव्य घंटा आजही महाराष्ट्राच्या शौर्याची साक्ष देत उभी आहे.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही