Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
किल्ले चंद्रपूर
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
किल्ले चंद्रपूर
चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. नागपूरच्या दक्षिणेला चंद्रपूर आहे. गौड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर हे गाव पूर्वी किल्ल्याच्या आत होते. लोकसंख्येच्या विस्तारामुळे चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीमध्ये तग धरुन आहे.
चंद्रपूर रेल्वेमार्गाने तसेच गाडीमार्गाने जोडलेले आहे. त्यामुळे चंद्रपूरला पोहोचण्यास काही अडचण येत नाही. चंद्रपूरच्या किल्ल्याचा पाया खांडक्या बल्लाळशहा या गौड राजाने घातला. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. चंद्रपूरचा किल्ला वसवण्यामागे एक लोककथाही या भागात प्रचलित आहे. ही बहुचर्चित कथा या किल्ल्याच्याही बाबतीत सांगितली जाते. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ. स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणीकरुन साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि पायाभरणी केली.
खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्विकारले. ते चिन्ह वेशीच्या चारही बाजूंना कोरुन घेतले. मात्र या चिन्हांमधील सिंहाचा आकार हत्तीच्या दुप्पट तरी मोठा दाखवलेला आहे.
चार दिशांना चार बलदंड दरवाजांबरोबर चार उपदिशांना लहान दरवाजे करण्यात आले. यांना खिडक्या म्हणतात. पुढे धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमधे तटबंदीचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मोठा दानधर्म करण्यात आला. या तटाला तेव्हा सव्वा कोटी रुपये खर्च आल्याची नोंद आहे. तटबंदीची उंची १५ ते २० फुटांची असून परिघ साडेसात मैल आहे. याचे दक्षिणोत्तर अंतर पावणे दोन मैल असून पूर्वपश्चिम अंतर सव्वा मैल आहे. पूर्व व दक्षिणेकडे झटपट नदी असून पश्चिमेला इरई नदी तटाजवळून वहाते.
चंद्रपूरच्या किल्ल्याला जटपूरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय देखणा आहे. तसेच उपदरवाजे म्हणजे खिडक्यांनाही नावे आहेत ती अशी बगड, हनुमान, विठोबा, चोर आणि मसण. याशिवाय किल्ल्याला पूर्वी बालेकिल्ला होता. तो हीरशहाने बांधला. त्याचा वापर सध्या तुरुंग म्हणून करतात. इ. स. १८१८ मधे इंग्रज कॅप्टन स्कॉट याने बालेकिल्ला जिंकला तेव्हा त्याला १० लाख रुपयांची लुट येथे मिळाली होती.
याशिवाय अचलेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, गंगासिंगाची समाधी तसेच रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. अचलेश्वर मंदिराजवळ असलेली राजा बीरशहाची समाधी अतिशय देखणी आहे. अशी देखणी इमारत विदर्भामधे दुसरी नसावी. चंद्रपूरची भ्रमंती आपल्याला निश्चितच इतिहासामधे घेवून जाते.
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin