नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


शाहिरांची मुंबई

Go down

शाहिरांची मुंबई Empty शाहिरांची मुंबई

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:01 pm

शाहिरांची मुंबई 7419_MahaS

आंतरराष्ट्रीय ख्याती असणा-या आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई नगरीत २२ जानेवारी २०१० पासून सलग सात दिवस सप्तरंग महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित होत आहे. याच वेळी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे विद्यानगरी संकुल कलिना येथे भव्य परंपरा महोत्सवाचे आयोजन २६ ते २८ जानेवारी २०१० या कालावधीत होत आहे. सप्तरंग महोत्सव, विविध कलामहोत्सव, परंपरा महोत्सव, आदिवासी नृत्य महोत्सव अशा उपक्रमांनी मुंबई नगरीमध्ये जणू आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था होणार आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईकर निर्धाराने पुन्हा उभा राहिला. नैसर्गिक आपत्ती असो वा राष्ट्रीय आपत्ती असो, मुंबईकरांचे धैर्य वाढविण्याचे काम या काळात शाहिरांनी केले. शाहिरांनी मुंबईचे वर्णन आपल्या कवनांमधून कसे केले आहे ते या निमित्ताने आपण पाहू या.

'मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका, वाजतो डंका ठाई ठाई` ही शाहीर पठ्ठे बापूरावांची मुंबईची लावणी. रावणाची लंका असे वर्णन पठ्ठेबापूरावांनी मुंबई नगरीचे केले आहे. लंकेत सोन्याच्या विटा होत्या अन् तेथे सोन्याचा धूर निघत असे. म्हणजे लंका वैभवशाली होती तशीच मुंबई देखील वैभवशाली आहे असे पठ्ठे बापूरावांना म्हणायचे आहे. मुंबईचे शांघाय होणार असे म्हणतात. लंका होवो अथवा शांघाय होवो मुंबईचे मुंबईपण इथल्या श्रमिकांच्या घामावर, कष्टावर अवलंबून होते आणि आजही आहे. या कष्टक-यांचे विरंगुळयाचे साधन होते आणि आजही आहे त्या म्हणजे मराठी मातीतल्या, अस्सल बावनकशी सोन्यासारख्या लोककला. भक्तीसंगीत आणि लोकसंगीताच्या मुशीतून अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक पायाभरणी झाली. संत, पंत आणि तंतांच्या प्रतिभेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मंदिर साकार झाले. त्यात लोकसंस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. कृषि संस्कृती, ग्रामसंस्कृती आणि लोकसंस्कृती ही तिनही रूपे एकच होत.

औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि विस्तार, वाढते शहरीकरण आणि गावगाड्यातील संपुष्टात आलेली बलुतेदारी यांचा फार मोठा परिणाम लोकसंस्कृतीवर झाला आणि या लोकसंस्कृतीने वाढत्या शहरीकरणाबरोबर नागर रूप धारण केले. मग मुंबई सारख्या शहरातही आपल्या मनातला गाव कृतीत साकारण्याची अंत:स्फूर्ती इथल्या मुंबईकरांना झाली. त्यातून मुंबई नगरीची स्वतंत्र अशी संस्कृती आकाराला आली. ज्यात लोककलांचे नांदते गोकुळ मुंबईच्या वस्त्या वस्त्यांमधून साकार झाले. पठ्ठे बापूरावांसारखे सिध्दहस्त, प्रतिभाशाली शाहीर मुंबईची लावणी रचतो, याचे कारण पठ्ठे बापूरावांचे आणि त्यांचे समकालीन असणा-या रामा वर्धनगडकर दगडूबाबा साळी, हरी वडगावकर आदींचे तमाशे मुंबईच्या पिलहाऊसला रंगायचे.

पठ्ठेबापूराव पवळाच्या प्रीतीचा डंका मुंबई नगरीसह चौमुलुखी वाजला, तेव्हा पठ्ठेबापूराव व पवळाला पहायला लोकांच्या गर्दी याच मुंबई नगरीत उसळली.

पठ्ठेबापूरावांनी केलेले मुंबईचे वर्णन पाहा.

मुंबई नगरी बडी बाका ।
जशी रावणाची दुसरी लंका ।
वाजतो डंका चहुमुलखी ।
मुंबई नगरी सदा तरणी ।
व्यापार चाले.... दर्यावरूनी.....आगबोटीची निराळी धरती ।
मुंबई नगरी गुल हौशी ।
हे ग मुंबई बंदर ।
सगळया दुनियेत सुंदर ।
....परळपासून सरळ रस्ता ।
भायखळयाच्या पुलावारचा ।
....खालता उभा पारशी ।
सर जमशेटजी बाटलीवाला ।
मोती बाजार मुंबादेवी ।
भेंडीबाजार काळबादेवी ।
बेरीबंदर कोट किल्ला ।
ताजमहाल प्यालेस हॉटेल ।
....फारस रोड दारूसाठी ।
भांगवाडी गांज्यासाठी ।
चंदनवाडी राहण्यासाठी ।
...........ट्रमगाडया ।
व्हीक्टोरिया रंग जरदी ।
तयार केले चौपाटी ।
गिरगावच्या पाठी ।
....रिएन थिएटर सा-यात मोठं ।
एलिपिष्टन आहे धाकटं ।
मुंबई थिएटर छोटं ।
व्हिक्टोरीया मोठं ।
कारोशान धाकटं ।
...तुला पुजायला देतो भुलेश्वर मुंबादेवी ।
पंचमुखी मारूती कालकाईदेवी ।
....नारी जेकब सर्कल ।
तुला असंल दखंल ।
तिथे रस्ता चुकंल ।
....कुलाब्याच्या दांडीवरती... बत्ती फिरती ।


तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले मुंबईचे वर्णन असे-

या मुंबई गर्दीत बेकारांची । त्यांत भरती झाली माझी एकाची ।
मढयावर पडवी मुठभर माती । तशी गत झाली आमची ।
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची
शेडीची, दाडीची, हडसनाच्या गाडीची, नायलॉनच्या आणि
जॉर्जेटच्या तलम साडीची। हिरव्या माडीची पुस्तकांच्या
थडीची । माडीवर माडी। हिरव्या माडीची पैदास इथं भलतीच चोरांची।
ऐतखाऊंची। शिरजोरांची। हरामखोरांची। भांडवलदारांची। पोटासाठी पाट धरली होती मी कामाची। पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची। पाण्यानं भरलं खिसं माझं।
वाण मला एका छत्रीची ।
त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची । बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एक भाषिक राज्याची । चकाकली संगीन अन्यायाची ।
फौज उठली बिनीवरची ।कामगारांची । शेतक-याची । मध्यमवर्गीयांची
उठला मराठी देश । आला मैदानी त्वेष । वैरी करण्या नामशेल ।
गोळी डमडमची छातीवर साहिली ।
म्हणे अण्णाभाऊ साठे । घरं बुडाली गर्वाची । मी-तूपणाची ।


किंवा

मुंबई उंचावरती । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।
परळात राहणारे । रात दिवस राबणारे ।
मिळेल ते खाऊनी घाम गाळती ।।१।।
ग्रँटरोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।
असे किती रोड इथं नाही गणती ।
गल्ली-बोळ किती आत । नाक्यांचा नाही अंत ।
अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।

शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या मुंबई नगरीच्या वर्णनात वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान आले आहे. अण्णाभाऊंवर साम्यवादी विचारसरणीचा मोठा पगडा होता. कामगार वस्तीतल्या श्रमिकांचे वर्णन शाहीर आत्माराम पाटलांनी केले आहे ते असे -

बारा फुटाची अंधार खोली।
तिचे आम्ही बारा जण वाली।।धृ।।
बारा जणांच्या वळकुटय़ा बारा।
बारा बॅगांचा चौफेर घेरा।
बारा थरांचा उभा मनोरा।
तर लंगोटांचा साज न्यारा।
नाही पाणी नाही तिथे वारा।
डास ढेकुण पिसवांना थारा।
खातो बायांच्या शिव्या सकाळी।
रोज नळात होता आंघोळी।।१।।


अशी ही शाहिरांची मुंबई लोककलावंतांचे मायपोट होय. म्हणूनच इथे बाल्या नृत्य, तमाशे, संगीत भजने, दषावतार, नमन खेळे, शाहिरी पोवाडे आजही कामगार वस्तीत रंगलेले दिसतात.


प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
[center]
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही