नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

देव तिळीं आला...

Go down

देव तिळीं आला... Empty देव तिळीं आला...

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:15 pm

देव तिळीं आला... 7354_MahaS

'तिळगूळ घ्या, गोड बोला' असे सांगून परस्परांना तिळगूळ देण्याची परंपरा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून आहे. आपले तुकोबा तर असे की, त्यांना प्रत्येक विषयात आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्ष देवच दिसत असे. सर्वांभूती परमेश्वराचा अधिवास आहे, अशी तुकोबांची दृढ श्रद्धा होती. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दिल्या-घेतल्या जाणा-या तिळगुळातसुद्धा या दिवशी जणूकाय देवच अवतरतो, अशा श्रद्धेने तुकोबांनी तिळगुळाइतकाच मधुर आणि स्नेहमय असा एक अभंग लिहिला आहे.

देव तिळीं आला गोडें गोड,
जीव धाला साधला हा पर्वकाळ गेला,
अंतरीचा मळ पापपुण्य गेलें एका स्नानेंचि खुंटले,
तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनीं


तुकोबा म्हणतात, या तिळाच्या रूपाने जणू देवच प्रकट झाला आहे. तिळगुळाच्या गोडव्याने माझा जीव तृप्त झाला आहे, आनंदित झाला आहे. हे तिळगुळाचे देणे-घेणे मला धन्य करून गेले आहे. मकरसंक्रांत हा स्नानदानाच्या दृष्टीने पर्वकाळ असतोच, पण तुकोबांच्या सांगण्याप्रमाणे अंतरीचा म्हणजे आपल्या मनातील मळ, दोष नष्ट करणारा हा संक्रांतीचा तिळगूळ देण्या-घेण्याचा पर्वकाळ आहे. पाप आणि पुण्याचा विचार तरी आता कशाला करता ? आजच्या दिवशी प्रत्यक्षात केलेले शरीरस्नान आणि एकमेकाला तिळगूळ देऊन परस्परांची मने शुद्ध, निर्मळ झाल्याने घडलेले मनोवृत्तीचे परिवर्तन यामुळे पापाचा आणि पुण्याचा विचारही करण्याची गरज नाही. बाह्यस्नान आणि अंतर्स्नान यामुळे आपण सगळे अंतर्बाह्य शुद्ध झालो आहोत.

तुकोबा आपल्या अर्थवाही अधिकार वाणीने सांगतात की, या जगात सर्वत्र परमेश्वरच भरलेला आहे. तिळगूळ देणारा आणि तिळगूळ घेणारा ही तशी परमेश्वराची भिन्न-भिन्न रूपे आहेत, तसेच तो तिळगूळसुद्धा एक प्रकारे परमेश्वरी लीलेचाच एक आविष्कार आहे. देवच त्या तिळामधून प्रकट झालेला असल्यामुळे त्याच्या गोडव्याला एक ईश्वरी सद्भावाचे माधुर्य लाभलेले आहे. आपण संक्रांतीला तिळगूळ देतो आणि घेतो, पण त्यामधून व्यावहारिक आणि लौकिक अर्थाबरोबरच काही पारंपरिक, पारलौकिक अर्थ तुकोबा शोधू पाहातात. तुकोबांचे सगळे सांगणे, तुकोबांची सगळी शिकवण ही सदाचरणाचे महत्त्व सांगणारी आहे. माणसांनी चांगल्या मार्गाने वागावे, एकमेकांवर प्रेम करावे, दुस-याची काळजी करावी, दुस-याचे कसे चालले आहे त्याचा विचार करावा आणि स्वत:ला दुस-यामधून पाहावे, असा एक अत्युच्च आदर्श तुकोबा आपणासमोर ठेवू पाहात आहेत. हा तुकोबांचा दृष्टिकोन या छोटय़ाशा अभंगातसुद्धा व्यक्त झाला आहे. एकमेकाला तिळगूळ देतांना त्यामध्येही परमेश्वराचे गोड रूप पाहावे, असे तुकोबांचे सांगणे आहे.

केवळ एवढेच नव्हे, तर संक्रांतीच्या पर्वकाळी केले जाणारे स्नान हा शारीरिक उपचार झाला. पण निर्मळ मनाने एकमेकाला तिळगूळ देण्यात आपल्या अंतर्मनालासुद्धा स्नान घातले जाते. आपले अंतर्मनही स्वच्छ आणि पवित्र होते. या गोष्टीवर तुकोबा भर देतात आणि तिळगूळ देणे हा केवळ साधा उपचार न राहता ती जशी व्यावहारिक तशीच आध्यात्मिक विषयातील महत्त्वाची कृती ठरते. तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष देव तिळगुळात प्रकट झाल्यानंतर कोणीही जीव आनंदणार नाही तर काय होईल ? कोणीही झाला तरी देवरूपी तिळगूळ मिळाल्यानंतर प्रसन्न होणारच !
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही