नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले साल्हेर

Go down

किल्ले साल्हेर Empty किल्ले साल्हेर

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:02 pm

किल्ले साल्हेर 7376_MahaS

नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरीदुर्गच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. आजमितीला नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरीदुर्ग आहेत. या गिरीदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातच आहे.

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणे या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणे तालुक्यातच आहेत.

साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.

सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटूनच साल्हेरचा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. १५६७ मी. समुद्रसपाटीपासून उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर, साल्हेर असे याचे नाव पडले अशा कथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.

साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदीस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने आपण उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते. हा चढ छातीवरचा असल्यामुळे चांगलीच दमछाक होते.

साल्हेरचा माथा हा चारही बाजुने उंच कातळकडय़ांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. घरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.

गडाच्या माथ्यावर मंदिर आहे. हे मंदिर रेणूका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरुनच बाण मारुण परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते.

समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत मार्कींडय़ा, खळा-जवळा, धोडप, कांचन, राजवेहेर, चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते.

साल्हेरेकडून सालोटय़ाच्या वाटेकडे उतरून खिंडीतून वाघांबेकडे ही उतरता येते. साल्हेरची उंची आणि विस्तार भरपूर असल्याने हाताशी पुरेसा वेळ ठेवून चढाई करता येईल अथवा वर मुक्कामाची तयारी ठेवून साल्हेरची भ्रमंती आनंदमयी करता येईल.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही